AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पार्टी भी सही है और बंदा भी ! नितीन गडकरी यांचा उद्धव ठाकरेंना टोला

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या ऑफरवर त्यांना उत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे म्हणाले होते की, जर भाजपमध्ये त्यांना योग्य सन्मान मिळत नसेल तर त्यांनी महाविकासआघाडीतून निवडणूक लढवावी. त्यांच्यामागे संपूर्ण ताकद लावली जाईल.

पार्टी भी सही है और बंदा भी ! नितीन गडकरी यांचा उद्धव ठाकरेंना टोला
shailesh musale
shailesh musale | Updated on: Mar 19, 2024 | 8:35 PM
Share

Gadkari on Uddhav thackeray: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नाव भाजपच्या पहिल्या यादीत जाहीर न झाल्याने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना भाजपमध्ये योग्य सन्मान मिळत नसेल तर महाविकासआघाडीत या. तुम्हाला योग्य तो सन्मान दिला जाईल असे म्हटले होते. त्यावर एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी उद्धव ठाकरे यांना उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, पार्टी पण योग्य आहे आणि व्यक्ती पण योग्य आहे.

उद्धव ठाकरे यांना उत्तर

माजी पंतप्रधान अटलबिहार वाजपेयी यांच्याबद्दल असे म्हटले जात होते की ते व्यक्ती योग्य आहे पण पक्ष चुकीचा आहे. आता नितीन गडकरींबद्दल देखील हेच बोललं जातंय ते बरोबर आहेत पण चुकीच्या पक्षात आहेत, हे खरंय  का? हा प्रश्नावर उत्तर देताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, पक्ष बरोबर आहे आणि व्यक्तीही बरोबर आहे. यादरम्यान गडकरी यांनी उद्धव ठाकरे यांना ही प्रत्युत्तर दिले.

ज्यात त्यांना एमव्हीएकडून निवडणूक लढवण्याची ऑफर देण्यात आली होती. ते म्हणाले की, आज मी पूर्णपणे बरा आहे. मी जो काही आहे तो पक्ष संघटनेमुळे आहे.

भाजपच्या विजयाचा दावा

भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी म्हणाले की, संघाचा स्वयंसेवक आणि विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता म्हणून मी माझ्या आयुष्याची सुरुवात केली. मी आज जो काही आहे तो संघटनेमुळे आहे. मी चांगला आहे तर माझा पक्ष चांगला आहे. मी चांगला असेल तर माझी विचारधाराही चांगली आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या विजयाचा दावा केलाय.

लोकसभा निवडणुकीदरम्यान नितीन गडकरी हे एका टीव्ही कार्यक्रमात बोलत होते. विरोधी पक्षाचे खासदार आणि खुद्द सोनिया गांधीही तुमची प्रशंसा करतात. नितीन गडकरी यांचे विरोधी पक्ष नेतेही चाहते झालेत? त्यावर गडकरी म्हणाले की, काम कायदेशीर आणि नियमानुसार असेल तर ते सर्वांनीच केले पाहिजे. ते चुकीचे असेल तर ते स्वतःसाठीही करू नये. माझ्याकडे जो कोणी काम घेऊन येईल, मी सर्वांची कामे करीन. त्यामुळे सर्वजण माझा आदर करतात.

Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा