वंदे भारत ट्रेनमध्ये विमानपेक्षा अधिक सुविधा, या सहा मार्गांवर धावणार ट्रेन

Vande Bharat Express | वंदे भारत एक्स्प्रेस देशात चांगलीच लोकप्रिय झाली आहे. विविध राज्यातून ही एक्स्प्रेस सोडण्याची मागणी वाढत आहे. आता वंदे भारत सेमीहायस्पीड ट्रेनमध्ये विमानासारख्या सुविधा दिल्या जाणारा आहे. नवीन सहा मार्गावर या सुविधा दिल्या जाणार आहेत

वंदे भारत ट्रेनमध्ये विमानपेक्षा अधिक सुविधा, या सहा मार्गांवर धावणार ट्रेन
Vande Bharat luxuryImage Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 28, 2023 | 7:36 AM

नवी दिल्ली, दि. 28 नोव्हेंबर 2023 | वंदे भारत (Vande Bharat Train ) एक्स्प्रेस अल्पवधीत देशवासियांची पसंत ठरल आहे. या रेल्वेने वेगवान आणि आरामदायक प्रवास होत असल्यामुळे या गाडीची मागणी वाढत आहे. देशात वंदे भारत एक्स्प्रेसची संख्या 200 पर्यंत वाढण्यात येणार आहे. या रेल्वेमुळे भारतीय रेल्वेचा चेहरामोहरा बदलला आहे. आता वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये आणखी एक मोठा बदल केला जात आहे. विमानात मिळाणाऱ्या सर्व सुविधा या ट्रेनमध्ये दिल्या जाणार आहेत. भारतीय रेल्वेने हा पायलेट प्रोजेक्ट ‘यात्री सेवा अनुबंध’ म्हणून जाहीर करण्याची घोषणा केली आहे.

कोणत्या मार्गावर सुविधा

चेन्नई-म्हैसूर रूट, चेन्नई-तिरुनलवेली, चेन्नई-कोयंबट्टूरर, तिरुवनंतपूरम-कासरगोड, चेन्नई-विजयवाडा या मार्गांवर विमानाप्रमाणे सुविधा देण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. सहा मार्ग अजून निश्चित झालेला नाही. या मार्गावरुन वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्यांना खाण्याचे आणि पिण्याचे अनेक पर्याय उपलब्ध करुन दिले जाणार आहे. प्रवास अधिक चांगला करण्यासाठी प्रवाशांना गरजेच्या सर्व सुविधा प्रदान करण्यात येणार आहे. प्रवाशांना घरी जाण्यासाठी कॅब सर्व्हिस दिली जाणार आहे. दिव्यांग आणि अन्य गरजेच्या प्रवाशांना व्हिलचेअरची सुविधा स्टेशनवर देणार आहे.

Vande Bharat luxury

हवा तो चित्रपट पाहा

वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये प्रवाशी आपला आवडता कार्यक्रम किंवा चित्रपट पाहू शकेल, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रत्येक डब्यात प्रशिक्षित हाऊस किंपींग स्टाफ असणार आहे. या कर्मचाऱ्यांचे हाऊस किंपींगचे प्रशिक्षण मान्यताप्राप्त संस्थेतून झाले असेल. प्रवाशांना तिकीट बुक करताना प्रीपेड जेवणाची ऑर्डर देता येणार आहे. रेल्वे कॅटरींगमधील कर्मचाऱ्यांकडे हॉटेल मॅनेजमेंट किंवा संबंधित पदवी किंवा पदविका असणार आहे. त्यांना कमीत कमी तीन वर्षांचा अनुभव असणार आहे. किचनमध्ये सीसीटीव्ही असणार आहे. तसेच जेवणाच्या पाकिटांवर क्यूआर कोड असणार आहे. या रेल्वेत तंबाखूजण्य पदार्थ आणि मद्याचा वापर करण्यास बंदी असणार आहे. सध्या दक्षिण रेल्वेत प्रयोगिक तत्वावर ही सुविधा दिली जाणार आहे. त्यानंतर इतर भागांत सुरु होणार आहे.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.