Operation Sindoor 2: ऑपरेशन सिंदूरचा तो सीक्रेट प्लॅन… कोणत्या देशावर हल्ला होणार? लष्कर प्रमुखांचे मोठे सूचक वक्तव्य

Operation Sindoor 2.0: ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच असल्याचे मोठे वक्तव्य लष्कर प्रमुखांनी केले आहे. त्यांनी सध्याच्या संघर्षाला स्वल्पविराम लागल्याचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे भारत आता कुणाला धडा शिकवणार याची चर्चा रंगली आहे.

Operation Sindoor 2: ऑपरेशन सिंदूरचा तो सीक्रेट प्लॅन... कोणत्या देशावर हल्ला होणार? लष्कर प्रमुखांचे मोठे सूचक वक्तव्य
ऑपरेशन सिंदूर 2.0
Image Credit source: एजन्सी
| Updated on: May 30, 2026 | 2:29 PM

Operation Sindoor 2.0: देशाचे लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी ऑपरेशन सिंदूरविषयी मोठे वक्तव्य केले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना मोठा धड शिकवला होता. पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवर अचूक आणि भेदक मारा करत शेकडो दहशतवाद्यांना नरकात पाठवले होते. भारताच्या या आक्रमक भूमिकेने पाकिस्तानला कापरे भरले होते. त्यांचे लष्कर सैरभैर झाले होते. विशेष म्हणजे पाकिस्तानचा ड्रोन आणि क्षेपणास्त्र डागून प्रतिक्रिया देण्याचा अयशस्वी प्रयत्न जगाने पाहिला होता. या हल्ल्याला एक वर्ष झाले आहे. त्यानंतर लष्कर प्रमुखांनी ऑपरेशन सिंदूर अजून थांबलेले नसल्याचे मोठे वक्तव्य केले आहे. “भारत, ऑपरेशन सिंदूर 2.0 ची तयारी करत आहे.” असे मोठे वक्तव्य लष्कर प्रमुख द्विवेदी यांनी केले आहे.

यावेळी तीनही सैन्य दलाकडून हल्लाबोल

वृत्तसंस्था ANI शी चर्चेदरम्यान जनरल द्विवेदी यांनी ऑपरेशन सिंदूर 2.0 च्या सीक्रेट प्लॅनविषयी एक गोटातील माहिती दिली. सध्या संघर्षावर एक स्वल्पविराम लागल्याचे ते म्हणाले. पाकिस्तानचे नाव न घेता त्यांनी जर गरज पडली तर केवळ लष्करच नाही तर भारतीय हवाई दल आणि नौदल सुद्धा नवीन मोहिमेसाठी आणि लष्करी कारवाईसाठी तैनात असल्याचे सांगितले.

भारतीय लष्कर, हवाई दल, नौदल हे तीनही ऑपेरशन सिंदूर 2.0 साठी जोरदार तयारी करत आहेत. वेळेवर जर तयारी करायची असेल तर कारवाईसाठी तीनही सैन्यदल तयार आहेत. सध्या या तीनही सैन्य दलात ताळमेळ वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. येत्या संघर्षावेळी या तीनही सैन्य दलात ताळमेळीसाठी 24 तासांची सुद्धा गरज भासणार नाही असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.

प्रचारकी युद्धावर मोठे वक्तव्य

दोन देशात संघर्ष पेटला तेव्हा माहिती आणि तंत्रज्ञानाचा मोठा वापर करण्यात येतो. शत्रू राष्ट्र दुसर्‍या देशात खोट्या माहितीचा प्रचार करते. या प्रचारकी युद्धाला लगाम घालण्याविषयी लष्कर प्रमुखांनी मोठे वक्तव्य केले आहे. हे माहिती युद्ध तेव्हाच यशस्वी होते. जेव्हा संपूर्ण देश एकत्र येईल आणि माहिती देणाऱ्यावर विश्वास ठेवले. त्यामुळे अशाच वेळी तो देश अर्धे युद्ध जिंकतो हे त्यांनी सांगितले. ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानने खोट्या आणि संभ्रम तयार करणाऱ्या बातम्या पेरण्याचा प्रयत्न केला. त्याला भारतीय प्रसार माध्यमांनी आणि लष्कराच्या माहिती आणि प्रसार विंगने त्यावेळी जोरदार चपराक दिल्याचे दिसून आले होते.

Follow Us