National Youth Day | 12 जानेवारीला देशभरात साजरा केला जातो ‘राष्ट्रीय युवा दिन’, वाचा या मागचे कारण…

स्वामी विवेकानंद यांच्या वाढदिवसा दिनी देशातील तरुणांना त्यांच्या विचारांनी प्रोत्साहित करण्यासाठी भारत सरकारने 1984पासून दरवर्षी 12 जानेवारी हा दिवस ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून घोषित केला आहे.

National Youth Day | 12 जानेवारीला देशभरात साजरा केला जातो ‘राष्ट्रीय युवा दिन’, वाचा या मागचे कारण...
Follow us
| Updated on: Jan 12, 2021 | 10:39 AM

मुंबई : देशभरात 12 ऑगस्ट हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी यानिमित्ताने युवकांशी निगडीत विविध पैलूवर चर्चा घडवून आणली जाते. पोर्तुगाल देशातील लिस्बन येथे ऑगस्ट 1998 दरम्यान पार पडलेल्या युवकांशी संबंधित आंतरराष्ट्रीय परिषदेत 12 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा करण्याची शिफारस करण्यात आली आणि त्यावर 17 डिसेंबर 1999 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने शिक्कामोर्तब केले. तेव्हापासून 12 ऑगस्ट हा दिवस युवा दिन म्हणून जगभरातही साजरा करण्यात येतो (National Youth Day 2021 special 65 percent population in india are young).

भारतातील एक महान तत्वज्ञ, आध्यात्मिक आणि सामाजिक नेते स्वामी विवेकानंद यांची आज (12 जानेवारी) जयंती आहे. स्वामी विवेकानंद यांच्या सन्मानार्थ दरवर्षी 12 जानेवारी हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो.

यामागचा इतिहास काय?

महान, आध्यात्मिक आणि तत्वज्ञानी नेते स्वामी विवेकानंद यांच्या वाढदिवसा दिनी देशातील तरुणांना त्यांच्या विचारांनी प्रोत्साहित करण्यासाठी भारत सरकारने 1984पासून दरवर्षी 12 जानेवारी हा दिवस ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून घोषित केला आहे.

आपला भारत देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. देशातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या तरुणांची आहे. खेळापासून बॉलिवूडपर्यंत सगळ्याच क्षेत्रात तरूणांचे वर्चस्व आहे. भारतीय राजकारणातही तरुण पुढे येत आहेत. तरुण प्रत्येक क्षेत्रात चांगले काम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांच्या शक्तीला एकवटून आपले सरकार स्थापन केले आहे. तरुण पिढीने त्यांना उघडपणे मतदान केले होते. आज सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर तरुण मंडळी करतात. फॅशन ट्रेंड असो की बदलती जीवनशैली या सगळ्यातच तरूण पिढीचे वर्चस्व आहे (National Youth Day 2021 special 65 percent population in india are young).

निम्म्याहून अधिक लोकसंख्या तरुणांची!

सळसळत्या रक्ताची तरुण पिढी खूप दमदार आहे. तरुणांमध्ये बरेच काही करून दाखवण्याची क्षमता आहे. प्रत्येक क्षेत्रात तरुण मंडळी आपला गौरव मिरवत आहेत आणि जगभरात भारताचे नाव मानाने उंचावत आहेत. आज केवळ तरुणच समाज आणि देशाचे भविष्य बदलू शकतात. कुटुंब, समाज आणि देशाची जबाबदारी तरूणांच्या खांद्यावर आहे. भारतातील सुमारे 65 टक्के लोकसंख्या तरुणवर्गाची आहे.

देशातील विकासाला स्वत:हून वेग मिळावा यासाठी सरकार तरुणांवर अधिकाधिक लक्ष केंद्रित करत आहे. तरुणांना उत्तेजन देण्यासाठी, त्यांना मजबूत आणि सशक्त बनवण्यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्येही अनेक उपक्रम राबविले जातात. कोणत्याही देशातील तरुणांना त्या देशाचा ‘भविष्यकाळातील निर्माते’ म्हटले जाते. भारताकडून शिकून आज अनेक देश आपल्या देशातील तरूणांची प्रगती व्हावी यासाठी ठोस पावले उचलत आहेत.

(National Youth Day 2021 special 65 percent population in india are young)

हेही वाचा :

Non Stop LIVE Update
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.