
आता तात्काळ तिकिटांचे बुकिंग ई-आधार व्हेरिफिकेशनद्वारे होणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंट एक्सच्या माध्यमातून ही माहिती दिली. अश्विनी वैष्णव सांगतात की, तिकीट बुकिंगच्या या नव्या पद्धतीचा उद्देश बनावट बुकिंगला आळा घालणे आणि गरजूंना तिकीट बुकिंगमधील फसवणुकीपासून वाचविणे हा आहे. ई-आधार व्हेरिफिकेशनच्या माध्यमातून इन्स्टंट तिकीट कसे बुक करता येईल आणि तेही कन्फर्मेशन, हे पुढे वाचा.
IRCTC च्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून दररोज सरासरी सव्वा दोन लाख प्रवासी तात्काळ तिकिटे बुक करण्याचा प्रयत्न करतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात खिडक्या उघडल्यानंतर बहुतांश प्रवाशांना तिकिटे मिळत नाहीत. अनेक प्रकारे एजंट ताबडतोब तिकिटे बुक करतात, त्यामुळे गरजूंना तिकिटे मिळत नाहीत.
आतापर्यंत IRCTC वर तिकीट बुक करण्यासाठी केवळ ID आणि मोबाइल OTP ची आवश्यकता होती. या नव्या सिस्टिमनुसार युजर्सला तिकीट बुक करताना आधार बेस्ड E-KYC पूर्ण करावे लागणार आहे. म्हणजेच तुमचा आधार क्रमांक आणि त्याच्याशी जोडलेल्या मोबाइल नंबरवरील OTP मुळे तुम्ही खरे प्रवासी आहात याची खात्री होईल. पण त्यासाठी आता,
साधारणपणे AC क्लासचे (जसे 2A, 3A, CC, EC आणि 3E) बुकिंग ट्रेन सुटण्याच्या एक दिवस अगोदर सकाळी 10.00 वाजता सुरू होते. नॉन AC क्लासचे (जसे की स्लीपर आणि सेकंड सीटिंग) बुकिंग ट्रेन सुटण्याच्या एक दिवस आधी सकाळी 11.00 वाजता सुरू होते. उदाहरणार्थ, जर तुमची ट्रेन 20 एप्रिलला सुटत असेल तर तुम्हाला 19 एप्रिलला तिकिट बुक करावं लागेल. सकाळी 10 वाजता AC आणि 11 वाजता नॉन AC तिकिटे बुक केली जातात. हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की एकदा त्वरित तिकीट कन्फर्म झाले की कोणताही परतावा मिळणार नाही.
IRCTC वर 13 कोटींहून अधिक अॅक्टिव्ह युजर्स आहेत, पण यापैकी केवळ 1.2 कोटी युजर्स असे आहेत ज्यांचा मोबाईल नंबर आधारशी व्हेरिफाइड आहे. भारतीय रेल्वेच्या या निर्णयामुळे अशी बनावट खाती निष्क्रिय होतील, जेणेकरून तात्काळ तिकिटांमधील फसवणुकीला आळा बसेल, तसेच गरजूंना तिकिटे मिळू शकतील.