नाना चुडासामा यांचे ‘हिस्ट्री ऑन अ बॅनर’ पुस्तक प्रदर्शित, शायना एनसींनी दिले अमित शाहांना भेट
शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शायना एनसी यांनी त्यांच्या दिवंगत वडील आणि पद्म पुरस्कार विजेते नाना चूडासमा यांचे "हिस्ट्री ऑन अ बॅनर" हे पुस्तक नुकतेच प्रदर्शित केले. हे पुस्तक त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेट दिले.

शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शायना एनसी यांचे दिवंगत वडील आणि पद्म पुरस्कार विजेते नाना चुडासामा यांचे ‘हिस्ट्री ऑन अ बॅनर’ हे पुस्तक प्रदर्शित झाले. शायना एनसी यांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना हे पुस्तक भेट म्हणून दिले आहे. हिस्ट्री ऑन अ बॅनर असे या पुस्तकाचे नाव आहे.
विविध संस्थाच्या कारभारात मोलाचा हातभार
नाना चुडासामा हे मुंबईचे माजी नगरपाल होते. त्यांनी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक अशा विविध विषयांवर भाष्य केले होते. ते जायंट इंटरनॅशनल या संस्थेचे संस्थापक आहेत. मुंबई माझी लाडकी, फोरम अगेन्स्ट ड्रग्ज ॲण्ड एड्स, नॅशनल किडनी फाऊंडेशन, कामन मॅन्स फोरम अशा विविध संस्थाच्या कारभारात त्यांनी मोलाचा हातभार लावला. २००५ मध्ये त्यांच्या समाजकार्यासाठी त्यांना पद्मश्री पुरस्काराने संन्मानित करण्यात आले.
मुंबईचे माजी शेरीफ नाना चुडासामा यांची ओळख आय लव्ह मुंबई, जायन्ट्स इंटरनॅशनल या एनजीओ एवढीच त्यांच्या मालकीच्या रेस्टॉरंटवर लावलेल्या फलकांमुळेही होती. मुंबईच्या उच्च वर्तुळात त्यांचा वावर होता. त्यांच्या या रेस्टॉरंटध्येही त्याच वर्गाचा वावर पाहायला मिळायचा. परंतु या फलकावर व्यक्त झालेल्या भावना मात्र सामान्य मुंबईकरांच्या असायच्या. वयाच्या ८५ व्या वर्षीही ते प्रचंड उत्साही असायचे. त्यांचे वडिल मानसिंग चुडासामा हे एकेकाळी मुंबईचे पोलिस आयुक्त होते.
राजकारणाकडे ओढा नाही…
सतत चर्चेत राहणे, उच्चभ्रूंच्या वर्तुळात असणे, कला-कलावंतांसोबत मिरवणे आणि उत्तम वक्तृत्वशैली हे सगळे गुण असूनही त्यांचा ओढा राजकारणाकडे नव्हता. जायन्ट्स इंटरनॅशनल या एनजीओची सुरुवातच जगभरात एकाचवेळी ७०० शाखा स्थापन केली होती. त्यामुळेच त्यांच्या निधनानंतर ‘सिटी विल मिस युवर बॅनर्स,’ ‘आरआयपी- लेजिटिमेट व्हॉइस ऑफ डिसेन्ट’ असे फलक लागले. जुन्या मुंबईबद्दल प्रेम असणारे आणि मुंबईच्या नव्या स्वरूपाचे स्वागत करण्यास सदैव उत्सुक असणारे एक व्यक्तिमत्व म्हणून चुडासामा यांना ओळखले जाते. नाना चुडासामा यांचे २३ डिसेंबर २०१८ रोजी वयाच्या ८५ व्या वर्षी अल्प आजाराने त्यांचे निधन झाले.