आमचे साधु साहेब निवर्तले…घोड्याच्या मृत्यूनंतर मालकाने बांधली घरातच समाधी,तेरावेही घातले
घोड्याची काळजी घेणारे आफताब अन्सारी म्हणाले, 'साधूसाहब' ची सेवा करणे हा मी माझा धर्म मानला. त्यांच्या निधनाने माझे मन प्रचंड दु:खी झाले आहे.

प्राणी आणि मानव यांचे संबंध नेहमीच सौहार्दाचे राहीले आहेत. पाळीव प्राण्यात तर कुत्रा सर्वात इमानी प्राणी मानला जातो. परंतू बिहार येथील एका कुटुंबाचे प्राणी प्रेम पाहून सर्वप्राणी प्रेमी हेलावले आहेत. या कुटुंबातील एक सदस्य असलेले घोड्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे अंत्यसंस्कार हिंदु परंपरेने केले जात आहे. या कुटुंबाने या घोड्याचा समाधी घरातच बांधली आहे. या समाधी निमित्त आणि लाडक्या घोड्याला श्रद्धांजली देण्यासाठी एका शोक सभेचे आयोजन केले होते.
बिहारच्या भागलपुरचे निवासी डॉ. जेता सिंह यांनी त्यांच्या पाळीव घोडा ‘साधु साहब’ याच्या निधनानंतर त्याच्या पार्थिवावर हिंदू रितीरिवाजानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. घोड्याच्या आत्म्याच्या शांती मिळावी यासाठी विधीवत कर्मकांड करण्यात आले. एवढंच नाही तर घरातच घोड्याची समाधी बांधली.
डॉ. जेता सिंह यांनी अनेक जखमी पशु-पक्षांवर उपचार करुन त्यांना जीवनदान दिले आहे. ते पेशाने डॉक्टर आहेत. ते त्यांचा लाडका घोडा साधु साहब याला कुटुंबातील एक सहकारी मानत होते. घोड्याच्या मृत्यूने त्यांच्या घरातील मोहोल बिघडला. त्यांच्या कुत्र्यांनीही जेवण खाल्ले नाही. आम्ही साधू साहब याची काळजी घेत होतो. पाटणा येथील एका प्रतिष्ठीताकडे गेलो होतो. त्यावेळी जखमी अवस्थेत हा घोडा सापडला.मी त्याला भागलपुर येथील आमच्या घरी आणले. कोलकाताहून डॉक्टर त्याची काळजी घेत होते. परंतू काही चूक झाली माहीती नाही तो आम्हाला सोडून निघून गेला.
कुटुंबातील एखादा सदस्य गेल्यानंतर आपण त्याला कधी विसरत नाही. त्याच प्रकारे साधु साहब आम्हाला नेहमीच लक्ष्यात राहतील. त्यांच्या मृत्यूनंतर त्याची येथे समाधी बांधण्यात आली आहे. येथे त्यांचा दफनविधी झाला आहे.येथे यज्ञ आणि प्रार्थना सभेचे आयोजन देखील करण्यात आले होते. या शोक सभेला अनेक नातलंगासह पाळीव कुत्रेही सहभागी झाले होते.हे दृश्ये पाहून येथे उपस्थित प्रत्येक गावकऱ्या डोळे ओले झाले..
साधूसाहब आमच्या कुटुंबाचा एक भाग
साधू साहब केवळ घोडा नव्हता, तो आमच्या कुटुंबाचाच एक भाग सदस्य होता. त्याच्याशिवाय घर सुनंसुनं वाटतंय. त्याच्याशी माझे एक विशेष नाते निर्माण झाले होते, काही काळानंतर फक्त आठवणीच राहतात, त्याचप्रमाणे साधूसाहब याच्या केवळ आठवणीच उरल्या आहेत. त्याच्या जाण्याने आम्हाला तीव्र दुःख झाले आहे, असे डॉ. जेता सिंग यांनी म्हटले आहे.
