AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठा निर्णय! रक्षाबंधनच्या दिवशी महिलांना बस प्रवास मोफत,पण कुठे कुठे? डिटेल्स घ्या जाणून

Rakshabandhan Free Bus Travel : रक्षा बंधनच्या दिवसा महिलांचा प्रवास खूप सोपा होणार आहे. नेक राज्यांमध्ये त्यांना बसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोणत्या राज्यात उपलब्ध असेल ही सुविधा ?

मोठा निर्णय! रक्षाबंधनच्या दिवशी महिलांना बस प्रवास मोफत,पण कुठे कुठे? डिटेल्स घ्या जाणून
रक्षाबंधनच्या दिवशी महिलांना बस प्रवास मोफत,पण कुठे?Image Credit source: social media
| Updated on: Aug 08, 2025 | 9:25 AM
Share

भावा-बहीणीच्या प्रेमळ नात्याचा, विश्वासाचा पवित्र सण असलेला रक्षाबंधनाचा दिवस आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. शनिवार , 9 ऑगस्ट रोजी देशभरात रक्षाबंध साजरं केलं जाणार असून यानिमित्ताने भावा-बहिणींची भेट होईल, राखी बांधून, गोड खिलवून आनंदात हा सण साजरा केला जाईल. रक्षाबंधनाच्या खा दिवशी देशातील विविध राज्यांमध्ये महिलांना वेगवेगळ्या सुविधा दिल्या जातात. रक्षाबंधनापूर्वी महिलांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. यावेळी, अनेक राज्यांच्या सरकारने महिलांना प्रवासात विशेष सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता उत्सवादरम्यान घरी ये-जा करताना त्यांना पैशांची चिंता करावी लागणार नाही.

यासाठी काही राज्यांमध्ये बस सेवेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेचा उद्देश असा आहे की बहिणींना त्यांच्या भावांना कोणत्याही अडचणीशिवाय भेटता यावे. प्रवास सोपा असावा आणि कोणताही खर्च नसावा. हा विचार लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आले आहे. असे निर्णय यापूर्वीही काही ठिकाणी घेण्यात आले होते. पण यावेळी हा निर्णय अधिक राज्यांमध्ये घेण्यात आला आहे. जाणून घेऊया डिटेल्स..

दिल्ली, पंजाब आणि कर्नाटक मध्ये बस प्रवास मोफत

दिल्लीमध्ये महिला या डीटीसी आणि क्लस्टर बसमध्ये भाडे न भरता प्रवास करू शकतात आणि ही सुविधा रक्षाबंधनाच्या दिवशीही सुरू राहील. विशेष म्हणजे, केवळ दिल्लीतच नव्हे तर पंजाब आणि कर्नाटकमध्येही महिलांसाठी बस प्रवास मोफत आहे. या दोन्ही राज्यांमध्ये महिलांना राज्य सरकारी बसमध्ये तिकिटाशिवाय प्रवास करता येतो.

रक्षाबंधनाच्या दिवशीही ही सुविधा सुरू राहील. यामुळे महिला कोणत्याही खर्चाशिवाय सणासुदीला त्यांच्या भावांना भेटायला जाऊ शकतील. या निर्णयामुळे महिलांना दिलासा मिळणार आहेच, पण त्यांना सणाच्या दिवशी प्रवास करताना कोणताही अडथळा येणार नाही. सरकारचे हे पाऊल महिलांसाठी एक मोठी भेट ठरत आहे.

रक्षाबंधनाच्या दिवशी या राज्यांमध्येही मोफत करा बस प्रवास

रक्षाबंधनाच्या निमित्ताने, केवळ दिल्ली, पंजाब आणि कर्नाटकमध्येच नाही तर इतर अनेक राज्यांमध्येही महिलांना बसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा दिली जात आहे. दरवर्षीप्रमाणे यावेळीही महिला आणि लहान मुलांना उत्तराखंडमध्ये सरकारी बसमध्ये मोफत प्रवास करता येणार आहे.9 ऑगस्ट रोजी ही सुविधा मध्य प्रदेशातील भोपाळ आणि इंदूर येथेही लागू होईल. 9 आणि 10 ऑगस्ट रोजी महिलांना राज्य परिवहन बसमध्ये मोफत प्रवास करता येईल, अशी घोषणा राजस्थान सरकारने केली आहे. चंदीगडमध्येही महिलांना ट्रायसिटी क्षेत्रातील सर्व लोकल बसेसमध्ये मोफत प्रवास करता येईल. परंतु ही सुविधा लांब पल्ल्याच्या बसेसमध्ये लागू होणार नाही.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.