New Delhi Lockdown extend : दिल्लीत एका आठवड्यासाठी लॉकडाऊन वाढवला, मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

| Updated on: Apr 25, 2021 | 1:00 PM

नवी दिल्लीत वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेला लॉकडाऊन आणखी एक आठवड्यांसाठी वाढवण्यात आला आहे. New Delhi Lockdown extended for one week

New Delhi Lockdown extend : दिल्लीत एका आठवड्यासाठी लॉकडाऊन वाढवला, मुख्यमंत्र्यांकडून घोषणा
new delhi lockdown
Follow us on

नवी दिल्ली : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत लागू करण्यात आलेला लॉकडाऊन आणखी एक आठवड्यांसाठी वाढवण्यात आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याबाबतची घोषणा केली आहे. (New Delhi Lockdown extended for one week)

देशातील कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. नवी दिल्लीत कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील राज्य सरकारने 19 एप्रिलला एक आठवड्यासाठी लॉकडाऊन लागू केला होता. हा लॉकडाऊन उद्या 25 एप्रिलपर्यंत लागू होता. पण तरीही कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने हा लॉकडाऊन एक आठवड्यांसाठी वाढवला आहे. यानुसार येत्या 3 मे पर्यंत नवी दिल्लीत लॉकडाऊन असणार आहे.


अरविंद केजरीवाल काय म्हणाले? 

नवी दिल्लीत कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत सोमवारी 3 एप्रिल सकाळी 5 पर्यंत लॉकडाऊन लागू राहणार आहे. लॉकडाऊनदरम्यान कोरोना रुग्णवाढीचा वेग 36 – 37 टक्के इतका झाला आहे. दिल्लीत यापूर्वी कोरोना रुग्णवाढीचा वेग इतका नव्हता. गेल्या एक दोन दिवसापूर्वी हा वेग थोडा कमी झाला आहे. आजही कोरोना रुग्णवाढीचा वेग 30 टक्के झाला आहे, अशी माहिती नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली.

दिल्ली सद्यस्थितीत 700 टन ऑक्सिजनची गरज आहे. आम्हाला केंद्र सरकारकडून 480 टन ऑक्सिजन देण्यात आले आहे. उद्या केंद्र सरकार 10 टन ऑक्सिजन पाठवणार आहे. त्यानंतर केंद्राकडून नवी दिल्लीला 490 टन ऑक्सिजन मिळाले आहे. मात्र अद्याप यातील केवळ 330-335 टन ऑक्सिजन दिल्लीत पोहोचला आहे. केंद्र सरकारकडून खूप पाठिंबा मिळत आहे. केंद्र आणि दिल्ली सरकार एकत्र काम करत आहेत, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.

दिल्लीत कोरोनाबाधितांचा आकडा वाढता 

दरम्यान काल दिल्लीत एका दिवसात सर्वाधिक 357 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता. तर 24000 हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. तर दिल्लीत कोरोना रुग्णवाढीचा वेग हा 32.27 इतका झाला आहे.

दिल्लीत कोरोनाबाधितांचा एकूण आकडा हा एक लाखांच्या आसपास पोहोचला आहे. सध्या दिल्लीत 93 हजार 080 अॅक्टिव्ह कोरोनाबाधित आहेत. तर 22 हजार 695 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.  (New Delhi Lockdown extended for one week)

संबंधित बातम्या : 

यंत्रणा कोलमडून पडल्या आहेत, आता ‘जन की बात’ करा; राहुल गांधींनी मोदींना डिवचले

मोठी बातमी! फुफ्फुसाच्या इन्फेक्शनमुळे सुप्रीम कोर्टाचे जज एम.शांतनगौदर यांचं निधन