LPG Rules : 1 जूनपासून LPG सिलिंडरच्या नियमात मोठे बदल, सामान्यांवर परिणाम काय? वाचा नवे नियम काय?
एलपीजी गॅस सिलिंडर खरेदी करण्यासाठी आता अनेक नियम बदलले आहेत. सोबतच पीएनजी कनेक्शनमुळेही काही नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे, हे नियम काय आहेत, ते जाणून घेऊ या...

LGP Gas Connection : इंधन टंचाईमुळे आतापर्यंत सरकारने एलपीजी बाबत अनेक नियमांत बदल केले आहेत. दरम्यान आता मे महिन्यानंतर जून महिन्यासाठी एलपीजी गॅस वितरणासाठ नवे नियम लागू केले जाणार आहेत. हे नवे नियम लागू झाल्यानंतर देशात साठेबाजी, अवैध पद्धतीने गॅस सिलिंडरची विक्री, काळाबाजार रोखता येणार आहे. हे बदलेलले नियम काय आहेत? सामान्य नागरिकावर याचा काय परिणाम पडणार? बदलेले नियम काय आहेत? ते जाणून घेऊ या…
नो ड्यूअल कनेक्शन
सरकारने आता एक घर एक गॅस कनेक्शन हा नियम आणखी कडक केला आहे. ज्या घरात अगोदरच पीएनजी कनेक्शन आहे, त्यांना आपले एलपीजी गॅस सिलिंडरचे कनेक्शन परत करावे लागणार आहे. तुमच्याकडे पीएनजी कनेक्शन असूनही तुम्ही एलपीजी कनेक्शन परत न केल्यास तुमचे हे कनेक्शन तात्पुरते बंद केले जाऊ शकते.
एक पत्ता एक कनेक्शन
आता सरकार नव्या नियमानुसार एका पत्त्यावर एकच गॅस सिलिंडर कनेक्शन देणार आहे.
एलपीजी आणि पीएनजी सोबत नाही
ज्या घरात पीएनजी कनेक्शन नाही, ते लोक एलपीजी कनेक्शन वापरू शकणार नाहीत.
एलपीजी कनेक्शन सरेंडर करणाऱ्या नवी सुविधा
ज्या कुटुंबाकडे पीएनजी कनेक्शन आहे आणि त्यांनी एलपीजी कनेक्शन सरेंडर करण्यासाठी अर्ज केला म्हणजेच एलपीजी कनेक्शन परत करण्यासाठी अर्ज केला तर त्यांना वेगळी सुविधा मिळणार आहे. अशा ग्राहकाला एलपीजी कनेक्शन व्हाऊचर दिले जाईल. भविष्यात राहण्याचा पत्ता बदलल्यानंतर याच व्हाऊचरचा वापर करून संबंधित ग्राहक पुन्हा एकदा एलपीजी गॅस सिलिंडरचे कनेक्शन घेऊ शकेल. त्यावेळी त्याला जास्त धावपळ करावी लागणार नाही. लवकर गॅस कनेक्शन मिळणार आहे.
रिफिलिंगसाठी नवा लॉक-इन पिरियड
दुसरीकडे गॅस लिंडरची कमतरता असल्याने सरकारने गॅस रिफिलिंगसाठी नवा लॉक-इन पिरियड लागू केला आहे. या नियमानुसार शहरी भागात तुम्हाला 25 दिवसांच्या अगोदर दुसरे गॅस सिलिंडर रिफिल करता येणार नाही. ग्रामीण भागासाठी हा कालावधी 45 दिवसांचा आहे.