Odisha Train Accident : याला म्हणतात नशीब, अपघाताआधी मुलीने केला हट्ट, वाचले बापलेकीचे प्राण

एम.के.देब हे सरकारी कर्मचारी आपल्या आठ वर्षीय मुलीसोबत उपचारासाठी कटकला जाण्यासाठी शुक्रवारच्या त्या सायंकाळी त्याच ट्रेनमध्ये प्रवास करीत होते. तिने अचानक एक हट्ट केला आणि नशिबाने साथ दिली...

Odisha Train Accident : याला म्हणतात नशीब, अपघाताआधी मुलीने केला हट्ट, वाचले बापलेकीचे प्राण
RAILWAY ACCIDENT
Follow us
| Updated on: Jun 06, 2023 | 12:15 AM

बालासोर : बालासोर रेल्वे अपघाताने कधीही न पुसणाऱ्या जखमा झाल्या आहेत. भीषण अपघातातील कित्येक मृतदेहांचाी ओळख अद्याप पटलेली नाही. मृत्यूचा आकडा 275 झाला आहे. अपघाताला तीन दिवस उलटले आहेत. आता त्याच्या एक एक कहाण्या बाहेर येत आहेत. काही दु:खद वेदनादायी आहेत तर काही ओठांवर हसु फुलविणाऱ्या आहेत. कोरोमंडल या ट्रेनच्या 21 डब्यांमध्ये मृत्यूचा अक्षरश: कहरच झाला. याच ट्रेनमधून आपल्या मुलीच्या उपचारासाठी कटकला जाणाऱ्या बापाला त्याच्या मुलीच्या हट्टानेच मृत्यूच्या दाढेतून वाचवलं असंच म्हणावं लागेल.

एम.के.देब हे सरकारी कर्मचारी आपल्या आठ वर्षीय स्वाती नावाच्या मुलीसोबत उपचारासाठी कटकला जाण्यासाठी शुक्रवारच्या त्या सायंकाळी त्याच ट्रेनमध्ये प्रवास करीत होते. खडगपुर स्थानकात ही पितापुत्रीची जोडी ट्रेनमध्ये चढली. शनिवारी त्यांची कटकच्या डॉक्टरांशी अपॉईंटमेंट होती. परंतू त्याच्याकडे थर्ड एसीचे तिकीट होते. परंतू स्वातीने बापाकडे खिडकीत बसायची जिद्द केली. अखेर त्यानी टीसीला विचारणा केली.

टीसींनी कोणत्या तरी प्रवाशाला आसन अदलाबदलीची विनंती करा असा सल्ला या दोघांना दिला. त्यांनी मग खिडकीची सिट असलेली जागा शोधायला डबा सुरुवात केली. अखेर ते दुसऱ्या डब्यात जाऊन प्रवाशांना विचारु लागले. अखेर एक प्रवासी त्याच्या सिटची अदलाबदल करायला तयार झाला आणि ते त्यांच्या मूळ जागेपासून तीन डब्बे सोडून बदली झालेल्या जागेवर बसायला गेले.

आणि तो अपघात झाला पण…

अखेर काही वेळाने बालासोरमध्ये ट्रेनचा भीषण अपघात झाला. त्या भीषण अपघातात 275 जण ठार तर 1100 हून अधिक लोक जखमी झाले. याला नशीबच म्हणाल की एम.के.देब आपल्या मुली सोबत ज्या डब्यात नंतर बसले होते त्याला अपघातात काही फारसा फरक पडला नाही. परंतू ज्या डब्यात त्यांचे आरक्षण होते त्यात अनेकांचे मृत्यू झाले. आम्ही ज्यांना आमची रिझर्व्ह तिकीट दिली होती. त्यांची ख्यालीखुशाली आम्हाला काही कळली नाही. आम्ही त्यांच्या सुरक्षेसाठा देवाकडे प्रार्थना करीत आहोत. त्यासोबतच आम्हाला वाचविणाऱ्या विध्यात्याचेही आभार मानत आहोत असे त्यांनी सांगितले.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.