Maharashtra News LIVE Update | परळीतील वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सने उडवून देण्याच्या धमकीने खळबळ

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | परळीतील वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सने उडवून देण्याच्या धमकीने खळबळ
ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेटस

गेल्या अनेक दिवसांपासून फरार म्हणून घोषित असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह काल समोर आले. त्यांनी काल कांदिवली गुन्हे शाखा युनिट 11 च्या कार्यालयात हजेरी लावली. यावेळी त्यांची गोरेगावातील वसुली प्रकरणाविषयी चौकशी करण्यात आली. सूत्रांच्या माहितीनुसार सिंह यांची आज पुन्हा एकदा चौकशी होण्याची शक्यता आहे. यासोबतच महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 26 Nov 2021 23:18 PM (IST)

  परळीतील वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सने उडवून देण्याच्या धमकीने खळबळ

  परळी : वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सने उडवून देण्याच्या धमकीने खळबळ

  मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविला

  नांदेडहून पत्र आल्याने मोठी खळबळ

  50 लाख रुपये द्या अन्यथा मंदिर उडवू

  धमकीमुळे मंदिर प्रशासन धास्तावले

  परळी शहर पोलिसात गुन्हा दाखल

 • 26 Nov 2021 21:00 PM (IST)

  जळगाव जिल्ह्यातील यावल आगारातील 10 ते 12 संपकरी कर्मचारी सेवेवर रुजू

  जळगाव : जळगाव जिल्ह्यातील यावल आगारातील 10 ते 12 संपकरी कर्मचारी सेवेवर रुजू

  तीन बसेस 20 दिवसांनंतर पडल्या बाहेर

  आगारातून मार्गस्थ झालेल्या एसटी बसवर अज्ञातांकडून दगडफेक

  तर यावल आगाराबाहेर मनसेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली

  पोलिसांनी घेतले मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात

   

 • 26 Nov 2021 19:30 PM (IST)

  राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा

  जळगाव : राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा

  धुळ्याच्या विशेष न्यायालयाने घरकुल प्रकरणात गुलाबराव देवकर यांना दिलेल्या शिक्षेस मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती

  जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विरोधी उमेदवाराने गुलाबराव देवकर यांच्याविरोधात दाखल केलेली याचिका देखील न्यायालयाने फेटाळली

 • 26 Nov 2021 19:17 PM (IST)

  रोजंदारीवर येणाऱ्या 500 कर्मचाऱ्यांच्या सेवासमात्पीचा निर्णय घेतला – अनिल परब

  कामगार संपावर कायम असतील तर दिलेल्या पगारवाढीचंदेखील काय करायचं यावर सरकारला विचार करावा लागेल. विलीनीकरणाचा मुद्दा आता कोर्टात आहे. मला माझ्या कर्मचाऱ्यांशी घेणंदेणं नाही. संप सुरु असताना वाटाघाटी होणार नाही. कामगारांनी भरकटू नये. संप सुरु राहणं एसटीसाठी हानीकारक आहे. कर्मचारी तसेच एसटीसाठी हे हानीकारक आहे. मी आवाहन करतो की संप संपवून कामावर रुजू व्हावं. कारवाई रोजच सुरु आहे. रोजंदारीवर येणाऱ्या कामगारांवर कारवाई करण्यात आली आहे. आज आम्ही रोजंदारीवर येणाऱ्या 500 कर्मचाऱ्यांच्या सेवासमात्पीचा निर्णय घेतला आहे.

 • 26 Nov 2021 19:13 PM (IST)

  … तर कारवाई करावी लागेल- अनिल परब

  उद्या बऱ्यापैकी एसटी सुरु होतील. उद्या कामगार येत असतील तर आम्ही त्यांना कामावर येण्याची परवानगी देऊ. जर कर्मचारी कामावर आले नाही तर कारवाईचा बडगा उगारावा लागेल. कर्मचाऱ्यांचा कामावर येण्यासाठी प्रतिसाद दिला जात आहे. आम्ही कोणत्याही प्रश्नावर चर्चा करायला तयार आहोत.

 • 26 Nov 2021 19:12 PM (IST)

  कामगारांनी रुजू व्हावं, चर्चेची दारं अजूनही खुली- अनिल परब

  एसटी बंद ठेवणं एसटी महामंडळ तसेच कर्मचाऱ्यांना परवडणारं नाही. कोणाचंहि नुकसान होऊ नये यासाठी कामगारांनी रुजू व्हावं. संप संपल्यानंतर काम सुरु होईल तेव्हा छोट्या-मोठ्या गोष्टींवर चर्चा करता येईल. चर्चाची दारं सुरु आहेत. आम्ही चार पावलं पुढे आलो आहेत. कामगारांनी एसटीचं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. कामगारांचे हक्क अबाधित ठेवणं हे आमचं काम आहे. प्रश्नांचं समाधानकारक उत्तर शोधता येईल.

 • 26 Nov 2021 19:08 PM (IST)

  कोणत्याही कर्मचाऱ्यावर अन्याय होणार नाही, कोणतीही बेशिस्त खपवून घेणार नाही- अनिल परब

  अनिल परब माध्यमांशी बोलत  आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना दिलेली पगारवाढ मूळ वेतनात दिलेली आहे. मूळ पागारामध्ये वेतनवाढ होते. मी कामगार क्षेत्रात काम केलं आहे. आज काही कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळांनी त्यांच्या अडचणी सांगितल्या. कोणत्याही कामगारावर अन्याय होणार नाही. कोणताही कनिष्ठ कामगार वरिष्ठ कामगाराच्या वर जाणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. एसटी महांडळाच्या विलीनीकरणावर चर्चा झाली. काही जाचक अटींवर चर्चा केली जाईल. कर्मचाऱ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही याची खबरदार घेऊ. पण कोणतीही बेशिस्त खपवून गेतली जाणार नाही, याची माहिती आम्ही आज कामगारांच्या शिष्टमंडळाला दिली.

 • 26 Nov 2021 19:02 PM (IST)

  ठाणे जिल्हा महिला बाल कल्याण विभागाकडून डॉक्टरच्या आश्रमावर छापा, 71 मुलांची करण्यात आली सुटका

  कल्याण : ठाणे जिल्हा महिला बाल कल्याण विभागाकडून डॉक्टरच्या आश्रमावर छापा

  आश्रमातून 71 मुलांची करण्यात आली सुटका

  अवैध रित्या 71 मुलांना ठेवल्या आश्रम चालवणं प्रकरणी गुन्हा दाखल

  डोंबिवलीच्या रामनगर पोलिसांनी करीत आहे तपास

  एक लाख रुपयांमध्ये पाच दिवसांच्या बाळाची विक्री प्रकरणी डॉक्टरसह आई वडिलांच्या विरोधात झाला होता गुन्हा दाखल

  डॉ केतन सोनी विरोधात कल्याणच्या बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

 • 26 Nov 2021 18:11 PM (IST)

  राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, कोरोनानं मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकाला 50 हजार सानुग्रह अनुदान

  राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

  कोरोनानं मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकाला 50 हजार सानुग्रह अनुदान देणार

 • 26 Nov 2021 16:49 PM (IST)

  शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या घरावर ईडीचा छापा

  जालना : शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या घरावर ईडीचा छापा

  गेल्या आठ तासापासून अर्जुन खोतकर यांच्या घरी तपासणी सुरू

  गेल्या 8 तासापासून अर्जुन खोतकर यांचीही चौकशी सुरू

  अर्जुन खोतकर यांच्या घरी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीत कारवाई सुरू

  एकूण 12 अधिकाऱ्यांनी टाकल्या दोन ठिकाणी रेड

  रामनगर कारखाना आणि बाजार समीतीतील घोटाळ्याची चौकशी सुरू

 • 26 Nov 2021 16:46 PM (IST)

  अहमदनगरात एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे, शेवगाव आगाराच्या 100 टक्के बसेस पोलीस बंदोबस्तात सुरु

  अहमदनगर : एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे, शेवगाव आगाराच्या 100 टक्के बसेस पोलीस बंदोबस्तात सुरु

  शेवगाव आगारातील 259 कर्मचारी संपावर गेले होते

  100 टक्के मार्गावरील बसेस आज पासून 18 दिवसांनंतर रस्त्यावर धावणार

  शाळकरी विद्यार्थ्यांचा शाळेत येण्या-जाण्यासाठीचा प्रवासाचा प्रश्न सुटला

 • 26 Nov 2021 16:16 PM (IST)

  दिल्लीत संघटनात्मक चर्चा करण्यासाठीच बैठक, कोणताही संघटनात्मक बदल नाही : देवेंद्र फडणवीस

  कुठल्या चर्चेला उधाण आलं याची मला कल्पना नाही. संघटनेची पुढची वाटचाल आणि आढावा यावर आज बैठक झाली. त्यापेक्षा वेगळा अजेंडा नव्हता. दिल्लीला आलो की आम्ही अमित शहा यांना भेटतो. कोणताही संघटनात्मक बदल होणार नाही. काँग्रेस नागपुरात कोणाताही चमत्कार घडवू शकणार नाही. चंद्रशेखर बावनकुळे मोठ्या फरकाने निवडणून येतील.

 • 26 Nov 2021 12:57 PM (IST)

  नाशिक पोलिसांकडून भाजप नेत्यांची धरपकड सुरू

  नाशिक पोलिसांकडून भाजप नेत्यांची धरपकड सुरू

  सातपूर पोलीस ठाण्यात सुरू होता भाजपाचा ठिय्या

  भाजप नेते अमोल इघे यांच्या हत्येनंतर तणाव

 • 26 Nov 2021 12:36 PM (IST)

  नाशिक हत्या प्रकरण आरोपीला तात्काळ अटक करण्याचं पोलिसांचं आश्वासन

  -नाशिक हत्या प्रकरण आरोपीला तात्काळ अटक करण्याचं पोलिसांचं आश्वासन

  -गुन्हा दाखल करण्याचा काम सुरू डीसीपी विजय खरात यांची माहिती

  -अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही

  -तसेच आंदोलन देखील माघे घेणार नाही भाजपची भूमिका

 • 26 Nov 2021 12:31 PM (IST)

  औरंगाबाद शहरात आता पेट्रोल पंपावर लसीकरण सुरू

  औरंगाबाद –

  औरंगाबाद शहरात आता पेट्रोल पंपावर लसीकरण सुरू

  औरंगाबाद शहरातील लसीकरणाचा टक्का वाढवा यासाठी लसीकरण सुरू

  औरंगाबाद शहरातील सर्वच पंपावर लसीकरण सुरू

  लस नाही तर पेट्रोल नाही या मोहिमेनंतर आता पंपावर लसीकरण सुरू

  औरंगाबाद महापालिकेने सुरू केले पेट्रोल पंपावर लसीकरण

  लस घेतली नसेल तर पंपावरच लस टोचून दिलं जातंय पेट्रोल

  पेट्रोल पंपावरील लसीकरणाला वाहनधारक आणि नागरिकांचा चांगला प्रतिसाद

 • 26 Nov 2021 12:15 PM (IST)

  सोलापुरात 12 वाजले तरी एसटीचा एकही कर्मचारी कामावर हजर नाही

  सोलापुरात 12 वाजले तरी एसटीचा एकही कर्मचारी कामावर हजर नाही

  एसटी  कर्मचार्‍यांचे आंदोलन सुरूच

  विलीनीकरणाच्या मागणीवर एसटी कर्मचारी कायम

  दुपारी बारा वाजेपर्यंत कामावर हजर राहण्याची सरकारकडून देण्यात आली होती डेडलाईन

 • 26 Nov 2021 11:40 AM (IST)

  आठमुठेपणा घेऊन जर एसटी सेवा ठप्प केली तर एसटी आणि कर्मचाऱ्यांचं नुकसान – अनिल परब

  अनिल परब –

  जे कर्मचारी कामावर आले आहेत, ज्यांनी या आवाहनाला प्रतिसाद दिलाय, त्यांचं स्वागत करतो

  जो शासनाने निर्णय घेतलाय तो कर्मचाऱ्यांच्या हिताचा

  तरी जर आठमुठेपणा घेऊन, विलीनीकरणावर अडत बसून जर एसटी सेवा ठप्प केली आणि ग्रामीण लोकांचे हाल केले तर यात एसटीचंही नुकसान आहे आणि कर्मचाऱ्यांचही

  एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात भरघोस पगारवाढ दिल्यानंतर त्याला राज्यातील 12 – 13 हजार कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिला

  मला खात्री आहे की कर्मचाऱ्यांची संख्या वाढेल आणि एसटी लवकर पूर्वपदावर येईल

  कोरोनामुळे दोन वर्षात एसटी डबघाईला आली

  वेतननिश्चिती आणि पगारवाढ अशा दोन मुख्य मागण्या कर्मचाऱ्यांच्या होत्या

  आम्ही दिलेली पगारवाढ ही राज्य शासनाच्या जवळपास

  कर्मचाऱ्यांचे पगार महिन्याच्या 10 तारखेच्या आत होतील अशी हमी

  राज्य शासनाने विलीनीकरणाच्या मुद्यावर जीआर दिला

  हायकोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन महामंडळ करु शकत नाही

  विलीनीकरणाच्या मुद्यावर समितीचा अहवाल यायला 12 आठवडे लागतील

  12 आठवड्यापर्यंत संप लांबवता येणार नाही

  समिती जो निर्णय घेईल तो सरकारला मान्य असेल

 • 26 Nov 2021 11:32 AM (IST)

  भारत संकटाच्या दिशेने जातोय – मोदी

  काश्मीर ते कन्याकुमारी, देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात जा, भारत एका अशा संकटाच्या दिशेने जातो आहे जे संविधानाला समर्पित असलेल्या लोकांसाठी चिंतेचा विषय आहे, लोकशाहीप्रती आस्था ठेवणाऱ्यांसाठी चिंतेचा विषय आहे, ते म्हणजे कौटुंबिक पक्ष

  राजकीय पक्ष, पार्टी फॉर द फॅमिली, पार्टी बाय द फॅमिली, यापुढे बोलायची गरज नाही

  योग्यतेच्या आधारे, जनतेच्या आशीर्वादाने कुठल्या कुटुंबातील एक पेक्षा अधिक जण राजकारणात जाऊ शकतात

  पण जो पक्ष पिढ्यानपिढ्या एकच कुटुंब चालवतोय, ज्याची सर्व व्यवस्था कुटुंबाकडे असेल ते स्वस्थ लोकशाहीसाठी सर्वात मोठं संकट आहे

 • 26 Nov 2021 11:27 AM (IST)

  संविधान दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींचं संबोधन

  संविधान दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींचं संबोधन

  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना प्रणाम करण्याचा आजचा दिवस

  २६/११ मधील शहिदांना पंतप्रधान मोदींकडून श्रद्धांजली

  संविधान दिनानिमित्त सर्व महापुरुषांना नमम

 • 26 Nov 2021 10:56 AM (IST)

  नाशिक शासकीय रुग्णालयात तणावपूर्ण वातावरण, भाजप सातपूर मंडल अध्यक्ष अमोल इघे यांच्या हत्येनंतर खळबळ

  नाशिक शासकीय रुग्णालयात तणावपूर्ण वातावरण

  पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात बोलवले अधिकची कुमक

  भाजप सातपूर मंडल अध्यक्ष अमोल इघे यांच्या हत्येनंतर खळबळ

  नातेवाईक आणि कार्यकर्यांची जिल्हा रुग्णालयाच्या आवारात प्रचंड गर्दी

 • 26 Nov 2021 09:36 AM (IST)

  नवी दिल्ली देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील नवी दिल्लीत दाखल

  नवी दिल्ली

  नवी दिल्ली देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील नवी दिल्लीत दाखल

  चंद्रकांत पाटील यांनी अमित शहा यांची घेतली भेट

  राजकीय चर्चांना उधाण

 • 26 Nov 2021 08:39 AM (IST)

  लासलगाव आगर एसटी कर्मचाऱ्यांचे एकोणिसाव्या दिवशीही संप सुरू

  – लासलगाव आगर एसटी कर्मचाऱ्यांचे एकोणिसाव्या दिवशीही संप सुरू

  – 19 दिवसात सव्वा कोटी रुपये च्या उत्पन्नावर एसटी महामंडळाला सोडावे लागले पाणी

  – 136 फेर्यांच्या माध्यमातून 13 हजार किलोमीटरचा होते लासलगांव एसटीचा प्रवास

  – दररोज मिळते सहा लाख रूपयांचे उत्पन्न

 • 26 Nov 2021 08:28 AM (IST)

  एसटी महामंडळाची वसईत आज पहिली बस धावली

  वसई –

  एसटी महामंडळाची वसईत आज पहिली बस धावली

  वसई बस आगारातून सकाळी साडे सातच्या सुमारास निघालेली बस 8 वाजता वसई रोड नवघर बस आगारात पोहचली आहे

  St महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण या मागणीसाठी संपूर्ण राज्यात कर्मचारी यांचा संप सुरू आहे

  दोन दिवसांपासून संपकरी आणि राज्यसरकार मध्ये चर्चा सुरू आहेत, कर्मचाऱ्यांची वेतनवाढ झाली आहे

  पण विलीनीकरण चा मुद्दा प्रलंबित असल्याने अनेक संपकरी कामावर हजर होण्यास तयार नाहीत

  पण आज एक बस वसईत धावल्याने प्रवाशानी आनंद व्यक्त केला आहे

  ज्या प्रमाणे वसईत बस धावली तशीच आता वसईच्या ग्रामीण भागात ही बस सेवा सुरू करावी अशी मागणी होत आहे

 • 26 Nov 2021 08:27 AM (IST)

  जळगाव आगारातील एसटी कर्मचारी संपावर ठाम

  जळगाव

  जळगाव आगारातील एसटी कर्मचारी संपावर ठाम

  विलीनीकरण होत नाही तो पर्यंत एकही बस डेपो बाहेर पडणार नाही

  बस डेपो आवारात शुकशुकाट

 • 26 Nov 2021 07:33 AM (IST)

  नाशिक शहरातील सलग दोन हत्या सत्रा नंतर पोलीस आयुक्तांना आली जाग

  नाशिक शहरातील सलग दोन हत्या सत्रा नंतर पोलीस आयुक्तांना आली जाग..

  पोलिस अधिकाऱ्यांची बोलावली तातडीची बैठक

  तडीपारीचे प्रस्ताव तातडीने बनवण्याचे आदेश

  रेकॉर्ड वरील टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचे देखील आदेश

  म्हसरूळ, अंबड परिसरात अलग दोन हत्या

  तर शहरात सोनसाखळी चोरी,दरोड्याचा घटना सुरूच

 • 26 Nov 2021 07:32 AM (IST)

  पुणे-मुंबई मार्गावरील इंटरसिटी आणि मुंबई-चेन्नई दरम्यानची रेल्वे सेवा 1 डिसेंबरपासून सुरू होणार

  पुणे-मुंबई मार्गावरील इंटरसिटी आणि मुंबई-चेन्नई दरम्यानची रेल्वे सेवा दि.1 डिसेंबरपासून सुरू होणार

  लॉकडाऊनमुळे ही नियमित सेवा स्थगित केली होती

  या दरम्यान विशेष रेल्वे सोडण्यात येत होत्या

  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून पुणे इंटरसिटी दैनंदिन रेल्वे सकाळी 6.40 वाजता सुटणार असून, पुणे येथे 9.57 वाजता पोहोचेल

  तर, पुणे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इंटरसिटी दैनंदिन रेल्वे सायंकाळी 5.55 वाजता सुटेल

  ती मुंबई येथे 9.05 वाजता पोहोचणार

  दादर, ठाणे, लोणावळा आणि शिवाजीनगर येथे रेल्वे थांबणार

 • 26 Nov 2021 07:29 AM (IST)

  सोलापुरात महागड्या सायकल चोरी करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी केली अटक

  सोलापूर – महागड्या सायकल चोरी करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी केली अटक

  संदीप मोरे असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव

  संदीप मोरे कडून 9  सायकली जप्त

  गेल्या काही दिवसांपासून शहरात सुरू होती सायकल चोरी

  सदर बजार पोलिस स्टेशनच्या पोलिसांची कामगिरी

 • 26 Nov 2021 07:28 AM (IST)

  शिवाजी विद्यापीठाचा युवा महोत्सव 20 ते 29 दरम्यान होणार

  कोल्हापूर

  शिवाजी विद्यापीठाचा युवा महोत्सव 20 ते 29 दरम्यान होणार

  यावेळी ऑफलाइन पद्धतीने होणार युवा महोत्सव

  दोन डोस घेतलेल्या विद्यार्थी कलाकारांनाच युवा महोत्सवात सहभागी होता येणार

  सातारा इथल्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयातून या महोत्सवाची होणार सुरुवात

 • 26 Nov 2021 07:25 AM (IST)

  सोलापूर शहरातील खड्ड्यांसाठी पालिकेने पाठविला राज्य सरकारकडे निधीचा प्रस्ताव

  सोलापूर शहरातील खड्ड्यांसाठी पालिकेने पाठविला राज्य सरकारकडे निधीचा प्रस्ताव

  332 रस्त्यांसाठी 130 कोटी रुपये लागणार

  स्मार्ट सिटीच्या कामासाठी शहरात अनेक ठिकाणी खोदण्यात आले आहेत रस्ते

  त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे आहेत अर्धवट

  शहर खड्डेमय झाल्याची सद्यस्थिती

  काही महिन्यात रस्ते करण्याचे वारंवार केले प्रशासनाने वायदे

  आता निधीसाठी महानगरपालिकेने पाठविला राज्य सरकारकडे प्रस्ताव

 • 26 Nov 2021 07:00 AM (IST)

  एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच, सोलापूर विभागातील बस सेवा आजही पूर्णपणे ठप्प

  सोलापूर-

  एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच

  सोलापूर विभागातील बस सेवा आजही पूर्णपणे ठप्प

  वेतनवाढीचा निर्णय झाला असला तरी विलीनीकरणाच्या मागणीवर कर्मचारी ठाम

  विलीनीकरण होईपर्यंत संपत चालू ठेवण्यासाठी कालच एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे शपथ

  एकही कर्मचारी कामावर हजर नाही

 • 26 Nov 2021 06:59 AM (IST)

  नागपूर विभागात संपामुळे एसटीच्या मालवाहू ट्रकचे उत्पन्न झापाट्याने घटलं

  – नागपूर विभागात संपामुळे एसटीच्या मालवाहू ट्रकचे उत्पन्न झापाट्याने घटलं

  – संपामुळे एसटीच्या मालवाहू ट्रकचे १५ दिवसांत सात लाखाचे बुकिंग रद्द

  – एसटीच्या मालवाहू ट्रकचे बुकिंग ८ नोव्हेंबरपासून बंद

  – एसटी संपाचा व्यापारावरंही परिणाम

  – संपामुळे एसटीच्या मालवाहू ट्रकचे उत्पन्नंही झालं बंद

 • 26 Nov 2021 06:58 AM (IST)

  नाशिक किरकोळ कामांसाठी रस्ते फोडणे पडणार महागात

  नाशिक –

  नाशिक किरकोळ कामांसाठी रस्ते फोडणे पडणार महागात

  महापालिकेने वाढवले रस्त्यांचे रिस्टोरेशन चार्ज

  5 टक्के देखरेख खर्च, तर 18 टक्के जीएसटी देखील भरावा लागणार

  शहरातील रस्ते खड्ड्यात गेल्यानंतर महापालिकेला आली जाग

  पालिकेच्या नियम कठोरतेमुळे ठेकेदारांना बसणार चाप

 • 26 Nov 2021 06:44 AM (IST)

  औरंगाबादेत पोलिसांची मोठी कारवाई, तब्बल 600 नशेच्या गोळ्या पोलिसांनी केल्या जप्त

  औरंगाबादेत पोलिसांची मोठी कारवाई

  तब्बल 600 नशेच्या गोळ्या पोलिसांनी केल्या जप्त

  शालेय मुले आणि तरुणांसह इतर नागरीकांना नशेच्या गोळ्या विक्री करत असल्याची शक्यता

  पोलीस उप आयुक्त उज्ज्वला वनकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडाकेबाज कारवाई

  बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या कर्मचार्यांनी केली कारवाई

  2 महिला आरोपी आणि 2 पुरुष आरोपी आढळले या प्रकरणात

 • 26 Nov 2021 06:43 AM (IST)

  औरंगाबाद महानगरपालिका काँग्रेस लढणार स्वतंत्र

  औरंगाबाद –

  औरंगाबाद महानगरपालिका काँग्रेस लढणार स्वतंत्र

  प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी पाठवले पत्र

  काँग्रेस महानगरपालिका निवडणूक लढणार स्वबळावर

  मनपा,नगरपालिका, जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या सर्व निवडणूका काँग्रेस लढणार स्वबळावर

  प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांना पाठवले पत्र

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI