संविधानाला नेमका कुणाचा धोका? मोदी म्हणतात, काश्मीर टू कन्याकुमारी, पार्टी फॉर द फॅमिली!

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) भारतीय संविधानाला कुटुंबाच्या राजकीय पक्षांकडून म्हणजेच पार्टी फॉर द फॅमिली यांच्याकडून धोका असल्याचं म्हटलंय.

संविधानाला नेमका कुणाचा धोका? मोदी म्हणतात, काश्मीर टू कन्याकुमारी, पार्टी फॉर द फॅमिली!
नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Nov 26, 2021 | 12:08 PM

नवी दिल्ली: संविधान दिवसाच्या (Constitution Day) निमित्तानं संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) भारतीय संविधानाला कुटुंबाच्या राजकीय पक्षांकडून म्हणजेच पार्टी फॉर द फॅमिली यांच्याकडून धोका असल्याचं म्हटलंय. काश्मीर टू कन्याकुमारी हे चित्र असल्याचं मोदी म्हणाले. एकाच कुटुंबातील व्यक्तींनी राजकारणात येऊ नये, या मताचा मी नसल्याचं नरेंद्र मोदी म्हणाले.

नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?

भारताला एक संविधानिक लोकशाही पंरपरा आहे. राजकीय पक्ष संविधानातील भावना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करतात. राजकीय पक्ष स्वत:चं लोकशाही स्वरुप गमावून बसतात त्या लोकशाहीच रक्षण कशा करु शकतात. आज देशात काश्मीर ते कन्याकुमारी भारताच्या कोणत्याही भागात जावा. देश एका संकटाकडे वाटचाल करत आहेत. संविधानात विश्वास ठेवणाऱ्या लोकांसमोर एक चिंतेचा विषय आहे तो म्हणजे कौटुंबिक राजकीय पक्ष, असं म्हणाले. पार्टी फॉर द फॅमिली, पार्टी बाय द फॅमिली यापुढं बोलण्याची गरज नाही. काश्मीर ते कन्याकुमारी राजकीय पक्षांकडे पाहा त्यांच्याकडे लोकशाही भावना दिसत नाही. कौटुंबिक राजकीय पक्ष म्हणतो त्यावेळी एका कुटुंबातील अनेक लोक राजकारणात येऊ नये असं मी म्हणत नाही. गुणवत्तेच्या जोरावर राजकारणात यावं. कित्येक पिढ्यांपासून राजकीय पक्ष एक कुटुंब चालवतात, असं नरेंद्र मोदी यांनी म्हणत नाव न घेता काँग्रेसवर टीका केली आहे.

भ्रष्टाचाऱ्यांचं प्रतिमासंवर्धन धोकादायक

लोकशाही समृद्ध करण्यासाठी आपल्याला देशातील जनतेला जागृत करण्याची गरज आहे. आपल्याला लोकांच्यात जाण्याची गरज आहे. न्यायालयानं एखाद्या व्यक्तीला भ्रष्टाचारी ठरवत शिक्षा दिली असली तरी त्याचं राजकीय कारणासाठी प्रतिमासंवर्धन होत असेल, राजकीय लाभासाठी सर्व मर्यादा तोडल्या जात असतील तर देशातील युवकांच्या मनात प्रश्नचिन्ह उभं होतं, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

दरम्यान, संसदेतील सेंट्रल हॉलमधील कार्यक्रमावर काँग्रेस, शिवसेना आणि आप यांच्यासह 14 राजकीय पक्षांनी बहिष्कार टाकला आहे.

इतर बातम्या:

BJP LEADERS : राज्यातल्या भाजप नेत्यांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या, राज्यात मोठे बदल होणार?

Constitution Day: … तर संविधानाचं एक पानही आज आपण लिहू शकलो असतो का?: पंतप्रधान नरेंद्र मोदी

Narendra Modi slam opposition parties as party for the family in speech at Central Hall on Constitution Day

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.