Nitish Kumar | बिहारमध्ये पुन्हा नितीश कुमारच ठरले ‘चाणक्य’, राजीनामा देऊन आजच पुन्हा मुख्यमंत्रीपदी

Nitish Kumar | बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश कुमार यांनीच डाव उलटवला आहे. बिहारच्या राजकारणात नितीश कुमार यांनी मांड ठोकली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ते पलटी मारण्यात आणि गड राखण्यात यशस्वी ठरले आहे. आज संध्याकाळी नव्यांदा मुख्यमंत्री म्हणून ते भाजपसोबत घरोबा करणार आहेत.

Nitish Kumar | बिहारमध्ये पुन्हा नितीश कुमारच ठरले 'चाणक्य', राजीनामा देऊन आजच पुन्हा मुख्यमंत्रीपदी
2005 पासून बिहारमध्ये सत्तेवर असलेले नितीश कुमार या वर्षीही चर्चेत राहिले. कधी एनडीए तर कधी महाआघाडी... सतत बदलत्या निष्ठेमुळे त्यांची राजकीय प्रतिमा प्रभावित झाली आहे. मात्र, नितीश यांनी 2022 मध्येच एनडीएपासून फारकत घेत 2024 च्या निवडणुकीसाठी महाआघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न सुरू केला होता. नितीश कुमार यांनी बिहारमध्ये जातीय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आणि देशाचे राजकारण केंद्रित करण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे. मात्र बिहार विधानसभेत त्यांनी ज्या पद्धतीने लोकसंख्या नियंत्रणाबाबत विधान केले त्यावरून बराच गदारोळ झाला आणि नंतर त्यांना माफी मागावी लागली.
Follow us
| Updated on: Jan 28, 2024 | 12:09 PM

नवी दिल्ली | 28 January 2024 : बिहारमध्ये नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा साथीदाराला हाबाडा दिला आहे. आतापर्यंत त्यांच्यासोबत जे कोणी आले, त्या साथीदाराला त्यांनी दणका दिला आहे. इतके असूनही त्यांनी गड कधी हातचा जाऊ दिला नाही. सध्याच्या महागठबंधनाला राम राम ठोकत, त्यांनी पुन्हा भाजपचे कमळ हाती घेतले आहे. त्यांनी बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवला. आता ते भाजपसोबत घरोबा करतील. नवीन सरकारचे मुख्यमंत्री म्हणून ते आज संध्याकाळीच शपथ घेण्याची दाट शक्यता आहे.

नितीश कुमार यांची नाराजी

नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीसाठी खरी मेहनत घेतली. पण त्यांनाच या आघाडीच्या बाहेर ढकलण्याचे प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी यापूर्वी केला होता. ही नाराजी त्यांनी बोलून दाखवली. राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री सदनात जनता दल युनायटेडच्या सर्व आमदार आणि वरिष्ठांसह बैठक घेतली. या बैठकीत सध्याच्या राजकीय घडामोडींविषयी चर्चा होऊन निर्णय घेण्यात आला. त्यांनी राजीनाम्याची गोष्ट आमदारांसमोर ठेवली. या आमदारांनी त्यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला. त्यामुळे आता सत्तेत भाजपसोबत जाण्याचे नितीश कुमार यांचे स्वप्न पूर्ण होत आहे. आगामी लोकसभेत त्याचे अनुकूल परिणाम बिहारमध्ये दिसतील हे वेगळं सांगायला नको.

हे सुद्धा वाचा

जीतनराम मांझी यांना लॉटरी

नितीश कुमार यांनी राज्यापालांची भेट घेत त्यांना राजीनामा सोपवला. आज संध्याकाळी भाजपसोबत युती करुन ते नव्यांदा बिहार राज्याचे मुख्यमंत्री होतील. भाजपच्या पाठिंब्यावर ते मुख्यमंत्री विराजमान होतील. नवीन फॉर्म्युल्यानुसार, भाजपच्या दोन नेत्यांना उपमुख्यमंत्री पद मिळेल. तर जीतनराम मांझी यांच्या पक्षाला दोन मंत्रीपद मिळेल.

संध्याकाळी शपथ समारोह

आज संध्याकाळी 4 वाजता नितीश कुमार शपथ घेण्याच्या तयारीत आहेत. नितीश कुमार नव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. थोड्याचवेळात यासंबंधीची एक बैठक होईल. त्यात भारतीय जनता पक्षाचे आमदार पण उपस्थित असतील. नितीश कुमार यांचा हा खेला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा ठरला आहे.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.