AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gadkari Planning: नितीन गडकरी म्हणाले, 5 वर्षांत पेट्रोलची गरज संपुष्टात येईल, काय सुरु आहे प्लॅनिंग, घ्या जाणून

गडकरी म्हणाले की - मला पूर्ण विश्वास आहे की, पाच वर्षांनंतर देशात पेट्रोलची गरज उरणार नाही. आपल्या सगळ्यांच्या कार आणि बाईक्स रहित हायड्रोलजन, इथेनॉल, सीएनजी किंवा एलएनजीवर आधारित असतील.

Gadkari Planning: नितीन गडकरी म्हणाले, 5 वर्षांत पेट्रोलची गरज संपुष्टात येईल, काय सुरु आहे प्लॅनिंग, घ्या जाणून
पाच वर्षांत पेट्रोलची गरज संपणार-गडकरीImage Credit source: social media
| Edited By: | Updated on: Jul 09, 2022 | 9:33 PM
Share

मुंबई– देशात पाच वर्षांनंतर सगळ्या वाहनांमध्ये हरीत इंधनाचा म्हणजेच ग्नीन फ्यईलचा (Green Fuel) वापर होईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari)यांनी नुकताच व्यक्त केला आहे. येत्या काही वर्षांत पेट्रोलची (Petrol need)गरज पूर्णपणे संपेल असा दावाही त्यांनी केला आहे. यावेळी त्यांनी हरीत हायड्रोजन, इथेनॉल आणि उतर हरित इंधनांचा वापर वाढेल असे संकेतही दिले आहेत. अकोला आणि मुंबईत त्यांनी या पर्यायी इंधनाबाबत वक्तव्य केले होते. गडकरी म्हणाले की – मला पूर्ण विश्वास आहे की, पाच वर्षांनंतर देशात पेट्रोलची गरज उरणार नाही. आपल्या सगळ्यांच्या कार आणि बाईक्स रहित हायड्रोलजन, इथेनॉल, सीएनजी किंवा एलएनजीवर आधारित असतील. याचबरोबर अकोल्याच्या कार्यक्रमात त्यांनी कृषीचा वृद्धी दर 12 टक्क्यांवरुन 20 टक्के नेण्यासाठी प्रयत्न करण्याची गरजही व्यक्त केली.

लवकरच चार चाकी आणि दुचाकी वाहनेही इलेक्ट्रिक, सीएनजी, एलएनजी होणार

गेल्या चार पाच वर्षांत आपल्या देशात गतीने पेट्रोल आणि डिझेलच्या व्यतिरिक्त इंधन पर्यायांचा शोध घेण्यात येतो आहे. त्यातूनच सीएनजी, इलेक्ट्रिक वाहनांची संख्या रस्त्यांवर वाढताना दिसते आहे. सीएनजी हा पर्याय तर गेल्या काही काळात लोकप्रिय झालेला दिसतो आहे. आता मोठ्या एसयूव्ही कारही येत्या काळात सीएनजी होण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्याचप्रमाणे दुचाकी गाड्याही झपाट्याने इलेक्ट्रिक होताना दिसत आहेत. आगामी काळात त्यात हायड्रोजन, एलएनजी असे पर्याय उभे राहण्याची शक्यता आहे. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यासाठी प्रयत्नशील आहेत. इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्गिंचं मोठं नेटवर्क देशात उभं राहावं यासाठीही ते प्रयत्न करीत आहेत.

पेट्रोल-डिझेलचा वापर कमी झाल्यास परावलंबित्व कमी होईल

पेट्रोल आणि डिझेलसाठी देशाला सातत्याने आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून राहावे लागले. अरब देश, अमेरिका, रशिया य़ांच्याकडून इंधनाच्या बाजारपेठेत अनेक संघर्ष सातत्याने होत असतात. अशा स्थितीत देशात पेट्रोल आणि डिझलेच्या व्यतिरिक्त इंधनाचे पर्याय शोधण्याचे काम सुरु झाले आहे. असे झाल्यास देशाचे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे परावलंबित्व कमी होईल, तसेच पर्यायवरणाच्या दृष्टीनेही ते कसे फायदेशीर होईल, याचा विचार केंद्रीय पातळीवर करण्यात येतो आहे. मोठ मोठे उद्योजकही सध्या ग्रीन एनर्जीसाठी मोठे प्रकल्प सुरु करत असल्याचे दिसते आहे. एकूणच पुढचा रोड प्लॅन हा पेट्रोलवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी पर्याय लवकर शोधण्याचे असेल, हेच संकेत गडकरींनी दिले आहेत.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.