मोठा बातमी! आता मुस्लिमांना खरेदी नाही करता येणार हिंदूची जमीन, देशभरात लागू होणार तो निर्णय?
Hindu-Muslim Property Act: काय मुस्लिम आता हिंदूंची जमीन खरेदी करू शकणार नाही? कोणत्या राज्यात लागू झाला तो नियम? का घेतला गेला असा मोठा निर्णय? हा नियम आता संपूर्ण देशात लागू होणार का? काय आहे ती मोठी अपडेट,जाणून घ्या...

Assam Property Sale Purchase Rules: गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध विधानसभा निवडणुकीत बांगलादेशी मुस्लिमांना जमीन विक्रीचा मुद्दा गाजला. बांगलादेशातून आलेले मुस्लिम खोट्या कागदपत्रांआधारे देशात घुसखोरीत तर करतच आहेत. पण ते कट्टरतावाद आणि धार्मिक सहिष्णुतेला मोठा धोका असल्याचे समोर आले आहे. बांगलादेशातून आलेले मौलाना स्थानिक मुस्लिमांना भडकावत असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. झारखंड, बिहार, आसाम आणि इतर अनेक निवडणुकीत हाच मुद्दा गाजला. दरम्यान या घुसखोरांना देशात थारा मिळू नये यासाठी केंद्र सरकारने जमीन खरेदी-विक्रीत कडक कायदे केले आहेत. पूर्वोत्तर राज्य, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिसा, झारखंड या राज्यात या घुसखोरांनी हिंदूकडून जमीन खरेदी करून तिथं पक्की घरं बांधल्याचे समोर आले आहे. इतकेच नाही तर महाराष्ट्रातही मागे बांगलादेशी घुसखोरांनी जमीन खरेदी करुन दुकानं थाटल्याचे समोर आले होते. त्यातच आसाम राज्याने एक मोठा निर्णय घेतला आहे.
आसाम सरकारचा मोठा निर्णय
आसामच्या हिमंता बिस्वा सरमा सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्याची चर्चा आता संपूर्ण देशात होत आहे. हिंदुत्ववादी संघटना हा निर्णय संपूर्ण देशात लागू करण्याची मागणी करत आहेत. आसाम कॅबिनेटने विविध धर्मियांमध्ये खासकरून हिंदू आणि मुस्लिमांमध्ये जमीन खरेदी-विक्रीसंबंधीचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार हिंदूंकडून मुस्लिमांना जमीन खरेदी करायची असेल तर आता जिल्हा उपायुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्याची भौगोलिक परिस्थिती, बांगलादेशी मुस्लिम घुसखोरांना थोपविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या निर्णयामुळे हिंदूंकडून मुस्लिमांना जमीन खरेदी करणे अवघड होणार आहे. भारतीय मुस्लिमांना या धोरणाचा फटका बसणार नसला तरी कागदपत्रांच्या किचकट प्रक्रियेतून त्यांना जावे लागेल. आता हा नियम पूर्वोत्तर राज्य, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहारमध्ये लागू होणार का, याची चर्चा सुरू झाली आहे. येथील अनेकांना असाच निर्णय घेण्याची मागणी रेटली आहे.
लँड जिहाद, भौगोलिक परिस्थिती बदलाचा आरोप
आसाम सरकारच्या या निर्णयामागे लँड जिहाद, भौगोलिक परिस्थिती बदलाची भीती असल्याचे सांगितले जात आहे. सरकारच्या दाव्यानुसार, आसाम राज्यातील हिंदूच्या जमिनी अधिक दराने खरेदी केल्या जात आहे. अधिक भाव मिळत असल्याने हिंदू ती विक्री करत आहेत. तर काही ठिकाणी हिंदू लोकांवर दबाव आणल्या जात असल्याचा आरोप होत आहे. काही गावात तर मुस्लिमांची संख्या या तीन वर्षात कित्येक पटीने वाढली आहे. हा येथील सांस्कृतिक आणि भौगोलिक स्थितीवर मोठा आघात मानल्या जात आहे. सरकारच्या मते अनेक गावात घुसखोरांनी मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी करुन ते भारतीय नागरीक असल्याचा कांगावा केला आहे. यामुळे हिंदूच अनेक गावात अल्पसंख्यांक ठरत आहेत. हा धोका ओळखूनच हा निर्णय घेतल्याचा दावा सरकारकडून करण्यात येत आहे.
