मोठी बातमी! बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या, अत्यंत धक्कादायक निकाल, भाजपला थेट…

मोठी बातमी समोर येत आहे, काँग्रेसकडून सातत्याने बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या अशी मागणी होत आहे. ईव्हीएमवर गंभीर आरोप करण्यात येत आहेत. त्यानंतर आता बॅलेट पेपरवर झालेल्या निवडणुकीचा धक्कादायक निकाल समोर आला आहे.

मोठी बातमी! बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या, अत्यंत धक्कादायक निकाल, भाजपला थेट...
काँग्रेसला मोठा धक्का
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 07, 2026 | 4:01 PM

विरोधी पक्षांकडून ईव्हीएमला जोरदार विरोध होत आहे. यापूर्वी तर ईव्हीएमच्या माध्यमातून मत चोरीचा देखील आरोप झाला आहे. त्यामुळे मतदान हे बॅलेट पेपरवरच व्हायला पाहिजे अशी मागणी सातत्याने विरोधकांकडून विशेष: काँग्रेसकडून सुरू आहे. तसेच विरोधी पक्षांनी सध्या देशभरात सुरू असलेल्या एसआयआर प्रक्रियेला देखील जोरदार विरोध केला आहे. मंगळवारी एसआयआर प्रक्रिया रद्द करण्यात यावी, तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा यासाठी विरोधी पक्षांकडून मोठं आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह विरोधी पक्षाचे सर्व खासदार आणि नेते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. एकीकडे काँग्रेस आणि विरोधी पक्षाकडून ईव्हीएमच्या वापरला विरोध होत असतानाच आता दुसरीकडे मोठी बातमी समोर आली आहे.

ती म्हणजे काँग्रेसला आसामध्ये मोठा झटका बसला आहे. सिलचर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा मोठा पराभव झाला असून, भाजपचा दणदणीत विजय झाला आहे. विशेष म्हणजे ही निवडणूक ईव्हीएमवर न होता बॅलेट पेपरवर घेण्यात आली होती. या निवडणुकीमध्ये भाजपला 42 जागांपैकी तब्बल 32 जागा मिळाल्या तर काँग्रेसला अवघ्या 2 जागांवर समाधान मानावं लागलं, तर उर्वरीत जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. दरम्यान निवडणुकीत मिळालेल्या या यशानंतर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लबोल केला आहे.

Loading...

काँग्रेसकडून ईव्हीएम हटावचा नारा दिला जात आहे, बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी होत आहे. परंतु ते बॅलेट पेपरवर झालेल्या निवडणुकीत देखील आता विजय मिळू शकत नाहीत. हेच या निवडणुकीच्या निकालाले दाखवून दिलं आहे, असं आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हटलं आहे. दरम्यान त्यापूर्वीच 30 सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी निवडणुका या बॅलेट पेपरवरच झाल्या पाहिजेत अशी मागणी केली होती. त्यानंतर बॅलेट पेपरवर झालेल्या निवडणुकीत मात्र काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us