बळीराजा आता संसदेवर धडकणार, 1 फेब्रुवारी रोजी ‘पायी मार्च’ काढणार!

प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा शेतकऱ्यांनी केलेली असतानाच आता आंदोलक शेतकऱ्यांनी आणखी एक घोषणा केली आहे. (On February 1, we will march on foot towards Parliament)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:40 PM, 25 Jan 2021
बळीराजा आता संसदेवर धडकणार, 1 फेब्रुवारी रोजी 'पायी मार्च' काढणार!
दर्शन पाल

नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा शेतकऱ्यांनी केलेली असतानाच आता आंदोलक शेतकऱ्यांनी आणखी एक घोषणा केली आहे. येत्या 1 फेब्रुवारी रोजी आम्ही संसदेवर ‘पायी मार्च’ काढणार आहोत. दिल्लीच्या वेगवेगळ्या भागातून आम्ही संसदेला धडकणार आहोत, अशी माहिती क्रांतिकारी किसान यूनियनचे नेते दर्शन पाल यांनी दिली आहे. त्यामुळे आधीच ट्रॅक्टर मार्चमुळे कोंडीत सापडलेल्या केंद्र सरकारची डोकेदुखी आणखी वाढली आहे. (On February 1, we will march on foot towards Parliament)

दर्शन पाल यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. येत्या 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्याच दिवशी शेतकऱ्यांनी पायी मार्चचं आयोजन केलं आहे. आमची लढाई मोदी सरकार विरोधात आहे. त्यामुळेच आम्ही संसदेला धडकण्याचा निर्णय घेतला आहे, असं दर्शन पाल म्हणाले.

उद्या ट्रॅक्टर परेड

उद्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने दिल्लीत 9 ठिकाणी प्रजासत्ताक दिनाची परेड आयोजित करण्यात आली आहे. त्यात सिंधू, टिकरी, चिल्ला बॉर्डर आणि धासा बॉर्डरचा समावेश असल्याचं किसान यूनियनने म्हटलं आहे. दिल्लीच्या आऊटर रिंग रोडवर आम्ही शांततापूर्ण ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन करू. त्यानंतर पुन्हा आमच्या आंदोलन स्थळी जाऊ. आमचं आंदोलन 26 जानेवारीनंतरही सुरूच राहील, असं किसान मजदूर संघर्ष कमिटीचे नेते श्रवण सिंह यांनी सांगितलं.

आम्हीच किसान, आम्हीच जवान

आपले जवान प्रजासत्ताक दिनी परेड करतात तर आम्हीही ट्रॅक्टर परेड करणार आहोत. आम्हीच शेतकरी आहोत आणि आम्हीच जवान आहोत. ट्रॅक्टर परेडमध्ये आमचा प्रत्येक शेतकरी जवानासारखच काम करेल. दिल्ली पोलिसांशी हारजीतचा प्रश्नच येत नाही, असं शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सांगितलं. (On February 1, we will march on foot towards Parliament)

संबंधित बातम्या:

राहुल गांधींना सीमेवर मायनस टेम्प्रेचरमध्ये का उभं करु नये? भाजप मंत्र्यांचा सवाल

Republic Day 2021 : वयाच्या चौथ्या वर्षी परेडमध्ये सहभागी झालेला ‘रियो’ 18व्या वेळा ‘कदमताल’ करणार!

PM Kisan : लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा 7वा हप्ता लवकरच

(On February 1, we will march on foot towards Parliament)