Crime : महिलेच्या मेंदूमध्ये 80 वर्षांपासून सुई, आई-बापाकडून घातपाताचा प्रयत्न? डॉक्टरांनाच बसला धक्का
का 80 वर्षाच्या वृद्ध महिलेच्या मेंदूमध्ये चक्क तीन सेंटीमीटर लांब असलेली सुई आढळली आहे. होय, हे ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल पण हे खरं आहे. या महिलेला आत्तापर्यंत याबाबतची माहितीही नव्हती की तिच्या मेंदूमध्ये एवढी मोठी सुई आहे.

नवी दिल्ली : आतापर्यंत आपण अशा अनेक घटना ऐकल्या असतील ज्यामध्ये काही लोकांच्या पोटात केस निघाले, मूत्राशयातून खडे निघाले किंवा पोटातून एखादा मोठा खडा निघाला अशा अनेक धक्कादायक घटना घडल्याचे आपण पाहिले आहे. तर आताही अशीच एक घटना समोर आली आहे जी ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. एका 80 वर्षाच्या वृद्ध महिलेच्या मेंदूमध्ये चक्क तीन सेंटीमीटर लांब असलेली सुई आढळली आहे. होय, हे ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल पण हे खरं आहे. या महिलेला आत्तापर्यंत याबाबतची माहितीही नव्हती की तिच्या मेंदूमध्ये एवढी मोठी सुई आहे. ही घटना ऐकून तुम्हीच नाही तर ती स्वतः महिला देखील चकित झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, असा धक्कादायक प्रकार पूर्वी लहान बाळांच्या हत्या करताना केला जायचा. तर ही वृद्ध महिला लहान असताना तिच्या आई-वडीलांना ती आवडत नव्हती, त्यामुळे ते तिची हत्या करू इच्छित होते. परंतु तिची हत्या करण्यामध्ये त्यांना यश मिळाले नाही. तर या महिलेच्या मेंदूमध्ये सुई होती तेव्हा ती सुई काढली तर आणखीन तिला गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो म्हणून तिने ती सुई न काढण्याचा निर्णय घेतला. तर आत्तापर्यंत ही महिल त्या सुई सोबतच जगत होती.
ही धक्कादायक घटना रुस येथील आहे. पूर्वी अशा घटना अगदी सामान्य मानल्या जायच्या. तेथे जेव्हा दुसरा महायुद्ध झालं होतं त्यावेळी या वृद्ध महिलेच्या आई वडिलांनी तिची हत्या करण्याचा निर्णय घेतला असावा. त्यामुळेच या महिलेच्या मेंदूमध्ये एवढी मोठी सुई आढळली असेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. युद्धादरम्यान तेथील लोक एकदम गरीबी मध्ये राहत होते. तेव्हा एक वेळेस जेवण मिळणं देखील कठीण झालं होतं. तसेच त्यावेळी हत्येचे अपराध लपवण्यासाठी असे धक्कादायक कट रचले जायचे असं म्हटलं जातं.
दरम्यान, आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या महिलेच्या मेंदूच्या उजव्या भागामध्ये समोरील बाजूस ही सुई होती. त्यामुळे तिला कोणताही त्रास झाला नाही. विशेष सांगायचं झालं तर या महिलेने एवढ्या वर्षात एकदाही डोकेदुखीची समस्या असल्याची तक्रार केली नाही. त्यामुळे या महिलेला आयुष्यात कधीही वाटलं नव्हतं की तिच्या मेंदूमध्ये एवढी मोठी सुई असेल.
