पहलगाम हल्ल्यानंतर गूगलवर ‘या’ गोष्टी सर्च करत असाल तर सावधान… होऊ शकतो तुरुंगवास

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यानंतर देशात सुरक्षा व्यवस्था अलर्ट मोडवर..., तुम्ही गूगलवर 'या' गोष्टी सर्च करत असाल तर व्हा सावधान, भोगावा लागू शकतो तुरुंगवास...

पहलगाम हल्ल्यानंतर गूगलवर या गोष्टी सर्च करत असाल तर सावधान... होऊ शकतो तुरुंगवास
फाईल फोटो
| Updated on: May 02, 2025 | 12:34 PM

Pahalgam Terror Attack: 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 लोकांनी आपले प्राण गमावले आहे. तर हल्ल्यात अनेकांना आपले प्राण गमावले आहेत. हल्ल्यानंतर जम्मू काश्मीर हाय अलर्टवर असून भारतीय सेनेकडून सर्च ऑपरेश सुरु आहे. सध्या देशात तणावग्रस्त शांतता पाहायला मिळत आहे. हल्ल्यानंतर सोशल मीडियावर मन विचलित करणारे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

या भयानक हल्ल्यानंतर देशात संतापाची लाट उसळलेली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तान विरोधातत कठोर निर्णय घेतले आहेत. यादरम्यान तुम्हाला देखील काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. देशात तणावग्रस्त वातावरण असताना तुम्ही गूगलवर यागोष्टी बिलकूल सर्च करू नका. कारण पोलिसांना आणि सुरक्षा दलाला संशय आल्यास तुम्हाला देखील अटक होऊ शकते. त्यामुळे याकाळात काही गोष्टी गूगलवर चुकूनही सर्च करु नका.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाचं वातावरण आहे. लष्कराने दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास सुरुवात केली आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर गुगलवर काही गोष्टी शोधू नका नाही तर, पोलीस तुम्हाला अटक करू शकतात.

हे सुद्धा वाचा : शाल विक्रेते, घोडेस्वार आणि दहशतवादी यांच्यातील थेट कनेक्शन, शुभम द्विवेदी यांच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा

जर तुम्ही गुगलवर बॉम्ब किंवा कोणत्याही प्रकारची स्फोटक सामग्री बनवण्याच्या पद्धतीबद्दल सर्च केलं तर तुम्हाला तुम्ही सुरक्षा एजन्सींच्या रडारवर येऊ शकता. या गोष्टी संवेदनशील आहेत. अशा परिस्थितीत, सुरक्षा एजन्सी तुम्हाला संशयित मानू शकतात आणि अटक देखील करू शकतात.

दहशतवादी हल्ल्यानंतर जर तुम्ही काही शस्त्रांबद्दल माहिती गोळा करत असाल, ऑटोमॅटिक शस्त्रांबद्दल माहिती घेत असाल किंवा बेकायदेशीर शस्त्रांबद्दल माहिती मिळवायचा प्रयत्न करत असाल, तर असं केल्यानं तुम्ही संशयित ठरू शकता.

एवढंच नाही तर, तुम्ही मोठ्या दहशतवादी संघटनांबद्दल, त्यांच्या विचारसरणीबद्दल गुगलवर सर्च करत असाल तर, असं करण तुम्हाला धोक्याचं ठरु शकतं. सध्या सर्वत्र पहलगाम याठिकाणी झालेल्या हल्ल्याची चर्चा सुरु आहे.