AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनाचा कहर: ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या सर्व विमानसेवा 31 डिसेंबरपर्यंत रद्द; केंद्राचा मोठा निर्णय

ब्रिटनमध्ये कोरोनाचा कहर वाढल्याने ब्रिटनहून भारतात येणाऱ्या सर्व विमानसेवा तूर्तास बंद ठेवण्यात आल्या आहेत. (New coronavirus strain: india government ban international flights to UK)

कोरोनाचा कहर: ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या सर्व विमानसेवा 31 डिसेंबरपर्यंत रद्द; केंद्राचा मोठा निर्णय
हाय रिस्क देशातून आलेले आणखी 6 जण कोरोना संक्रमित
| Updated on: Dec 21, 2020 | 3:46 PM
Share

नवी दिल्ली: ब्रिटनमध्ये कोरोनाचा कहर वाढल्याने ब्रिटनहून भारतात येणाऱ्या सर्व विमानसेवा तूर्तास बंद ठेवण्यात आल्या आहेत. येत्या 31 डिसेंबरपर्यंत ही विमानसेवा बंद ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यूरोपीयन देशांनीही या आधीच ब्रिटनमधून येणाऱ्या विमानसेवेला बंदी घातली होती. (New coronavirus strain: india government ban international flights to UK)

भारत सरकारने ब्रिटनमधून येणारी विमानसेवा 31 डिसेंबरपर्यंत बंद केल्या आहेत. आज रात्री 12 वाजल्यापासून ही सेवा बंद होणार आहे. त्याआधी ब्रिटनहून भारतात येणाऱ्या सर्व प्रवाशांना आरटी-पीसीआर चाचणी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. भारत सरकारने तसं ट्विट करून ही माहिती दिली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ब्रिटनकडे जाणारी आणि ब्रिटनहून येणारी विमानसेवा बंद करण्याची मागणी केली होती. ब्रिटनमध्ये कोरोनाची नवी प्रजाती आढळून आली आहे. ब्रिटनमध्ये कोरोना फैलावत असल्याने भारतातही त्याचा फैलाव होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने तातडीने हा निर्णय घ्यावा, असं आवाहन केजरीवाल यांनी केलं होतं.

ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची नवी प्रजाती आढळून आल्याने जगातील सर्व देशांसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये कोरोना महामारी नियंत्रणाबाहेर जात असल्याचे आरोग्य सचिव मॅट हॅनकॉक यांनी मान्य केले आहे. त्यामुळे अनेक देशांनी ब्रिटनला जाणारी विमानं रद्द केली आहेत. या नव्या कोरोना व्हायरसमुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही आज आपत्कालीन बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर केंद्र सरकारने ब्रिटनहून येणाऱ्या आणि ब्रिटनला जाणाऱ्या सर्व विमानसेवा 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांवर बंदी

दरम्यान, कोरोना व्हायरसची नवी प्रजाती आढल्यामुळे जगातील सर्व देश सतर्क झाले आहेत. युरोपमधील बहुतांश देशांनी ब्रिटनमधून येणारी सर्व विमान उड्डाणं रद्द केली आहेत. तसेच, जर्मनीसुद्धा ब्रिटनहून येणाऱ्या विमानांवर बंदी घालण्याचा विचार करत आहे. नेदरलँडने डिसेंबर महिन्यापर्यंत ब्रिटनमधील विमानाला देशात उतरण्यास बंदी असल्याचे जाही केले आहे.

ऑस्ट्रिया, इटलीकडूनही खबरदारीचा उपाय

ऑस्ट्रिया आणि इटली या देशांकडूनही खबरदरी घेण्यात येत आहे. ब्रिटनहून येणारे विमान देशात उतरण्यावर बंदी घालण्याचा विचार या देशांकडून सुरु आहे. इटलीचे परराष्ट्रमंत्री लुइगी डी मायो यांनी आवश्यक ते उपाय करण्याची गरज व्यक्त केली आहे.

नवा कोरोना व्हायरस किती घातक?

कोरोना व्हायरसची नवी प्रजाती आढळल्यामुळे जगभरात तर्क-वितर्क लावले जात आहेत. तो किती घातक असावा?, त्याच्या प्रसाराची क्षमता अशी अशावी?, याबद्दल अनेक तर्क लावले जात आहेत. याविषयी बोलताना बीबीसीचे खास आरोग्यविषयक पत्रकार जेम्स लॅलेगर यांनी अधिक माहिती दिली आहे. ‘नव्या कोरोना व्हायरसला समजून घेण्यासाठी कोरोना व्हायरसमध्ये झालेले बदल समजून घ्यावे लागतील. व्हायरसमध्ये झालेला बदल हा स्वाभाविक आहे. जास्त संक्रमणासाठी कोणताही व्हायरस स्व:तला बदलून घेत असतो. तसेच कोरोना व्हयरसच्या बाबतीत झाले आहे,” असे लॅलेगर यांनी सांगितलं. (New coronavirus strain: india government ban international flights to UK)

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर कोरोना लस प्रभावी ठरेल?

2020च्या वर्षात कोरोना आला, त्यानं पाय पसरले, सगळ्या जगाला कवेत घेतलं, सगळं जग ठप्प केलं, अनेकांनी जीव गमावला, आता 2020 च्या शेवटी कोरोना लस तयार झाल्या आहेत. लवकरच या लस अनेकांना टोचल्या जातील. मात्र या लस कोरोना लस कोरोना स्ट्रेनवर प्रभावी ठरलीत? याच प्रश्नाचं उत्तर आता शास्रज्ञ शोधत आहेत. ब्रिटीश शास्रज्ञांच्या म्हणण्यानुसार नवीन कोरोना स्ट्रेनवर सध्याची कोरोना लस प्रभावी ठरेल. ही लस लोकांची प्रतिकारशक्ती वाढवणार आहे. त्यामुळं कोरोनाचा सामना ते सहजरितीने करु शकतात. मात्र, कोरोनाचे नवनवे स्ट्रेन येत राहिले तर ती डोकेदुखी ठरु शकते असंही तज्ज्ञांचं मत आहे. (New coronavirus strain: india government ban international flights to UK)

 संबंधित बातम्या:

कोरोनाचा जीवघेणा अवतार आणि त्याची संपूर्ण माहिती, स्पेशल रिपोर्ट

कोरोना व्हायरसच्या नव्या प्रजातीमुळे ब्रिटनमध्ये खळबळ, भारतातही आरोग्य मंत्रालयाची महत्त्वाची बैठक

ब्रिटनमध्ये कोरोनाचे नवे रुप, रुग्ण वाढले, ख्रिसमसच्या आनंदावरही मर्यादा

(New coronavirus strain: india government ban international flights to UK)

Follow Us
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!
ठाकरे गटाला धक्का देत शिंदेंनी सचिन अहिरांना दिली उपसभापती पदाची...
ठाकरे गटाला धक्का देत शिंदेंनी सचिन अहिरांना दिली उपसभापती पदाची उमेदवारी; बिनविरोध निवड होताच केलं मोठं विधान