AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Narendra Modi : पाकिस्तानची धडधड वाढली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डरकाळी, पहलगाम हल्ल्याबाबत महत्त्वाची अपडेट काय?

Pahalgam Terrorist Attack : पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार येथून पाकिस्तानला थेट मॅसेज दिला होता. आता या हल्ल्याच्या दहा दिवसानंतर पंतप्रधानांनी पुन्हा एकदा थेट इशारा दिला आहे. दहशतवाद हा मानवतेसाठी सर्वात मोठा धोका असल्याचे ते म्हणाले.

PM Narendra Modi : पाकिस्तानची धडधड वाढली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डरकाळी, पहलगाम हल्ल्याबाबत महत्त्वाची अपडेट काय?
पहलगाम हल्ला Image Credit source: टीव्ही ९ नेटवर्क
| Updated on: May 03, 2025 | 3:38 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादावर पुन्हा आसूड ओढला. दहशतवाद हा मानवतेसाठी सर्वात मोठा धोका असल्याबाबत आमचे एकमत आहे. दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्यांप्रती अंगोलाचे राष्ट्रपती लॉरेन्सू यांनी दुख व्यक्त केले. त्यावेळी पंतप्रधानांनी ही एकजुटता दर्शवली. दहशतवादाचे समर्थन करणाऱ्यांविरोधात कडक पावले टाकणार असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा बजावले. त्यामुळे पाकिस्तानची धडधड वाढली आहे. भारत केव्हापण हल्ला करू शकतो, ही भीत पाकला सतावत आहे.

पहलगाम हल्ल्याविषयी म्हणाले काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत अंगोलाचे राष्ट्रपती जोआओ लौरेंको यांच्यासह एक संयुक्त पत्र परिषद घेतली. यावेळी त्यांनी पहलगाम हल्ल्याचा विषय घेतला. अंगोला आणि भारत या दोघांचे मत आहे की, दहशतवाद हा मानव जातीसाठी सर्वात मोठा धोका आहे. आम्ही दहशतवाद आणि त्यांच्या समर्थकांविरोधात कडक कारवाईसाठी वचनबद्ध आहोत. सीमापार दहशतवादविरोधातील आमच्या लढाईत अंगोलाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी राष्ट्रपती जोआओ लौरेंको यांचे आभार मानले. दहशतवादांविरोधात कडक पाऊल टाकण्याची वचनबद्धता त्यांनी पुन्हा उद्धृत केली.

भारत अंगोला या देशाला सैन्य प्रशिक्षण आणि आधुनिकीकरणासाठी मदत करत आहे. अंगोला लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी भारत 200 लक्ष डॉलरची मदत करणार आहे. अंगोलाच्या सशस्त्र दलाला प्रशिक्षण देण्यात भारताला मदत करण्यात आनंद होईल असे पंतप्रधान मोदी म्हणाले. दोन्ही देशांच्या संबंधाला आता 40 वर्षे पूर्ण झाली आहेत. अंगोलाच्या स्वातंत्र्य संग्रामात भारताने मदत केली आहे.

दोन्ही देशांमध्ये तणाव

22 एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर दोन्ही देशातील संबंध ताणल्या गेले. भारताने पाकिस्तानी राजदूतांना परत पाठवले. तर पाक नागरिकांना देश सोडण्याचा आदेश दिला. सिंधू पाणी करार रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता पाकिस्तानातून आयात मालावर निर्बंध घालण्यात आले आहे. तर अटारी बॉर्डर बंद करण्यात आली आहे. पाकिस्तानातील नेते दिवसागणिक बरळत सुटले आहे. भारत नेमकी काय कारवाई करतो, याकडे पाकड्यांचेच नाही तर जगाचे लक्ष लागले आहे. युद्धाला तोंड फुटणार की भारत कुटनीतीचा वापर करणार याविषयी कोणतीही स्पष्ट माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Follow Us
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच..
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच...
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात.
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना..
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन.
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो.
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान.
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले.
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला...
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला....
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....