AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विरोधक एकत्र येण्याआधीच फिस्कटण्याची चिन्हं; बैठकीसाठी फक्त तारीख पे तारीख…

सर्व विरोधी नेत्यांशी बोलल्यानंतर, 5 जून रोजी पाटण्यात जेडीयूकडून 23 जून रोजी बैठकीची तारीख निश्चित करण्याची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते असं वरिष्ठ नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

विरोधक एकत्र येण्याआधीच फिस्कटण्याची चिन्हं; बैठकीसाठी फक्त तारीख पे तारीख...
| Updated on: Jun 05, 2023 | 1:23 AM
Share

पाटणा : बिहारची राजधानी पाटणा येथे होणारी विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक आता पुढे ढकलण्याची शक्यता आहे. नितीश कुमार यांनी 12 जून रोजी पाटण्यात ही बैठक बोलावली होती. ममता बॅनर्जी आणि अखिलेश यादव यांनी त्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचेही त्यांना सांगितले होते. पण त्या बैठकीला काँग्रेसकडून राहुल गांधी किंवा पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे दोन्हीही नेते सहभागी होणार नव्हते. काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या परदेश दौऱ्यावर आहेत. त्यामुळे या बैठकीसाठी काँग्रेसने आपला एक मुख्यमंत्री आणि एक सरचिटणीस पाठवण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून विरोधकांच्या या ऐक्याबाबत गंभीर नसल्याची प्रतिक्रिया उमटत आहेत.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राहुल गांधी यांची दिल्लीत काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी बैठकीला उपस्थित राहण्यास संमतीही दर्शवली होती.

खुद्द राहुल यांना विचारल्यानंतर पाटणा येथे 12 जून रोजी विरोधी ऐक्याची बैठक घेण्याचा निर्णयही घेण्यात आला होता.

त्यानंतर मात्र ही परिस्थिती बदलली आहे. त्यानंतर नितीशकुमार यांनी काँग्रेस नेत्यांबरोबर चर्चा केली होती. ज्यामध्ये राहुल गांधी या भेटीबाबत खूप गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले होते.

त्यांना या बैठकीत सहभागी व्हायचे आहे, त्यासाठी काँग्रेसने या बैठकीची तारीख पुढे ढकलण्यास सांगितले आहे. नितीश कुमार आणि इतर विरोधी पक्षातील नेते तयार झाले तर मात्र आता 23 जूनला बैठक होण्याची शक्यता आहे.

विरोधी पक्षनेत्यांची बैठक कोणत्याही परिस्थितीत पाटण्यात होणार असल्याचेही निश्चित आहे. त्यामुळे पाटणा येथे बैठक घेण्याची सूचना बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून आली आहे असंही सांगण्यात येत आहे.

जेडीयूच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, सोमवार, 5 जून रोजी ममता आणि अखिलेश यादव विरोधी पक्षांतील नेत्यांबरोबर चर्चा करणार आहेत. त्यानंतर तो अंतिम निर्णयही घेण्यात येणार आहे.

त्याचबरोबर डाव्या पक्षांबरोबरही त्यांना चर्चा करायची आहे. राहुल गांधी या बैठकीला उपस्थित न राहिल्यामुळेच हा वाद वाढत होता. याची काळजी नितीशकुमार यांनाही होती.

त्यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांना एकत्र आणण्याच्या त्यांच्या मिशनला यामुळे ग्रहण लागण्याची शक्यता त्यांना वाटत होती. आपण पंतप्रधानपदाचे उमेदवार नसल्याचे ते सातत्याने सांगत आहेत. मात्र त्यांचे एकच ध्येय आहे. पुढील निवडणुकीत भाजपला सरकार स्थापन करण्यापासून रोखणे हा त्यांचा विश्वास आहे.

या बैठकीची तारीख वाढवण्यासाठी अरविंद केजरीवाल यांच्याबरोबरही चर्चा झाली आहे. त्यांनी संमती दिली आहे. या बैठकीला राहुल गांधी यांनी हजेरी लावलीच पाहिजे, असं त्यांचे मत आहे.

सर्व विरोधी नेत्यांशी बोलल्यानंतर, 5 जून रोजी पाटण्यात जेडीयूकडून 23 जून रोजी बैठकीची तारीख निश्चित करण्याची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते असं वरिष्ठ नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.