AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्पुतनिकची लस लसीकरणासाठी कधी उपलब्ध होणार?, नीति आयोगानं काय सांगितलं?

रशियाद्वारे निर्मित स्पुतनिक लस भारतात पोहोचली असून पुढील आठवड्यापासून ती लस लोकांना दिली जाईल, अशी अपेक्षा असल्याची  माहिती वी. के. पॉल यांनी दिली आहे. V K Paul Sputnik vaccine

स्पुतनिकची लस लसीकरणासाठी कधी उपलब्ध होणार?, नीति आयोगानं काय सांगितलं?
SPUTNIK V VACCINE
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: May 13, 2021 | 6:10 PM
Share

नवी दिल्ली: नीति आयोगाचे सदस्य वी के पॉल यांनी पत्रकार परिषद घेतली. पॉल यांन भारतात आतातपर्यंत 18 कोटी लोकांना कोरोनाच्या लसी दिल्या गेल्या असल्याचं म्हटलं आहे. अमेरिकेमध्ये लसीकरण झालेल्या लोकांची संख्या 26 कोटी असून भारत तिसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती त्यांनी दिली. भारतामध्ये ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीमध्ये 216 कोटी कोरोना लसीचं उत्पादन केलं जाईल, अशी माहिती देखील पॉल यांनी दिली. रशियाद्वारे निर्मित स्पुतनिक लस भारतात पोहोचली असून पुढील आठवड्यापासून ती लस लोकांना दिली जाईल, अशी अपेक्षा असल्याची  माहिती वी. के. पॉल यांनी दिली आहे.(Niti Aayog member V K Paul said Sputnik vaccine will be available in the market next week)

स्पुतनिक लस पुढील आठवड्यापासून देण्यात येणार

रशियाद्वारे निर्मित स्पुतनिक लस भारतात पोहोचली असून पुढील आठवड्यापासून ती लस लोकांना दिली जाईल, अशी अपेक्षा असल्याची  माहिती वी. के. पॉल यांनी दिली आहे. जुलैमध्ये स्पुतनिक लसीचं उत्पादन भारतात होण्यास सुरुवात होईल, असंही ते म्हणाले.

लसींचे 216 कोटी डोस बनवणार

भारतामध्ये ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीमध्ये 216 कोटी लसींचं उत्पादन भारतीय नागरिकांसाठी केलं जाईल, अशी माहिती देखील वी के पॉल यांनी दिली. लवकरच सर्वांसाठी कोरोना लस उपलब्ध होईल, असंही वी.के.पॉल म्हणाले. जागतिक आरोग्य संघटना आणि अन्न व औषध प्रशासनानं परवानगी दिलेली लस भारतात आणता येईल. मात्र, यासाठी आवश्यक असणारा परवाना येत्या 1ते 2 दिवसामध्ये दिला जाईल, अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे.

जैव तंत्रज्ञान विभाग, परराष्ट्र मंत्रालय आणि इतर विभाग हे फायजर, मॉडर्ना , जॉनसन अँड जॉनसन या कंपन्यांच्या संपर्कात आहेत. त्यांनी अधिकृतपणे भारतात कोरोना लसी पाठवणे किंवा उत्पादित करण्याविषयी कळवलं आहे. आम्ही त्यांना सहकार्य करण्यासाठी तयार असल्याचं ही पॉल म्हणाले. भारतातल्या कंपन्यांच्या सहकार्यानं लसनिर्मिती करण्यासाठी आम्ही त्यांचं स्वागत करतो, असंही वी.के.पॉल म्हणाले.

संबंधित बातम्या:

Vaccine Cocktail | दोन वेगवेगळ्या कोरोना लसींचे डोस घेतले तर? संशोधनाचा निष्कर्ष काय सांगतो?

Covaxin | 2 ते 18 वयोगटावर कोवॅक्सिनची चाचणी, DCGI कडून भारत बायोटेकला परवानगी

(Niti Aayog member V K Paul said Sputnik vaccine will be available in the market next week)

Follow Us
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!