CJP Protest : राजधानी दिल्लीत इंटरनेट सेवा होणार स्थगित, गृह मंत्रालयाची मंजुरी; दूरसंचार कंपन्यांना निर्देश
राजधानी दिल्लीत इंटरनेट सेवा स्थगित करण्यात येणार आहे. ९ ऑक्टोबर रात्री १० ते १० ऑक्टोबर रात्री १० वाजेपर्यंत जनपथ आणि कर्तव्य पथ चौकाच्या ४ किलोमीटर परिसरात इंटरनेट सेवा स्थगित करण्यात येईल. केंद्रीय गृह मंत्रालयाने या तात्पुरत्या बंदीला मंजुरी दिली आहे.

कॉकरोच जनता पार्टीने (CJP) उद्या जंतरमंतरवर आंदोलनाची हाक दिली असून त्या पार्श्वभूमवीर वातावरण तापू लागलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सीजेपीतर्फे उद्या जंतरमंतरवर आंदोलन करण्यात येणार आहे. याचदरम्यान राजधानी दिल्लीतून एक महत्वाची अपडेट समोर येत आहे. उद्याच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कडक पावलं उचलली जात आहेत. अनेक मेट्रो स्टेशन्स बंद आणि अनेक रेल्वे रद्द करण्याच्या निर्णयानंतर आता राजधानी दिल्लीत इंटरनेट सेवा स्थिगत करण्यात येणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव नवी दिल्लीत काही भागांमध्ये इंटरनेट सेवा स्थगित करण्यात येईल केंद्रीय गृह मंत्रालयाने या निर्णयाला मंजुरी दिली असून, दिल्ली पोलिसांनी संबंधित दूरसंचार कंपन्यांना आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. जनपथ आणि कर्तव्य पथ चौकाच्या आसपासच्या 4 किलोमीटरच्या परिघात इंटरनेट सेवा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
4 किलोमीटरच्या परिघात इंटरनेट राहणार बंद
मिळालेल्या माहितीनुसार, आज, म्हणजेच 9 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजल्यापासून ते उद्यास शनिवार 10 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजेपर्यंत, म्हणजेच सलग 24 तास या परिसरातील मोबाइल इंटरनेट सेवा बंद राहणार आहे. जनपथ आणि कर्तव्य पथ चौकाच्या आसपासच्या निश्चित क्षेत्रात या निर्बंधांची अंमलबजावणी केली जाईल आहे. या आदेशानुसार, संबंधित परिसरातील सर्व प्रकारच्या मोबाइल इंटरनेट सेवा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये इंटरनेट डेटा सेवा पुरवणाऱ्या प्रमुख दूरसंचार कंपन्यांचा समावेश आहे.
दिल्ली पोलिसांनी एअरटेल, व्होडाफोन-आयडिया, रिलायन्स जिओ आणि एमटीएनएल (MTNL) या कंपन्यांना आवश्यक ती कार्यवाही करून आदेशाचे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
मेट्रो कधीपासून बंद ?
शुक्रवार रात्री 9 वाजल्यापासून शनिवारपर्यंत 57 मेट्रो स्टेशन्समधील एंट्री आणि एग्झिट गेट बंद करण्यात येणार आहेत. दिल्ली मेट्रोच्या रेड लाईनवर 10 स्टेशन बंद असतील. सगळ्यात जास्त मेट्रो स्टेशन यलो लाईनवर बंद आहेत. येथे उद्यापर्यंत 20 मेट्रो स्टेशन बंद असतील, अशी माहिती मिळत्ये.
