AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

New Parliament Cost : नवीन संसदेचा श्रीगणेशा! लोकशाहीर मंदिरासाठी इतक्या हजार कोटींचा खर्च

New Parliament Cost : 10 डिसेंबर 2020 रोजी नवीन संसद भवनाचा कोनशिला ठेवण्यात आली. 64,500 चौरस मीटरवर हे नवीन लोकशाही मंदिर स्थापित करण्यात आले आहे.

New Parliament Cost : नवीन संसदेचा श्रीगणेशा! लोकशाहीर मंदिरासाठी इतक्या हजार कोटींचा खर्च
| Updated on: Sep 19, 2023 | 2:16 PM
Share

नवी दिल्ली | 19 सप्टेंबर 2023 : नवीन संसद भवनाचा (New Parliament) आज श्रीगणेशा झाला. मंगळवारी 19 सप्टेंबर 2023 रोजी कामकाज सुरु झाले. जुन्या संसद भवनातून नवीन संसद भवनाचा हा प्रवास सर्वांसाठी संमिश्र होता. प्रत्येकाला जुन्या आठवणी दाटून आला होता. तर नवीन युगाची सुरुवात या संसद भवनातून भारत पाहत आहे. 10 डिसेंबर 2020 रोजी नवीन संसद भवनाची कोनशिला ठेवण्यात आली. 64,500 चौरस मीटरवर हे नवीन लोकशाही मंदिर स्थापित करण्यात आले आहे. यामध्ये एकूण 1280 सदस्यांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हे भव्य दिव्य लोकशाही मंदिर पाहिल्यानंतर हे तयार करण्यासाठी किती खर्च (New Parliament Building Cost) आला, याची चर्चा सुरु झाली आहे. या नवीन लोकशाही मंदिरांची ही वैशिष्ट्ये तुम्हाला माहिती आहे का?

नवीन भवनात अशी आसन व्यवस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षी मे महिन्यात नवीन संसद भवनाचे उद्धघाटन केले होते. या विशाल भवनात लोकसभेचे 888 सदस्य तर राज्यसभेचे 300 सदस्यांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दोन्ही सभागृहातील सदस्य एकत्र आले तर 1280 सदस्य एकत्रित बसतील.  महिलांसाठी 33 टक्के आरक्षणाचा ठराव झाल्यास त्यासाठी पण हे नवीन संसद तयार असेल. नवीन संसद सदस्यांची बसण्याची व्यवस्था होऊ शकते.

971 कोटी रुपयांचा प्रकल्प

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 डिसेंबर 2020 रोजी नवीन संसदेची कोनशिला ठेवली होती. तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीत ही नवीन इमारत तयार झाली आहे. ही इमारत चार मजली आहे. इमारत त्रिकोणी आकाराची आहे. जुन्या इमारतीपेक्षा नवीन इमारत जवळपास 17,000 चौरस मीटर आहे. या इमारतीवर भूकंपाचा कुठलाही परिणाम होणार नाही. या नवीन संसद भवनाचे काम Tata Projects ला देण्यात आले होते. लोकशाहीच्या मंदिरासाठी 971 कोटी रुपयांचा खर्च आला.

या कारणामुळे वाढली किंमत

टाटा प्रोजेक्ट्सने जोमात कामाला सुरुवात केली होती. जानेवारी 2022 रोजी या प्रकल्पासाठी 200 कोटी रुपये वाढली. स्टील आणि इतर वस्तूंच्या किंमती वाढल्या. इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर कार्यासाठी मोठा खर्च आला. सेंट्रल पब्लिक वर्क डिपार्टमेंटने 200 कोटी रुपयांचा खर्च वाढला. या नवीन इमारतीसाठी 1200 कोटींचा खर्च आला आहे.

अशी आहे रचना

  • नवीन संसदेला सहा महाप्रवेशद्वार
  • तीन अश्व, गज आणि गरुड असे औपचारिक दरवाजा
  • धिकारी-कर्मचाऱ्यांची कार्यालये हायटेक आहेत
  • कॅफे, डायनिंग एरिया, समिती बैठकीसाठी विविध खोल्या
  • कॉमन रुम्स, महिलांसाठी लाऊंज आणि VIP लाऊंजची व्यवस्था
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.