मीच नाही तर संपूर्ण देश तुमच्यावर हसत आहे, पंतप्रधान मोदी यांची काँग्रेसवर झोंबरी टीका

काँग्रेसने पाकिस्तानला क्लिनचीट दिली आहे. त्यांची ही हिंमत आणि त्यांची सवय जात नाही. पहलगामचे अतिरेकी पाकिस्तानचे होते याचा पुरावा द्या असं ते म्हणतात. काय म्हणत आहात. हीच तर मागणी पाकिस्तान करत आहे. आज पुराव्याची कमी नाही. सर्व डोळ्यासमोर दिसत आहे असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

मीच नाही तर संपूर्ण देश तुमच्यावर हसत आहे, पंतप्रधान मोदी यांची काँग्रेसवर झोंबरी टीका
PM MODI
| Updated on: Jul 29, 2025 | 7:54 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरवरील संसदेत सुरु असलेल्या चर्चेला उत्तर देताना काँग्रेसवर जोरदार हल्ला केला आहे. काँग्रेसला केवळ विरोधाचा बहाणा हवा आहे. आमच्या सैन्याने पाकिस्तानला जन्माचा धडा शिकवला आहे. एकीकडे साऱ्या जगाने भारताची ताकद पाहिली आणि काँग्रेस त्यातही खुचपटं काढत भारतीय सैन्यांचे मनोबल कमी करीत पाकिस्तानची भाषा बोलत आहेत अशीही टीका पंतप्रधानांनी केली आहे.

या आधीही भारताने सर्जिकल स्ट्राईक केला तेव्हा ही हल्ला झाल्याचे काही पुरावेच नाहीत असा आरोप काँग्रेसवाले करीत होते. नंतर एअर स्ट्राईक झाला तेव्हाही त्यांनी यांना काही जमले नाही असा आरोप केला. आता ऑपरेशन सिंदूर अंतर्गत बदला घेतला तर हे म्हणत आहेत युद्ध का थांबवले असा सवाल काँग्रेसवाले करीत आहेत. वाह रे बयान बहादुरो… तुम्हाला विरोधाचा काही ना काही बहाना पाहिजे. मीच नाही तर संपूर्ण देश तुमच्यावर हसत आहे. सैन्याच्या प्रती निगेटिव्हिटी आहे. ही काँग्रेसची जुनी सवय आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झोंबरी टीका केली आहे.

आपण एअर स्ट्राईक केला तेव्हा आपण एक जवान शत्रू मुलखात अडकला. त्यावेळी विरोधक आता तर मोदी फसले. आता कसे आणणार परत असे म्हणजे मनात खुष झाले होते. आम्ही अभिनंदन यांना परत घेऊन आलो. तेव्हा त्यांची बोलती बंद झाली. त्यांना वाटलं हा नशिबवान माणूस आहे. आपल्या हातातलं हत्यार गेलं. आणि त्यांच्या इको सिस्टिमने सोशल मीडियात बऱ्याच कहाण्या रचल्या. पण बीएसएफचा जवानही भारतात आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

कारगिलच्या विजयाला काँग्रेसने मान्य केलं नाही

पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादी रडत आहेत. त्यांचे आका रडत आहे. त्यांना रडताना पाहून इथेही काही लोक रडत आहेत. देशाने कारगिल विजय दिवस साजरा केला. देशाला माहीत आहे की त्यांच्या कार्यकाळात आणि आजपर्यंत कारगिलच्या विजयाला काँग्रेसने मान्य केलं नाही. त्यांनी कारगिल दिवस साजरा केला नाही असाही हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केला. इतिहास साक्षी आहे. डोकलाममध्ये आपलं सैन्य शौर्य दाखवत होते, तेव्हा काँग्रेसचे नेते चोरून चोरून कुणाकडून ब्रिफिंग घ्यायचे ते जगाला माहीत आहे. पाकिस्तानची विधाने पाहा. आणि विरोधकांची विधाने पाहा. फुलस्टॉप, कॉमासह एक आहे. आम्ही खरं बोलतोय तर वाईट वाटतंय. पाकिस्तानच्या सुरात सूर मिसळला जात आहे असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला.