Constitution Day: … तर संविधानाचं एक पानही आज आपण लिहू शकलो असतो का?: पंतप्रधान नरेंद्र मोदी

स्वातंत्र्याच्या आंदोलनाची छाया, देशभक्तीची आग आणि फाळणीचं दु:ख या पार्श्वभूमीवर देशात संविधानाची निर्मिती झाली.

Constitution Day: ... तर संविधानाचं एक पानही आज आपण लिहू शकलो असतो का?: पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजच्या सामनाच्या संपादकीयमध्ये मोदींच्या भाषणावर सवाल

नवी दिल्ली: स्वातंत्र्याच्या आंदोलनाची छाया, देशभक्तीची आग आणि फाळणीचं दु:ख या पार्श्वभूमीवर देशात संविधानाची निर्मिती झाली. आज जर संविधानाची निर्मिती करावी लागली असती तर आपण संविधनाचं एक पानही लिहू शकलो असतो का? ही शंका आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.

आज संविधान दिनाच्या निमित्ताने संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. आज आपल्याला संविधानाची निर्मिती करावी लागली असती तर काय झालं असतं? स्वातंत्र्याच्या आंदोलनाची छाया, देशभक्तीची आग, फाळणीचं दु:ख हे सर्व असूनही त्यावेळी देशहित सर्वोच्च हाच सर्वांच्या मनात मंत्रं होता. विविधतेने नटलेला देश, अनेक भाषा, पंथ आणि राजेरजवाडे हे सर्व असूनही संविधानाच्या माध्यमातून सर्व देशाला एका बंधनात बांधण्याची योजना बनवणे कठीण होतं. आजच्या संदर्भात त्याकडे पाहिलं तर संविधानाचं एक पानही आपण लिहू शकलो असतो का? असं सांगतानाच त्यावेळी राष्ट्र पहिलं होतं. परंतु काळानुसार राजकारणाचा प्रभाव वाढला आहे. त्यामुळे कधी कधी देशहितही मागे पडतं आहे, असं मोदी म्हणाले.

संविधान निर्मात्याचीही विचारधारा असेल

संविधान निर्मित्यांचेही स्वत:चे काही विचार असतील. त्यांचीही विचारधारा असेल. त्याला धारही असेल. पण तरीही त्यांनी राष्ट्रहित सर्वोच्च मानून संविधान लिहिलं ही आपल्यासाठी गौरवाची बाब आहे, असंही त्यांनी सांगितलं.

केवळ कलमांचा संग्रह नाही

संविधान हे केवळ कलमांचं संग्रह नाहीये. तर हजारो वर्षांची महान परंपरा, अखंड धारा आणि त्याची आधुनिक अभिव्यक्ती म्हणजे संविधान आहे. आपला जो मार्ग आहे, तो योग्य आहे की नाही याचं दिशादिग्दर्शन संविधानाद्वारे केलं जात आहे. त्यामुळे संविधान मानलं पाहिजे, असं मोदी म्हणाले.

देश वेगळ्या वळणावर

भारत सध्या एका वेगळ्या स्थित जात आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत गेल्यास हे तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे लोकशाहीच्या समर्थकांची चिंता वाढली आहे. त्याचं कारण म्हणजे राजकीय पक्ष आहेत, असंही त्यांनी सांगितलं. भारतीय संविधान म्हणजे केवळ कायदेशीर मार्गदर्शन करणारी व्यवस्था नाही. तर सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचा दस्ताऐवज आहे. त्यामुळे आपल्या संविधान निर्मात्यांना मी प्रणाम करतो, असं लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला यांनी सांगितलं. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांच्यासह सर्व मंत्री आणि खासदार उपस्थित होते.

जवानांना अभिवादन

भाषणाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26/11च्या मुंबईवरील हल्ल्यातील शहिदांना अभिवादन केलं. 26/11ची घटना अत्यंत दु:खद आहे. आपल्यासाठी हा दु:खाचा दिवस आहे. देशाच्या दुश्मनांनी देशात घुसून मुंबईवर हल्ला चढवला. या अतिरेक्यांना कंठस्नान घालताना आपल्या जवानांना वीर मरण आलं. त्या सर्व शहिदांना मी अभिवादन करत आहे, असं मोदी म्हणाले.

 

संबंधित बातम्या:

Pm modi : संविधान दिवसाच्या पंतप्रधानांकडून देशवासियांना शुभेच्छा, पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री म्हणाले…

Maharashtra News LIVE Update | संविधान दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी लाईव्ह

Constitution Day: आम्ही भारताचे लोक…, संविधान दिनाचे महत्त्व काय?; वाचा एका क्लिकवर

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI