AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवी दिल्लीत भूकंपाचे जोरदार धक्के, साखर झोपेत असलेल्या दिल्लीकरांमध्ये भीतीचे वातावरण

दिल्लीतील अनेक भागांमध्ये लोक घाबरून घराबाहेर, इमारतींखाली रस्त्यावर उभे असल्याचे चित्र पाहायला मिळाले. यामुळे दिल्लीत भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.

नवी दिल्लीत भूकंपाचे जोरदार धक्के, साखर झोपेत असलेल्या दिल्लीकरांमध्ये भीतीचे वातावरण
Delhi earthquake
| Updated on: Feb 17, 2025 | 10:23 AM
Share

देशाची राजधानी नवी दिल्ली आणि एनसीआर परिसराला आज पहाटे भूकंपाचा जोरदार धक्का बसला. सोमवारी पहाटे 5 वाजून 36 मिनिटांनी नवी दिल्लीत भूकंपाचे हादरे बसले आहेत. या भूकंपाची तीव्रता 4.3 रिक्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. यामुळे दिल्लीतील जनता साखर झोपेत असताना अनेकजण खडबडून जागे झाले. यामुळे दिल्लीकरांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत पहाटे ५.३६ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. याचे केंद्र दिल्लीच्या जवळच जमिनीपासून ५ किलोमीटर खोलीवर होते. हा भूकंप दिल्ली-एनसीआरमध्ये २८.५९ उत्तर अक्षांश, ७७.१६ पूर्व रेखांश, ५ किमी खोलीवर झाला.

तात्काळ घराबाहेर पडण्यास सुरुवात

दिल्लीत अचानक झालेल्या या भूकंपामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पहाटे साखरझोपेत असताना अचानक जमीन हलत असल्याचे जाणवण्यास सुरुवात झाली. यानंतर दिल्लीकरांनी खबरदारी म्हणून तात्काळ घराबाहेर पडण्यास सुरुवात केली. दिल्ली-एनसीआरसह शेजारील राज्यांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. सुदैवाने या भूकंपामुळे कुठेही जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही.

कोणतीही जीवितहानी नाही

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाचे केंद्र दुर्गाबाई देशमुख विशेष शिक्षण महाविद्यालयाजवळील धौला कुआं या ठिकाणी होते. पहाटे ५:३६ वाजता झालेला हा भूकंप पाच किलोमीटर खोलीवर होता. सुदैवाने, यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दर 2 ते 3 वर्षांनी भूकंप

नवी दिल्लीतील हा भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या भागाजवळ एक तलाव आहे. या ठिकाणी दर दोन ते तीन वर्षांनी भूकंप होतात. एका अधिकाऱ्याने सांगितले की, २०१५ मध्येही या भागात ३.३ तीव्रतेचा भूकंप झाला होता. या भूकंपामुळे दिल्ली, नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमधील अनेक उंच इमारतीमधील लोक घराबाहेर पडले.

दिल्ली पोलिसांनी याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. आम्हाला आशा आहे की तुम्ही सर्व सुरक्षित असाल. आपत्कालीन परिस्थितीत ११२ हेल्पलाइनवर कॉल करा, असे आवाहन दिल्ली पोलिसांनी केले आहे.  

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.