AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इथेनॉलमुळे पेट्रोल-डिझेलच्या भावात बदल? जाणून घ्या आजचा भाव..

इथेनॉल आणि साखरेच्या वाढत्या किमतींवर सरकारने स्पष्टीकरण दिल्यानंतर, पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर पहिल्यांदाच जाहीर करण्यात आले आहेत. चला तर मग जाणून घेऊयात की 22 ऑगस्ट रोजी पेट्रोल आणि डिझेलचे दर काय होते.

इथेनॉलमुळे पेट्रोल-डिझेलच्या भावात बदल? जाणून घ्या आजचा भाव..
petrol and diesel prices
| Updated on: Aug 22, 2026 | 11:55 AM
Share

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती हा सर्वसामान्यांच्या रोजच्या जीवनाशी थेट संबंधित असलेला विषय मानला जातो. कारण इंधनाच्या दरवाढीचा परिणाम वाहतूकीच्या खर्चावर सुद्धा होत असतो. त्यातच इथेनॉलवर सरकारचे स्पष्टीकरण तसेच साखरेच्या दरवाढीची चर्चा आणि त्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या किमतींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज शनिवार 22 ऑगस्ट रोजी देशातील इंधनाचे दर जाहीर झाले असून, पेट्रोल-डिझेल महागले की स्वस्त झाले, की दर जैसे थेच राहिले? आजचे दर काय आहेत जाणून घेऊयात.

पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणते बदल झाले आहेत?

22 ऑगस्ट रोजी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहिले आहेत. दिल्लीत पेट्रोल 102.12 रूपये तर डिझेल 95.20 रूपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोल 111.21 रूपये आणि डिझेल 97.83 रूपये प्रति लिटर विकले जात आहे.

पेट्रोल-डिझेलच्या दरात शेवटची मोठी वाढ 25 मे रोजी झाली होती. त्यावेळी पेट्रोल 2.61 रूपयांनी आणि डिझेल 2.71 रूपयांनी प्रति लिटर महागले होते. त्यानंतर देशातील प्रमुख शहरांमध्ये इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात स्थिर आहेत.

सरकारने इथेनॉलमुळे साखर महागल्याचा दावा फेटाळला

पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याच्या धोरणामुळे साखरेच्या किमती वाढत असल्याचा दावा सरकारने फेटाळून लावला आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, इथेनॉलसाठी साखरेचा वापर उलट कमी होत आहे. 2022-23 मध्ये साखरेचा सुमारे 12% हिस्सा इथेनॉलसाठी वापरला जात होता, तो 2025-26 मध्ये सुमारे 9% पर्यंत कमी होण्याचा अंदाज आहे.

याशिवाय, देशातील जवळपास 75% इथेनॉल आता धान्यांपासून, विशेषतः मक्यापासून तयार केले जाते. त्यामुळे साखरेच्या दरवाढीला केवळ इथेनॉल धोरण जबाबदार असल्याचे म्हणणे योग्य नसल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

सरकारच्या मते, देशांतर्गत साखरेचे अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन, सणांपूर्वी वाढलेली मागणी, हवामानामुळे ऊस पिकाचे झालेले नुकसान, जागतिक बाजारातील पुरवठ्याची कमतरता तसेच साठेबाजी आणि सट्टेबाजी यांसारख्या अनेक कारणांमुळे साखरेच्या किमती वाढल्या आहेत.

भारतामध्ये दरवर्षी साधारण 320 ते 340 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन होते, तर देशांतर्गत मागणी सुमारे 280 ते 290 लाख मेट्रिक टन असल्याचे सरकारने सांगितले आहे.

Follow Us
पुण्यात रहुल गांधी येण्याआधीच दोन विद्यार्थी संघटनांमध्ये मोठा राडा,
पुण्यात रहुल गांधी येण्याआधीच दोन विद्यार्थी संघटनांमध्ये मोठा राडा, चक्क बुटाने...
शानदार लाइटिंग, मोठमोठे बॅनर अन्... राहुल गांधींच्या मोहिमेची तयारी
Rahul Gandhi | शानदार लाइटिंग, मोठमोठे बॅनर अन्... पुण्यात राहुल गांधींच्या 'छात्रो की गूंज' मोहिमेची समर्थकांकडून जय्यत तयारी
भाजपच्या पायाखालील वाळु सरकलेय, आता सप्टेंबरपासून पडझड...
भाजपच्या पायाखालीची वाळु सरकलेय, आता सप्टेंबरपासून पडझड... संजय राऊतांचं अजब भाकित
ठाकरेंच्या विश्वासू नेत्याचा सर्व समर्थकांचा शिंदे गटात पक्ष प्रवेश,
ठाकरेंच्या विश्वासू नेत्याचा सर्व समर्थकांचा शिंदे गटात पक्ष प्रवेश, नितेश राणेंनी दिला धक्का
ठाकरे गटाला मोठा धक्का! महिला नेत्याचं जात प्रमाणपत्र अचानक रद्द
ठाकरे गटाला मोठा धक्का! महिला नेत्याचं जात प्रमाणपत्र अचानक  रद्द, पदावर टांगती तलवार
धारशिवमधील आश्रम शाळेची दुरावस्था समोर, ओमराजेंनी दिली भेट
Omraje Nimbalkar : धारशिवमधील आश्रम शाळेची दुरावस्था समोर, ओमराजेंनी दिली भेट
सुषमा अंधारे यांचा चित्रा वाघ यांना टोला
सुषमा अंधारे यांचा चित्रा वाघ यांना टोला: कार्यकाळ संपतोय म्हणून उसने अवसान?
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार: गुंतवणूक आणि कौशल्य विकासाला बळ
स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
मुंबई एफडीएची मोठी कारवाई; स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर कारवाई करा, युवासेनेचा इशारा
मीरा-भाईंदरमध्ये झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर, अल्पवयीन चालकांवर कारवाईची युवासेनेची मागणी