AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुलाल ऐवजी नारळ फेकून मारला, डोक्यातून रक्तच आलं, महाराज जखमी, कथा वाचनाचा कार्यक्रम तडकाफडकी रद्द

कथावाचक पंडीत प्रदीप मिश्रा गेल्या  काही वर्षांपासून बरेच चर्चेत आहेत. ते शिवपुराणावर आधारित कथावाचनाचा कार्यक्रम करतात. ते जिथेही जातात भाविकांची अलोट गर्दी होते. मात्र आता याचा प्रदीप मिश्रांबद्दल एक महत्वाची बातमी समोर आली आहे. कथावाचक पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या डोक्याला दुखापत झालयाने ते जखमी झाले.

गुलाल ऐवजी नारळ फेकून मारला, डोक्यातून रक्तच आलं, महाराज जखमी, कथा वाचनाचा कार्यक्रम तडकाफडकी रद्द
| Updated on: Apr 02, 2024 | 10:00 AM
Share

कथावाचक पंडीत प्रदीप मिश्रा गेल्या  काही वर्षांपासून बरेच चर्चेत आहेत. ते शिवपुराणावर आधारित कथावाचनाचा कार्यक्रम करतात. ते जिथेही जातात भाविकांची अलोट गर्दी होते. मात्र आता याचा प्रदीप मिश्रांबद्दल एक महत्वाची बातमी समोर आली आहे. कथावाचक पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या डोक्याला दुखापत झालयाने ते जखमी झाले आहेत.

आष्टा येथे महादेवाची होळी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तेथे रंग खेळतानाच कोणीतरी नारळ फेकून मारला आणि तो प्रदीप मिश्रा यांच्या डोक्याला लागल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मिश्रा यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र या गंभीर दुखापतीमुळे डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा तसेच काही दिवस तरी कथा वाचनाचा कार्यक्रम न करण्याचा सल्ला दिला आहे.

या दुखापतीमुळे आता पुढील महिनाभर तरी कथावाचनाचा कार्यक्रम होणार नाही. पुढील वर्षी हा कथावाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येईल. त्याचा सर्व खर्च कुबरेश्वर समिती, सिहोर द्वारे करण्यात येईल.

कोण आहेत पंडीत प्रदीप मिश्रा ?

कथावाचक पंडीत प्रदीप मिश्रा गेल्या दोन वर्षांपासून बरेच चर्चेत आहेत. ते शिवपुराणावर आधारित कथावाचनाचा कार्यक्रम करतात. ते जिथेही जातात भाविकांची अलोट गर्दी होते. कथेसोबतचे ते सुखी जीवनासाठी छोटे-छोटे उपायही सांगतात, त्यामुळेही ते लोकप्रिय आहेत. त्यांचा जन्म 1980 साली सिहोरमध्ये झाला. त्यांनी ग्रॅज्युएशन केले आहे.

त्यांचे वडील जास्त शिकलेले नव्हते, त्यांची चहाची गाडी होती, ज्यावर प्रदीप मिश्रा हेदेखील वडिलांची मदत करायचे. मिश्रा यांना लहानपणापासूनच भक्ति भजनात रुची होती, शालेय दिवसातही ते भजन कीर्तन करायचे. ते थोडे मोठे झाल्यावर सिहोर येथील एका ब्राह्मण परिवारातील महिलेने त्यांना कथावाचक बनण्याची प्रेरणा दिली, उद्युक्त केले. त्यांनी त्याचे विधीवत शिक्षण घेतले.

पंडीत प्रदीप मिश्रा यांनी सुरूवातीला शिव मंदिरात वाचन सुरू केले . सिहोरमध्ये त्यांनी कथावाचक म्हणून सुरूवात केली. त्यांचे युट्यूब आणि फेसबूकवर लाखो फॉलोअर्स आहेत. ते बरेच लोकप्रियही आहेत.

Follow Us
कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; स्मित मच्छार....
PM Modi : कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्याला PM मोदींचा सलाम
दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर
Meenakshi Shinde PC : दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत मीनाक्षी शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर प्रकरणावर बोलणं टाळलं...
सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत..
Sachin Kharat : सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत केला गंभीर दावा, पुढे म्हणाले...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं
Delhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं, पोलिसांकडून आंदोलकांना...
शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत
Mumbai : शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत....
पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या
Diveagar Beach Raigad : पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या समुद्रात 8 मुलांचा दुर्दैवी अंत
मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा मीनाक्षी शिंदेंवर थेट निशाणा
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
Rohit Pawar : कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका....
Delhi Protest : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका, इंटरनेट सेवा बंद