AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमान खानच्या जीमला भीषण आग, अग्निशमन दलाचं ऑपरेशन… मोठी अपडेट समोर

अभिनेता सलमान खान याच्या जीमला भीषण आग लागली आहे. घटनेची माहिती समोर येताच, , अग्निशमन दलाच्या मोठ्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं.. आता या प्रकरणाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे.

सलमान खानच्या जीमला भीषण आग, अग्निशमन दलाचं ऑपरेशन... मोठी अपडेट समोर
अभिनेता सलमान खान
| Updated on: Aug 22, 2026 | 11:47 AM
Share

बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच अभिनेता सलमान खान याच्या जीमला अचानक आग लागल्याची माहिती समोर आली आहे. समोर येत असलेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना गुरुवारी रात्री दक्षिण दिल्लीतील ‘ग्रेटर कैलास-1’ या उच्चभ्रू भागात घडली. येथील एका जिममध्ये लागलेल्या आगीमुळे परिसरात घबराट पसरली. सुदैवाने, पोलीस आणि अग्निशमन दलाची पथके वेळीच घटनास्थळी पोहोचल्याने मोठी दुर्घटना टळली आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पीटीआयच्या वृत्तानुसार, ही घटना गुरुवारी रात्री सव्वा-दहाच्या सुमारास घडली. जिमच्या पहिल्या मजल्यावरून अचानक आगीच्या ज्वाळा वर येताना दिसताच तेथे घबराट पसरली. माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनी पावलं उचलली आणि अग्निशमन दलाचं पथक पोहोचण्यापूर्वीच जिममधील सर्व लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढलं. यामध्ये कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. पोलिसांच्या कारवाईनंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या; त्यांनी वेळेत आगीवर नियंत्रण मिळवलं. पण घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

पोलिसांकडून कसून चौकशी समोर…

सुरुवातीच्या तपासात असं समोर आलं आहे की, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असेल. पण पोलीस आणि फायर विभाग आग लागण्यामागचं नेमकं कारण काय? याचा कसून शोध घेत आहे. समोर येत असलेल्या माहितीनुसार, ही जिम सलमान खानच्या स्वतःच्या फिटनेस ब्रँडअंतर्गत चालवली जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सलमान खानला देशातील एक प्रमुख ‘फिटनेस आयकॉन’ मानला जाता आणि तो कायम त्याच्या चाहत्यांना तंदुरुस्त राहण्याचा सल्ला देत असतो. नुकताच, त्याने सोशल मीडियावर आपल्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो शेअर केले, ज्यांनी त्याच्या चाहत्यांना थक्क केलं. अभिनेता कायम सिनेमे आणि फिटनेसमुळे चर्चेत असतो.

समोर येत असलेल्या अधिक माहितीनुसार पोलिसांनी प्रभावित क्षेत्राला सील केलं आहे. एवढंच नाही तर, फोरेंसिक आणि तांत्रिक टीम घटनास्थळाची पाहणी करत आहेत. प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे दिसून येत असलं, तरी अधिकृत तपास पूर्ण झाल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. असं देखील सांगण्यात येत आहे.

Follow Us
पुण्यात रहुल गांधी येण्याआधीच दोन विद्यार्थी संघटनांमध्ये मोठा राडा,
पुण्यात रहुल गांधी येण्याआधीच दोन विद्यार्थी संघटनांमध्ये मोठा राडा, चक्क बुटाने...
शानदार लाइटिंग, मोठमोठे बॅनर अन्... राहुल गांधींच्या मोहिमेची तयारी
Rahul Gandhi | शानदार लाइटिंग, मोठमोठे बॅनर अन्... पुण्यात राहुल गांधींच्या 'छात्रो की गूंज' मोहिमेची समर्थकांकडून जय्यत तयारी
भाजपच्या पायाखालील वाळु सरकलेय, आता सप्टेंबरपासून पडझड...
भाजपच्या पायाखालीची वाळु सरकलेय, आता सप्टेंबरपासून पडझड... संजय राऊतांचं अजब भाकित
ठाकरेंच्या विश्वासू नेत्याचा सर्व समर्थकांचा शिंदे गटात पक्ष प्रवेश,
ठाकरेंच्या विश्वासू नेत्याचा सर्व समर्थकांचा शिंदे गटात पक्ष प्रवेश, नितेश राणेंनी दिला धक्का
ठाकरे गटाला मोठा धक्का! महिला नेत्याचं जात प्रमाणपत्र अचानक रद्द
ठाकरे गटाला मोठा धक्का! महिला नेत्याचं जात प्रमाणपत्र अचानक  रद्द, पदावर टांगती तलवार
धारशिवमधील आश्रम शाळेची दुरावस्था समोर, ओमराजेंनी दिली भेट
Omraje Nimbalkar : धारशिवमधील आश्रम शाळेची दुरावस्था समोर, ओमराजेंनी दिली भेट
सुषमा अंधारे यांचा चित्रा वाघ यांना टोला
सुषमा अंधारे यांचा चित्रा वाघ यांना टोला: कार्यकाळ संपतोय म्हणून उसने अवसान?
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार: गुंतवणूक आणि कौशल्य विकासाला बळ
स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
मुंबई एफडीएची मोठी कारवाई; स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर कारवाई करा, युवासेनेचा इशारा
मीरा-भाईंदरमध्ये झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर, अल्पवयीन चालकांवर कारवाईची युवासेनेची मागणी