AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे यांच्या ऑफरवर नितीन गडकरी यांची प्रतिक्रिया, म्हणाले चिंता करु नका…

Gadkari on Uddhav Thackeray : भाजपली पहिली यादी जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली होती. पहिल्या यादीत नितीन गडकरींचे नाव नसल्याने उद्धव ठाकरे यांनी त्यांनी महाविकासआघाडीत येण्याची ऑफर दिली होती. यावर आता नितीन गडकरी यांची प्रतिक्रिया आली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या ऑफरवर नितीन गडकरी यांची प्रतिक्रिया, म्हणाले चिंता करु नका...
shailesh musale
shailesh musale | Updated on: Mar 13, 2024 | 4:08 PM
Share

Gadkari on Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. निवडणूक आयोग कधीही निवडणुकीची घोषणा करु शकते. त्यामुळे अनेक दिग्गज नेत्यांनी आपल्या आपल्या मतदारसंघात संपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे. टीका, आरोप, प्रत्यारोप सुरु झाले आहेत. राजकीय पक्षांमध्ये स्पर्धा लागली आहे. शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी यांना त्यांच्यासोबत येण्याची ऑफर दिली आहे. मात्र, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उद्धव ठाकरे यांचे हे वक्तव्य अपरिपक्व आणि हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे ?

मंगळवारी उद्धव ठाकरे यांनी गडकरींना महाविकासआघाडीमध्ये सामील होण्याची ऑफर दिली होती. ते म्हणाले की, गडकरींचा अपमान होत असेल तर त्यांनी भाजप सोडून महाविकास आघाडीत यावे. आपण गडकरींचा विजय निश्चित करू आणि आपले सरकार सत्तेवर आल्यावर गडकरींना मंत्री करू आणि ते अधिकार असलेले पद असेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे एका सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, काँग्रेसचे माजी नेते कृपाशंकर सिंह, ज्यांना भाजपने कथित भ्रष्टाचारावरून लक्ष्य केले होते, अशा लोकांची नावे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत समाविष्ट करण्यात आली होती, परंतु गडकरींना अजून उमेदवारी जाहीर केली नाही.

गडकरींनी दिले उत्तर

नितीन गडकरी यांनी उद्धव ठाकरे यांची ऑफर अपरिपक्व आणि हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, भाजपमध्ये निवडणुकीसाठी उमेदवार निवडण्याची पद्धत आहे. उद्धव यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता गडकरी म्हणाले की, शिवसेना नेत्यांनी भाजप नेत्यांची काळजी करण्याची गरज नाही.

भाजपची पहिली यादी जाहीर

भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा वाराणसीतून तर अमित शाह हे गांधीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. या यादीत १९५ उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती.

भाजपची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. पहिल्या यादीत महाराष्ट्रातील कोणत्याही मतदारसंघातील उमेदवारी जाहीर करण्यात आली नव्हती. त्यामुळे दुसऱ्या यादीत ही नावे जाहीर केले जातील का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीस
Girish Mahajan | महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीसांचे तातडीचे आदेश
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय...
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय चर्चांना उधाण
विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
Praful Patel | विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... शेतकरी संतप्त
Viral Video : माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... संतप्त शेतकऱ्याचं सरकारला आव्हान
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस... अहिल्यानगरच्या शेवगावात नेमकं काय घडलं?
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह...
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह दिग्गजांच्या नावांची पडताळणी, नेमकं प्रकरण काय?
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची जैन...
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची निलेशचंद्र मुनींशी भेट
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक...
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक... व्हिडीओ व्हयरल
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी...अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत...
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी... अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत गोगावलेंचा थेट पलटवार
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, थेट...