मोठी बातमी! सायरन वाजवा, मॉक ड्रील घ्या; गृहमंत्रालयाचे सर्व राज्यांना आदेश
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आता गृहमंत्रालयाकडून सर्वच राज्यांना मॉक ड्रील घेण्याचे आणि सायरन वाजवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मोठी बातमी समोर येत आहे. पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती आहे. पाकिस्तानी सैन्याच्या हालचाली वाढल्या आहेत. आता या सर्व पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाकडून सर्वच राज्यांना मॉक ड्रील घेण्याचे आणि सायरन वाजवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. येत्या सात मे रोजी मॉक ड्रील घेण्याचे आणि सायरन वाजवण्याचे आदेश गृहमंत्रालयाकडून राज्यांना देण्यात आले आहेत.
गृहमंत्रालयाकडून येत्या सात मे रोजी सर्व राज्यांना मॉक ड्रील घेण्याचे आणि सायरन वाजवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्यावेळी हवाई हल्ला होतो, त्याची सूचना देण्यासाठी सायरन वाजवले जातात. या सर्व यंत्रणांची सुसज्जता तपासण्यासाठी गृहमंत्रालयाकडून सर्व राज्यांना मॉक ड्रील घेण्याचे आणि सायरन वाजवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हे आदेश अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत.
भारत -पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात कडक पाउलं उचलली आहेत. भारतानं सिंधू नदी कराराला स्थगिती दिली आहे. अटारी बॉर्डर देखील बंद करण्यात आली असून, आयात -निर्यात पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. एवढंच नाही तर टपाल सेवाही बंद करण्यात आली असून, पाकिस्तानच्या अनेक चॅनल, तसेच यूट्युब चॅनवर बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले असून, त्यांना पुन्हा पाकिस्तानात जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारत सरकारच्या या महत्त्वाच्या निर्णयांमुळे पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे. पाकिस्तानच्या नेत्यांकडून सातत्यानं युद्धाच्या पोकळ धमक्या दिल्या जात आहेत.
दुसरीकडे आपल्यावर भारत कधीही हल्ला करू शकतो अशी भीती पाकिस्तानला वाटत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पीओकेमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या हालचाली वाढल्या आहेत. मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात करण्यात आलं आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढतच असून, आता या सर्व पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाकडून सर्व राज्यांना मॉक ड्रील घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
