AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NEET PG Exam Postponed: नीट पीजी परीक्षा 4 महिन्यांसाठी लांबणीवर, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

NEET PG Exam Postponed: नीट पीजी परीक्षा 4 महिन्यांसाठी लांबणीवर टाकण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे.

NEET PG Exam Postponed: नीट पीजी परीक्षा 4 महिन्यांसाठी लांबणीवर, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
नीट परीक्षा
| Updated on: May 03, 2021 | 3:43 PM
Share

नवी दिल्ली: कोरोना विषाणू संसंर्गाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. पीएमओ ऑफिसच्या माहितीनुसार पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांची उपलब्धता वाढवण्यासाठी महत्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये NEET-PG परीक्षा 4 महिने लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (NEET PG exam postponed for 4 months information given by PMO)

एएनआयचं ट्विट

NEET PG 2021 परीक्षा 18 एप्रिल 2021ला आयोजित केली जाणार होती. कोरोना विषाणू संसर्गामुळे ही परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली होती.  ही परीक्षा देशातील 6,102 सरकारी, खासगी, अभिमत आणि केंद्रीय विद्यापीठांमधील पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशांसाठी आयोजित केली जाते. केंद्र सरकारनं  कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध व्हावेत म्हणून परीक्षा लांबणीवर टाकल्या आहेत.

एमएमबीएसच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना मोबाईल फोनद्वारे आरोग्य विषयक कन्सलटेशन करणे. सौम्य लक्षणं असणाऱ्या कोरोना रुग्णांच्या प्रकृतीची काळजी घेणं. प्राध्यापकांच्या निगराणीखाली त्यांनी ही कामं करायची आहेत. बीएसी आणि जीएनम पात्र असणाऱ्या नर्सेसना पूर्ण वेळ कोविड ड्यूटी करावी लागणार आहे.

प्रधानमंत्र्यांकडून सम्मानपत्र मिळणार

कोरोना काळात जे वैद्यकीय कर्मचारी 100 दिवसांची सेवा पूर्ण करतील. त्या कर्मचाऱ्यांना पंतप्रधान कोरोना राष्ट्रीय सेवा सम्मानानं गौरवण्यात येईल, असं पीएमओकडून कळवण्यात आलं आहे.

नीट परीक्षा कोण देतं?

NEET PG 2021 परीक्षा मेडिकलमध्ये मास्टर्स करण्याची इच्छा असेल, अशा विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाते. या परीक्षेत MBBS आणि BDS चे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. मात्र,त्या विद्यार्थ्यांनी इटर्नशिप पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र त्यांच्याकडे असणं आवश्यक आहे. MBBS हा पदवी आणि MD पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे.

संबंधित बातम्या: 

NEET PG 2021 Admit Card released:नीट पीजी परीक्षेचे ॲडमिट कार्ड जाहीर, डाऊनलोड करण्यसाठी nbe.edu.in ला भेट द्या

NEET PG 2021 Admit Card: नीट पीजी परीक्षेचे ॲडमिट कार्ड जाहीर होणार, डाऊनलोड करण्याच्या सोप्या टिप्स

(NEET PG exam postponed for 4 months information given by PMO)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.