नितीन गडकरी प्रवाशांना देणार ही सुविधा, हायवे प्रवाशांचा होणार फायदा

| Updated on: Mar 03, 2023 | 8:11 AM

नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने नॅशनल हायवे आणि एक्सप्रेसवे वर प्रवाशांसाठी सोयी - सुविधा उभारणार आहे.

नितीन गडकरी प्रवाशांना देणार ही सुविधा, हायवे प्रवाशांचा होणार फायदा
nhai
Image Credit source: socialmedia
Follow us on

नवी दिल्ली : देशात इन्फ्रास्ट्रक्चर वाढविले जात असून अनेक महामार्गांची कामे वेगाने होत आहेत. आता या महामार्गांवर प्रवाशांसाठी सोयी सुविधा उभारण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. अनेक राज्यात एक्सप्रेसवे बनविल्याने वाहतूक वेगाने होत आहे. यामुळे केवळ प्रवाशांच्या वेळेचीच बचत होत नाही तर संपूर्ण परिसराचाच विकास होत आहे. आता नॅशनल हायवे आणि एक्सप्रेसवे वर प्रवाशांसाठी चांगल्या सोयी सुविधा मिळणार आहेत.

नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात एनएचएआय 2024-25 पर्यंत नॅशनल हायवे आणि एक्सप्रेसवेवर सहाशेहून अधिक जागांवर जनसुविधा केंद्रांची स्थापनी करणार आहे. या जनसुविधा केंद्रांवर पेट्रोल पंप, इलेक्ट्रीक चार्जिंग सुविधा, रेस्ट्रारंट आणि किरकोळ विक्रीची दुकाने असणार आहेत. एनएचआयने गुरूवारी ही घोषणा केली असून यामुळे प्रवाशांचा सोय – सुविधा मिळणार आहेत. यात सध्याच्या आणि आगामी हायवे आणि एक्सप्रेसवेवर दर 40-50 किमीवर जनसुविधा केंद्रांची उभारणी होणार आहे.

जनसुविधा केंद्रांवर अशा असणार सोयी

जनसुविधा केंद्रांवर अनेक सोयीसुविधांची रेलचेल असणार आहे. त्यात इंधन भरण्याची सोय, चार्जिंग पॉइंट, फूड कोर्ट, किरकोळ विक्रीची दुकाने, बॅंक एटीएम, लहान मुलांसाठी खेळण्यासाठी जागा, वैद्यकीय कक्ष, चाईल्ड केअर रूम, शॉवर आणि शौचालया सोबतच वाहन दुरूस्ती केंद्रे, ड्रायव्हरसाठी शयनकक्ष तसेच स्थानीय हस्तशिल्पांच्या विक्रीची सोय असणार आहे.

160 जनसुविधा केंद्रांना मंजूरी

एनएचएआयने आधीच अशाप्रकारच्या 160 जनसुविधा केंद्रांना मंजूरी दिली आहे, त्यातील150 केंद्रांचे वाटप गेल्या दोन वर्षांत केले आहे. पुढील वित्तीय वर्षांत आणखी 150 ठीकाणी वेसाईड सुविधा जारी केल्या आहेत. यात दिल्ली – मुंबई एक्सप्रेसवे , अमृतसर- भठींडा – जामनगर कॉरीडॉर आणि दिल्ली – अमृतसर – काटरा एक्सप्रेसवे सारख्या ग्रीन कॉरीडॉरचा समावेश आहे.

प्रवास अधिक सुविधाजनक 

एनएचएआयने दिलेल्या माहितीनूसार सध्या अनेक ब्राऊन फिल्ड आणि ग्रीन फिल्ड कॉरीडॉरमध्ये 75 वेसाईड सुविधांसाठी निविदा खुल्या केल्या आहेत. एकूण आठ राज्यात या सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. ज्यात राजस्थानात 27, मध्य प्रदेशात 18, जम्मू आणि कश्मीर मध्ये 9, आणि हिमाचल प्रदेशात 3 केंद्रांचा समावेश आहे. रस्त्यांशेजारील या सुविधामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायक तसेच सुविधाजनक होणार आहे.