मादुरो यांची अटक म्हणजे तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात, ज्याचा आदेश पुतिनही मोडत नाहीत त्या व्यक्तीचं वक्तव्य, मोठी खळबळ
मोठी बातमी समोर येत आहे, अमेरिकेनं व्हेनेझुएलावर केलेल्या हल्ल्यानंतर आता विविध देशांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. अनेक देशांनी या हल्ल्यावर चिंता व्यक्त केली असून, निकोलस यांच्या सुटकेची मागणी केली आहे.

अमेरिकेनं शनिवारी व्हेनेझुएलावर मोठा हल्ला केला, या हल्ल्यानंतर अमेरिकेनं व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला अटक केलं. दरम्यान अमेरिकेनं व्हेनेझुएलावर केलेल्या या हल्ल्यानंतर आता जगभरातून प्रतिक्रिया समोर येत आहेत. चीनने या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना मादुरो आणि त्यांच्या पत्नीच्या सुटकेची मागणी केली आहे, तसेच अमेरिकेनं आंतरराष्ट्रीय कायद्यांचं उल्लंघन केलं असल्याचा आरोप देखील केला आहे. दरम्यान आता या हल्ल्यावर आणि निकोलस मादुरो यांच्या अटकेवर रशियाचे तत्ववेत्ते अलेक्झेंडर डुगिन यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे, त्यांनी मादुरो यांच्या अटकेचा निषेध करताना मोठं विधान केलं आहे. निकोलस मादुरो यांची अटक म्हणजे तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे. विशेष म्हणजे अलेक्झेंडर डुगिन हे रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांचे राजकीय गुरू मानले जातात, आणि पुतिन हे त्यांचा मोठा आदर करतात.
नेमकं काय म्हटलं अलेक्झेंडर डुगिन यांनी?
डुगिन यांनी अमेरिकेनं व्हेनेझुएलावर केलेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. अमेरिकेची ही कारवाई सांगते की लवकरच तिसरं महायुद्ध सुरू होणार आहे. आता जगात कोणताही आंतरराष्ट्रीय कायदा राहिला नाही, आता जागातील जे देश यामध्ये विजयी होतील ते नव्याने आंतरराष्ट्रीय कायदा लिहितील असं डुगिन यांनी म्हटलं आहे. डुगिन यांना रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांचे राजकीय गुरू मानलं जातं, त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याला आता रशियाच्या नव्या आंतरराष्ट्रीय धोरणाशी जोडलं जात आहे.
चीनकडूनही निषेध
दरम्यान या हल्ल्याचा चीनकडूनही निषेध करण्यात आला आहे. अमेरिकेनं आंतरराष्ट्रीय कायदे आणि नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप चीनने केला आहे. तसचे मादुरो आणि त्यांच्या पत्नीची तातडीने सुटका करावी अशी मागणी देखील चीनकडून करण्यात आली आहे.अमेरिकेनं शनिवारी व्हेनेझुएलावर हल्ला केला होता, त्यानंतर व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती मादुरो आणि त्यांच्या पत्नीला अमेरिकेनं अटक केली आहे, मादुरो यांचा अटकेनंतरचा पहिला फोटो ट्रम्प यांनी प्रसिद्ध केला.
