मुन्नवर राणांनी यूपी नव्हे तर देश सोडावा, योगींच्या मंत्र्याने पातळी सोडली

उत्तर प्रदेशातील योगी सरकारमधील (Yogi Adityanath) राज्यमंत्री आनंद स्वरूप शुक्ला यांनी वादग्रस्त विधानांची मालिका कायम ठेवली आहे. आता त्यांनी शायर मुन्नवर राणा यांच्यावर टीका करताना पातळी सोडली.

मुन्नवर राणांनी यूपी नव्हे तर देश सोडावा, योगींच्या मंत्र्याने पातळी सोडली
Munawwar Rana

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील योगी सरकारमधील (Yogi Adityanath) राज्यमंत्री आनंद स्वरूप शुक्ला यांनी वादग्रस्त विधानांची मालिका कायम ठेवली आहे. आता त्यांनी शायर मुन्नवर राणा यांच्यावर टीका करताना पातळी सोडली. “मुन्नवर राणांसारख्या लोकांना केवळ उत्तर प्रदेश नाही तर देश सोडून जायला हवं. इतकंच नाही तर भारताविरोधात जे बोलतील त्यांना एन्काऊंटरमध्ये मारलं जाईल” असं आनंद स्वरुप शुक्ला म्हणाले. योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री झाल्यास मी उत्तर प्रदेश सोडून जाईन, असा इशारा मुनव्वर राणा यांनी दिला होता. त्यावरुन मंत्री महोदयांनी टीका केली.

राज्यमंत्री आनंद स्वरुप शुक्ला यांनी माध्यमांशी बोलताना मुन्नवर राणांविरोधात टीकास्त्र सोडलं. आनंद स्वरुप शुक्ला म्हणाले, “मुन्नवर राणा हे त्या लोकांपैकी आहेत, जे 1947 फाळणीनंतर भारतात थांबले आणि देशाला आतून पोखरण्याच्या कटात सहभागी झाले”.

शुक्ला यांनी काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या यूपी दौऱ्यावरुनही निशाणा साधला. प्रियांका गांधी वाड्रा या राजकीय पर्यटक आहेत. दीड वर्षानंतर यूपीचं वातावरण आणि पाऊस बघण्यासाठी त्या आल्या आहेत, असं आनंद स्वरुप शुक्ला म्हणाले.

मुन्नवर राणा नेमकं काय म्हणाले होते?

प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांनी पुन्हा एकदा उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री झाल्यास मी उत्तर प्रदेश सोडून जाईन, असा इशाराच त्यांनी दिला होता.

घर विकणे आहे, असा बोर्ड मी माझ्या घरावर लावेल. माझा योगींना आक्षेप नाही. पण योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत हे आवश्यक नाही. योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री झाल्यास मी उत्तर प्रदेश सोडून देईल, असं राणा म्हणाले. यावेळी त्यांनी एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांच्यावरही टीका केली. हैदराबादहून आलेल्या ओवेसींमुळे उत्तर प्रदेशात योगींचं सरकार बनत असेल तर मी सिंह आहे आणि कोलकात्यातही सिंह राहतात. मी कोलकात्याला राहायला जाईल, असं सांगतानाच ओवेसी मतांचं विभाजन करत असल्याचा दावा राणा यांनी केला.

संबंधित बातम्या 

योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री झाल्यास उत्तर प्रदेश सोडून जाईल; प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांचा इशारा

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI