AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“मुस्लीम आहेस? कलमा वाच”; पत्नीसमोरच शुभमला अतिरेक्यांनी झाडली गोळी, 2 महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 31 वर्षीय शुभम द्विवेदीनेही आपले प्राण गमावले. दोन महिन्यांपूर्वीच शुभमचं लग्न झालं होतं. पत्नी आणि इतर कुटुंबीयांसोबत तो काश्मीरला फिरायला गेला होता. अतिरेक्यांनी आधी त्याला त्याचा धर्म विचारला आणि कुराणमधील कलमा म्हणून दाखवण्यास सांगितलं.

मुस्लीम आहेस? कलमा वाच; पत्नीसमोरच शुभमला अतिरेक्यांनी झाडली गोळी, 2 महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न
कानपूरमधील पर्यटक शुभम द्विवेदी आणि त्याची पत्नी एशान्याImage Credit source: Facebook
| Updated on: Apr 23, 2025 | 12:24 PM
Share

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये कानपूर इथला व्यापारी शुभम द्विवेदी (31 वर्षे) याचाही समावेश होता. पत्नी आणि 11 सदस्यांच्या फॅमिली ग्रुपसोबत तो काश्मीरला फिरायला गेला होता. शुभमचं लग्न दोन महिन्यांपूर्वी 12 फेब्रुवारी रोजी एशान्या द्विवेदीशी झालं होतं. लग्नानंतर शुभम आणि एशान्याची ही दुसरी ट्रिप होती आणि यावेळी त्यांनी कुटुंबीयांसोबत फिरण्याचं ठरवलं होतं. शुभम आणि एशान्याचे कुटुंबीयसुद्धा या ट्रिपमध्ये सहभागी होते. दहशतवाद्यांनी शुभमला कुराणमधील कलमा बोलून दाखवण्यास सांगितलं. शुभमला ते म्हणता न आल्याने अतिरेक्यांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या.

“शुभम आणि एशान्या हे घोडेस्वारी करत परिसरात फिरत होते, तेव्हाच दहशतवाद्यांनी हल्ला केला. सैन्याच्या वेशात असलेल्या एका अतिरेक्याने शुभमला विचारलं की, तू मुस्लीम आहे का? तर दुसऱ्याने त्याला कलमा म्हटल्यास सांगितलं. त्यावर शुभमने कलमा येत नसल्याचं सांगताच त्याला गोळी झाडली”, अशी माहिती शुभमचा चुलत भाऊ सौरभने दिली. “शुभमची पत्नी एशान्या अतिरेक्यांना म्हणाली की, मलासुद्धा मारून टाका. पण त्यांनी नकार दिला आणि म्हणाले जाऊन तुझ्या सरकारला सांग की आम्ही काय केलंय”, असं सौरभने सांगितलं.

काश्मीरमधील हा गेल्या सहा वर्षांतील सर्वांत मोठा दहशतवादी हल्ला होता. यावेळी दहशतवाद्यांनी पहिल्यांदाच पर्यटकांना लक्ष्य केलं. पहलगाममधील ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन भागात मंगळवारी अतिरेक्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. बैसरन खोऱ्यात टेकडीवरून खाली उतरून दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. 40 पर्यटकांना घेरून त्यांना लक्ष्य केलं. तिथं जाण्यासाठी अरुंद वाट असल्याने पर्यटकांना आडोशाला जाण्याची संधी मिळाली नाही. रक्ताच्या थारोळ्यात पर्यटकांचे कुटुंबीय मदतीसाठी धावा करत होते. काही स्थानिकांनी पाठीवरून जखमींना रुग्णालयात दाखल केलं. या हल्ल्यात किमान 26 पर्यटकांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये डोंबिवलीचे तिघे तर पनवेलमधील एकाचा समावेश आहे.

अनुच्छेद 370 हटवण्यात आल्यानंतर काश्मीरमधील दहशतवाद कमी झाल्याचा दावा केंद्र सरकारकडून वारंवार करण्यात येतो. पृथ्वीवरील स्वर्ग अशी ओळख असलेल्या काश्मीरमध्ये यंदा पहिल्यांदाच देशी-विदेशी पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचंही सांगण्यात येतंय. असं असताना अतिरेक्यांनी हा नियोजित हल्ला केला.

साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.