AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Operation Sindoor: पाकड्यांना चारली धूळ, ऑपरेशन सिंदूरने भारताची उंचावली मान, यशाची मोठी कारणं कोणती?

Operation Sindoor India-Pakistan Conflict: गेल्या वर्षी भारताने पाकिस्तानला संघर्षात धूळ तर चारलीच. पण दहशतवाद्यांचे कंबरडेही मोडले. पाक व्याप्त काश्मीरसह पाकमध्ये दूरवर हल्ले केले. जागतिक पातळीवर पाकड्यांची नाचक्की झाली. या आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची कारणं?

Operation Sindoor: पाकड्यांना चारली धूळ, ऑपरेशन सिंदूरने भारताची उंचावली मान, यशाची मोठी कारणं कोणती?
ऑपरेशन सिंदूरने भारताची उंचावली मानImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: May 06, 2026 | 2:02 PM
Share

Operation Sindoor India-Pakistan Conflict: गेल्या वर्षी भारताने पाकिस्तानला तोंडघशी तर पाडलंच. पण पाकव्याप्त आणि पाकिस्तानातील 9 दहशतवादी स्थळं उद्धवस्त केली. त्यामुळे पाकचा दहशतवादाचा बुरखा टराटरा फाटलाच, त्यासोबत दहशतवाद्यांचे कंबरडेही मोडले. पाकमध्ये दूरवर नागरी क्षेत्र सोडून भारताने जबरी हल्ले केले. त्यामुळे पाकच्या लष्कराची पोलखोल ही झाली. पाकने प्रत्युत्तर दिले तरी त्यात भारताचे मोठे नुकसान झाले नाही. काय आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची कारणं?

ऑपरेशन सिंदूरच्या यशाचे मुख्य कारणं

भारताची खास नियंत्रित संघर्ष धोरण

भारताने पाकिस्तानवर हल्ला चढवला नाही. भारताने आपले संघर्ष धोरण निश्चित केले. जगाला आणि पाकला थेट संदेश दिला. पाकिस्तान समर्थित दहशतवादी कारवायांना आळा घालणे हा भारताचा उद्देश होता. ऑपरेशन सिंदूरने दीर्घकालीन युद्धाचा धोका टाळला. पहेलगाम हल्ल्याबाबत भारताची प्रतिक्रिया अचूक आणि तोलून मापून होती. भारताने 9 दहशतवादी तळं निश्चित केली आणि त्यावरच हल्ला केला. तर पाकिस्तानने आगळीक करू नये यासाठी त्यांच्या काही लष्करी तळावर हल्ला चढवला. भारताने 4 दिवस, 88 तासात ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकला बेनकाब केले.

दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले

पाकिस्तानी लष्करासोबतचा तणाव आणि संघर्ष टाळण्यासोबतच दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देणे आणि पाकचा दुहेरी चेहरा समोर आणण्याचे चोख काम ऑपरेशन सिंदूरने केले. भारताने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळांवर अचूक निशाणा साधला. कोणत्याही नागरी वस्तीवर हल्ला चढवला नाही. त्यात लष्कर ए तैयब्बा, जैश ए मोहम्मद आणि हिझबुल मुजाहिद्दीनच्या तळांचा समावेश आहे. या हल्ल्यात 100 पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाले. त्यात IC-814 अपहरणाशीसंबंधित युसूफ अझहर आणि पुलवामा हत्येतील अब्दुल मलिक ऱऊफ हे दहशतवादी ठार झाले.

पाक आणि दहशतवाद्यांचे नुकसान, भारतावर नाही परिणाम

संघर्ष पेटल्यावर दोन्ही बाजूंचे मोठे नुकसान होते. रशिया-युक्रेन असो वा इस्त्रायल-इराण युद्धात हेच घडले. पण भारत आणि पाकिस्तान संघर्षात पाकड्यांचे आणि त्यांच्या आश्रयावर तुकडे तोडणाऱ्या दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले. भारतीय वायुसेने राफेल, SCALP मिसाईल आणि HAMMER बॉम्बचा वापर करत अवघ्या 23 मिनिटांत परिणाम साधला. तर आगळीक करू नये म्हणून पाकिस्तानच्या 11 लष्करी हवाई तळांवर हल्ला केला. त्यात त्यांच्या विमानांना आणि धावपट्टीचे मोठे नुकसान झाले. पाकिस्तानने प्रत्युत्तर दिले. पण भारतीय एअर डिफेन्स प्रणाली आणि सुदर्शन शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्र थांबवण्यात यशस्वी ठरली.

स्वदेशी तंत्रज्ञान आणि शस्त्रांचा भेदक मारा

ऑपरेशन सिंदूर, तीनही सैन्यदलांनी एकत्र लढले. त्यांच्यातील समन्वय दिसून आला. या संघर्षात भारताने परदेशी शस्त्रांची आयात टाळत स्वदेशी उत्पादनांवर भर दिला. आज देशातंर्गत 65% पेक्षा अधिक संरक्षण साहित्या देशातच तयार होते. ब्राह्मोस, आकाश, तेजस, ड्रोन आणि इतर स्वदेशी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला. मेड फॉर इंडिया नाही तर मेड बाय इंडियाचा कल वाढला.

राजकीय इच्छाशक्तीचा वापर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कराला संपूर्ण सूट दिली. दहशतदवाद्यांवर, त्यांच्या तळावर अचूक निशाण्याचे आदेश देतानाच पाकिस्तानमधील नागरी वसाहती आणि नागरिकांना हानी होऊ नये याची काळजी घेण्याचे निर्देश दिले होते. भारताची सांस्कृतिक ओळख पुसून न देण्याची काळजी लष्कराने चोख बजावली. लष्करी तळांवर हल्ले असो वा दहशतवादी तळ उद्धवस्त करणे असो सैन्यदलाने भारताची मान उंचावली.

संपूर्ण देशाचा ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा

संपूर्ण देश भारतीय ळष्करामागे ठाम पणे उभा राहिला. हे ऑपरेशन केवळ लष्करी नव्हते. तर त्यामागे राष्ट्र भावना आणि राष्ट्र शक्ती दिसून आली. खासगी कंपन्या, स्टार्टअप्स, सरकारी संस्था एकत्र काम करत होत्या. या दरम्यान भारतीय अंतराळ संशोधन संस्था ISRO ने 10 उपग्रहांच्या मदतीने सतत माहिती पुरवत होती. तर या काळात कोणतीही भ्रामक, भ्रमित करणारी माहिती पाकिस्तानकडून पसरू नये यासाठी खास रणनीती आखली. ती सुद्धा यशस्वी ठरली.

Follow Us
6 खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय; आराखडा तयार आता फक्त.
Uddhav Thackeray | विश्वासू खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय; आराखडा तयार आता फक्त...
रेवती सुळेंच्या लग्नाला शरद पवार व्हीलचेअरवरून हजर, सुनेत्रा पवारांचीह
रेवती सुळेंच्या लग्नाला शरद पवार व्हीलचेअरवरून हजर, सुनेत्रा पवारांचीही उपस्थिती
कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याने खळबळ; माजी नगरसेवकांसह 7 जणांवर गुन्हा
kalyan | कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याने खळबळ; माजी नगरसेवकांसह 7 जणांवर गुन्हा
भर मंचावर झाला मोठा घोळ! कोल्हापूरच्या कार्यक्रमात शिंदेंचं नाव...
भर मंचावर झाला मोठा घोळ! कोल्हापूरच्या कार्यक्रमात शिंदेंचं नाव... मुख्यमंत्र्यांनी सूत्रसंचालकाला मध्येच अडवलं अन्...
6 बंडखोर खासदारांविरोधात ठाकरेंचा मास्टरप्लॅन! थेट मतदारसंघात उतरणार
Uddhav Thackeray | 6 बंडखोर खासदारांविरोधात उद्धव ठाकरेंचा मास्टरप्लॅन! थेट मतदारसंघात उतरणार
ओमराजे निर्णय घेण्याआधीच शिंदेंचे खासदार... शिंदेच्या कार्यकर्त्यांचा
ओमराजे निर्णय घेण्याआधीच शिंदेंचे खासदार... शिंदेच्या कार्यकर्त्यांचा घराबाहेर गराडा; पुण्यातील राजकीय हालचालींना वेग
परभणीच्या हनुमान मंदिरात मोठी दुर्घटना, बांधकाम सुरु असताना छत कोसळला
Parbhani| परभणीच्या हनुमान मंदिरात मोठी दुर्घटना, बांधकाम सुरु असताना छत कोसळला, अनेकजण जखमी
शिंदे गट नाही, आता एकच शिवसेना!; अमित शाहांच्या विधानाने चर्चांना उधाण
Amit Shah | शिंदे गट नाही, आता एकच शिवसेना!; अमित शाहांच्या विधानाने चर्चांना उधाण
शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? ओमराजेंचं मोठं विधान, 2 दिवसांत अंतिम...
Omraje Nimbalkar | शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? ओमराजेंचं मोठं विधान, 2 दिवसांत अंतिम निर्णय घेणार!
शिंदेंच्या सेनेतील बडा नेता ओमराजेंच्या भेटीला; पुण्याच्या निवासस्थानी
शिंदेंच्या सेनेतील बडा नेता ओमराजेंच्या भेटीला; पुण्याच्या निवासस्थानी... राजकारणातील घडामोडींना वेग