दाऊद इब्राहिमचा सर्वात मोठा शत्रू अजून जिवंत, 9 वर्षांनी सोशल मीडियावर छोटा राजनचे फोटो

chhota rajan news: 1990 च्या दशकात अंडरवर्ल्डच्या सर्व कारवाया छोटा राजनच्या नेतृत्वाखाली होत्या. त्यावेळी डी-कंपनीची दहशतही शिगेला पोहोचली होती. राजन दाऊद इब्राहिमच्या अगदी जवळ होता, पण नंतर दोघेही कट्टर शत्रू झाले. 1993 च्या बॉम्बस्फोटानंतर राजन आणि दाऊद वेगळे झाले होते.

दाऊद इब्राहिमचा सर्वात मोठा शत्रू अजून जिवंत, 9 वर्षांनी सोशल मीडियावर छोटा राजनचे फोटो
chhota rajan
Follow us
| Updated on: Apr 23, 2024 | 7:39 AM

मुंबईमधील अंडरवर्ल्ड डॉन आणि दाऊद इब्राहिम याच कट्टर शत्रू छोटा राजन याच्यासंदर्भात महत्वाची माहिती समोर आली आहे. दिल्लीत कठोर सुरक्षा व्यवस्थेत असलेला छोटा राजन याचे दोन फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एका फोटोमध्ये छोटा राजन रुग्णालयातील कारागृहात आहे. त्याला 2020 मध्ये कोरोना झाला असताना रुग्णालयात दाखल असतानाचा हा फोटो आहे. तर दुसरा फोटो आताचा असल्याचे म्हटले जात आहे. तब्बल नऊ वर्षांनंतर अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचे छायाचित्र सोशल मीडियावर आले आहे. कोरोना काळात छोटा राजनचा मृत्यू झाल्याची पसरली अफवा होती. परंतु छोटा राजन जिवंत असल्याचा हा पुरावा सोशल मीडियावर आता झळकला आहे.

छोटा राजन तिहारमध्येच

सध्या छोटा राजन दिल्लीच्या तिहार जेलमध्ये आहे. त्याला 2015 साली बाली विमानतळावरून अटक करण्यात आली होती. त्याला तिहार जेलमधील दोन नंबरच्या कोठडीमध्ये ठेवले आहे. आता त्याचा जो फोटो आला आहे, त्यात तो तंदुरुस्त दिसत आहे. एक फोटो 2020 मधील आहे. त्यावेळी त्याला कोरोना झाला होता. त्याच्या या फोटोंमुळे दाऊद इब्राहिमला धक्का बसणार आहे. दाऊद याने अनेक वेळा छोटा राजन याच्या हत्येचा प्रयत्न केला होता. परंतु त्यात त्याला यश आले नाही. कोरोना काळात छोटा राजनचा मृत्यू झाल्याची अफवा उडाली होती. कोरोनाच्या संकटातून तो बाहेर पडला.

कारागृह प्रशासनाकडून मौन

ऑक्टोंबर 2015 मध्ये छोटा राजन याचे भारतात प्रत्यार्पण करण्यात आले होते. त्यानंतर तो तिहार कारागृहात आहे. त्याचा व्हायरल फोटोसंदर्भात तिहार कारागृह प्रशासनाकडून अद्याप काहीच वक्तव्य करण्यात आले नाही. मे 2020 मध्ये छोटा राजन याला कोरोना झाला होता. त्यात त्याचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती. परंतु कारागृह प्रशासनाने काहीच स्पष्टीकरण त्यावेळी दिले नव्हते. त्यावेळी बिहारमधील माफिया डॉन शहाबुद्दीन याचा मृत्यू झाला होता.

हे सुद्धा वाचा

1990 च्या दशकात अंडरवर्ल्डच्या सर्व कारवाया छोटा राजनच्या नेतृत्वाखाली होत्या. त्यावेळी डी-कंपनीची दहशतही शिगेला पोहोचली होती. राजन दाऊद इब्राहिमच्या अगदी जवळ होता, पण नंतर दोघेही कट्टर शत्रू झाले. 1993 च्या बॉम्बस्फोटानंतर राजन आणि दाऊद वेगळे झाले होते.

ग्रँड एन्ट्री पडली महागात, नवरदेवाच्या फेट्याला लागली आग, पाहा VIDEO
ग्रँड एन्ट्री पडली महागात, नवरदेवाच्या फेट्याला लागली आग, पाहा VIDEO.
'मारकडवाडीत शरद पवार माझे काम...,' काय म्हणाले राम सातपुते
'मारकडवाडीत शरद पवार माझे काम...,' काय म्हणाले राम सातपुते.
'अजित पवार यांची १००० कोटीची संपत्ती ...,'काय म्हणाल्या अंजली दमानिया
'अजित पवार यांची १००० कोटीची संपत्ती ...,'काय म्हणाल्या अंजली दमानिया.
नार्वेकर पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष पदी, उद्धवना खिजवण्याची तयारी
नार्वेकर पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष पदी, उद्धवना खिजवण्याची तयारी.
'विरोधकांचा शपथविधीवर बहिष्कार म्हणजे....',काय म्हणाले प्रवीण दरेकर?
'विरोधकांचा शपथविधीवर बहिष्कार म्हणजे....',काय म्हणाले प्रवीण दरेकर?.
महाविकास आघाडीत पराभवाचे खापरफोडणे सरु, अबू आझमी यांचा अखेर आखरी सलाम
महाविकास आघाडीत पराभवाचे खापरफोडणे सरु, अबू आझमी यांचा अखेर आखरी सलाम.
राज्यसभेत काँग्रेस MPच्या बाकाखाली नोटाचं बंडल? सिंघवींनी आरोप फेटाळले
राज्यसभेत काँग्रेस MPच्या बाकाखाली नोटाचं बंडल? सिंघवींनी आरोप फेटाळले.
विधानसभा अध्यक्ष म्हणून नार्वेकरांना पुन्हा संधी मिळणार की पत्ता कट?
विधानसभा अध्यक्ष म्हणून नार्वेकरांना पुन्हा संधी मिळणार की पत्ता कट?.
एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंच्या FBला फॉलो, राजकीय वर्तुळात काय घडतय?
एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंच्या FBला फॉलो, राजकीय वर्तुळात काय घडतय?.
फडणवीस CM होताच सुप्रिया सुळेंनी 'लाडक्या बहिणीं'साठी केली मोठी मागणी
फडणवीस CM होताच सुप्रिया सुळेंनी 'लाडक्या बहिणीं'साठी केली मोठी मागणी.