AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Swiggy वरून ऑनलाईन जेवण मागवता का? आता ऑर्डर करण्यापूर्वी ही बातमी वाचा अन्यथा…

स्विगी ही ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनी आहे. तुम्हाला तुमच्या आवडते पदार्थ हॉटेल किंवा एखाद्या ठिकाणावरून झटपट आणून देते. त्यामुळे हे अॅप खूपच लोकप्रिय आहे. पण आता ऑर्डर करण्यापूर्वी ही बातमी वाचा.

Swiggy वरून ऑनलाईन जेवण मागवता का? आता ऑर्डर करण्यापूर्वी ही बातमी वाचा अन्यथा...
Swiggy वरून ऑनलाईन जेवण मागवण्यापूर्वी ही बातमी वाचा, नाही तर फटका बसलाच समजाImage Credit source: प्रातिनिधीक फोटो
| Updated on: Apr 28, 2023 | 9:59 PM
Share

मुंबई : ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीवरून ऑर्डर मागवताना बऱ्याच सवलती मिळतात. त्यामुळे ग्राहकांना कमी पैशात चांगल्या पदार्थांची चव चाखता येते. त्यामुळे स्विगी हे लोकप्रिय अ‍ॅप आहे. कंपनीच्या या प्लॅटफॉर्मवर 2.5 लाखांहून अधिक रेस्टॉरंटची नोंदणी आहे. तसेच महिन्याकाठी 10 हजार हॉटेल आपली नोंदणी करतात. तसेच या माध्यमातून लाखो तरुणांना रोजगार प्राप्त झाला आहे. पण आता या प्लॅटफॉर्मवरून जेवण मागवणं थोडं महागात पडणार आहे.

आता ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणाऱ्या स्विगी कंपनीने कार्ट व्हॅल्यू व्यतिरिक्त सर्व युजर्सकडून प्रति फूड ऑर्डरसाठी 2 रुपये प्लॅटफॉर्म फी वसूल करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेकांना अतिरिक्त पैसे का मोजतो असा प्रश्न पडला आहे. स्विगी युजर्स आतापर्यंत फूड ऑर्डर करण्यावर डिलिव्हरी फीस आणि टॅक्स भरतात.

कंपनीने याबाबत सांगितलं की, फक्त मुख्य प्लॅटफॉर्मवर फूड ऑर्डर केलं अतिरिक्त चार्ज लावला जात आहे. हा भार इंस्टामार्ट युजर्ससाठी लागू नाही. स्विगीच्या प्रवक्त्यांनी या अतिरिक्त चार्जबाबत आपलं मत मांडलं आहे.

“फूड ऑर्डवर प्लॅटफॉर्म फीस एक साधारण शुल्क आहे. हे शुल्कामुळे आम्ही प्लॅटफॉर्म व्यवस्थितरित्या संचालित करणं आणि चांगलं अपग्रेड करण्यासाठी मदत होणार आहे. तसेच काही अखंडीतपणे सेवा प्रदान करण्यास मदत करते.”, असं स्विगी प्रवक्त्यांनी सांगितलं. स्विगीने हे अतिरिक्त शुल्क बंगळुरु आणि हैदराबाद सारख्या शहरात लागू केलं आहे. सध्या तरी दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरात ही अतिरिक्त फी लागू नाही.

स्विगीला 2 रुपये कमी वाटत असले तरी स्विगीला दररोज लाखो ऑर्डर येतात. यामुळे मोठी रक्कम जमा होऊ सकते. ही फीस मागच्या आठवड्यात लागू केली होती. लवकरच सर्व शहरं आणि काही भागांमध्ये लागू केली जाऊ शकते.

एका रिपोर्टनुसार स्विगीला दिवसाला 1.5 ते 2 मिलियन हून अधिक ऑर्डर मिळतात. रमजानच्या पवित्र महिन्यात हैदराबादमध्ये तर स्विगीवरून 10 लाख प्लेट बिर्याणी आणि 4 लाख प्लेट हलीम ऑर्डर केली गेली.

गेल्या 12 महिन्यांच्या कालावधीत 33 मिलियन प्लेट इडलीची डिलिव्हरी केली आहे. त्यामुळे या पदार्थाची लोकप्रियता दिसून येते. बंगळुरु, हैदराबाद आणि चेन्नईमध्ये सर्वाधिक इडलीची ऑर्डर केली गेली.

सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....