AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत 25 हजारांनी घट, कोरोनाबळीही 2800 च्या खाली

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 2 कोटी 81 लाख 75 हजार 44 वर गेला आहे. (New 127510 Corona Cases )

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत 25 हजारांनी घट, कोरोनाबळीही 2800 च्या खाली
Corona
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Jun 01, 2021 | 9:42 AM
Share

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) सलग काही दिवस मोठी घट पाहायला मिळत आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत 25 हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात 1 लाख 27 हजार 510 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. कालच्या दिवसात 2 हजार 795 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नवे कोरोनाग्रस्त रुग्ण घटतानाच कोरोनाबळींच्या संख्याही कमी झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. तर, कोरोनातून बरे होणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे (New 127510 Corona Cases in India in the last 24 hours)

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 1 लाख 27 हजार 510 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 795 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 2 लाख 55 हजार 287 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 81 लाख 75 हजार 44 वर गेला आहे. देशात 2 कोटी 59 लाख 47 हजार 629 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 3 लाख 31 हजार 895 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 18 लाख 95 हजार 520 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 21 कोटी 60 लाख 46 हजार 638 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 1,27,510

देशात 24 तासात डिस्चार्ज – 2,55,287

देशात 24 तासात मृत्यू – 2,795

एकूण रूग्ण –  2,81,75,044

एकूण डिस्चार्ज –2,59,47,629

एकूण मृत्यू – 3,31,895

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 18,95,520

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 21,60,46,638 (New 127510 Corona Cases)

संबंधित बातम्या :

Covid-19 : लसीचे साईड इफेक्ट्स कमी करण्यासाठी करा या टिप्स फॉलो, कोणतीही अडचण येणार नाही

Corona Cases In India | आनंदाची बातमी! देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी घट, आजपर्यंतच्या सर्वात निच्चांकी रुग्णसंख्येची नोंद

(New 127510 Corona Cases in India in the last 24 hours)

Follow Us
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर