पाकिस्तानचं टेन्शन वाढलं, रशिया भारताच्या मदतीला धावला, घेतला मोठा निर्णय
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव प्रचंड वाढला आहे. भारत आपल्यावर कधीही हल्ला करू शकतो अशी भीती पाकिस्तानला आहे. त्यातच आता मोठी बातमी समोर आली आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव प्रचंड वाढला आहे. भारत आपल्यावर कधीही हल्ला करू शकतो अशी भीती पाकिस्तानला आहे. पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण आहे. हल्ल्याच्या भीतीनं पाकिस्तानी सौनिकांनी आधीच सीमावर्ती भागांमध्ये गोळीबाराला सुरुवात केली असून, वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन होत आहे. पाकिस्तानच्या अनेक नेत्यांनी भारताकडून हल्ला होण्याची भीती बोलून दाखवली आहे, याच भीतीमुळे आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आपल्या मित्र राष्ट्रांकडे मदतीची याचना केली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करावा अशी विनंती शरीफ यांनी आपल्या मित्र देशांना केली आहे.
मात्र दुसरीकडे भारतानं पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. वेगवेगळी शस्त्रे, गोळे, तोफा आणि लढाऊ विमानांच्या चाचणीला सुरुवात झाली आहे. मात्र भारताकडे एक खास प्रकारचे शस्त्र नव्हते, सैन्याकडून या शस्त्राबाबत चिंता व्यक्त करण्यात येत होती. मात्र आता ही कमी देखील पूर्ण झाली आहे. हे एक असं शस्त्र आहे, ज्याच्या मदतीनं क्षेपणास्त्रे किंवा बॉम्ब ६ किलोमीटर अंतरावरून नष्ट करता येतात, या तंत्रज्ञानाला मॅन पोर्टेबल एअर डिफेन्स मिसाईल सिस्टम असं नाव देण्यात आलं आहे. ज्याला सैनिक खांद्यावर ठेवून क्षेपाणास्त्रासारखं डागू शकतात.
आनंदाची बातमी ही आहे की, रशियाकडून भारताला या मिसाईलची पहिली खेप मिळाली आहे. यापूर्वी देखील रशियाकडून भारताला 400 मिसाईल देण्यात आले आहेत. संरक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वीच रशियाकडून भारताला हे रशियन बनावटीचे मिसाईल मिळाले आहेत. या मिसाईलमुळे भारतीय सैन्य दलाची ताकद वाढली आहे. यामुळे पाकिस्तानच्या टेन्शनमध्ये आणकी भर पडली आहे.
पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. भारतानं सिंधू नदी जल वाटप कराराला स्थगिती दिली आहे. आयात -निर्यातीवर पूर्णपणे बंदी घातली आहे, त्यामुळे पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवळल्या आहेत. तसेच पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले असून, त्यांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
