शेपूट वाकडं ते वाकडंच! पाकचे सरकार दहशतवादी मसूद अजहरला करणार 14 कोटींची मदत? पैसे आणणार कुठून?
'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान भारताने पाकिस्तानला धडा शिकवत नऊ दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य केले आणि ते पूर्णपणे उद्ध्वस्त केले. भारताच्या या हल्ल्यात मसूद अजहरच्या कुटुंबातील 14 जण मारले गेल्याची बातमी आहे.

मसूद अजहर हा दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद (JeM) चा संस्थापक आहे आणि तो स्वतः सर्वात मोठ्या दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट आहे. आता अशी बातमी समोर येत आहे की, भारताच्या हल्ल्यात उद्ध्वस्त झालेल्या दहशतवादी नेटवर्कला पुन्हा उभे करण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत आहे. पाकिस्तान सरकार मसूद अजहरला 14 कोटी रुपयांचे नुकसानभरपाई देणार असल्याचे म्हटले जात आहे.
पाक सरकारने दिली नुकसानभरपाई पॅकेजला मंजुरी
माध्यमांच्या अहवालानुसार, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारताच्या हवाई हल्ल्यात मारल्या गेलेल्या लोकांच्या कुटुंबीयांसाठी (कायदेशीर वारसदारांसाठी) 1 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाई पॅकेजला मंजुरी दिली आहे. आता जर मसूद अजहर हा त्याच्या कुटुंबातील मारल्या गेलेल्या 14 जणांचा एकमेव वारस असेल, तर त्याला 14 कोटी रुपये मिळणार आहेत. वाचा: हॉटेलमध्ये भेटायला गेला… पत्नीच निघाली गर्लफ्रेंड; पतीचे सत्य आले समोर
भारताच्या हल्ल्यात JeM चे मुख्यालय उद्ध्वस्त
मे रोजी भारतीय लष्कराने लाहोरपासून सुमारे 400 किलोमीटर अंतरावर असलेल्या बहावलपूर येथील दहशतवादी छावणीवर हल्ला करून ती उद्ध्वस्त केली, जी जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय होते. पाकिस्तानी माध्यमांनी मसूद अजहरच्या हवाल्याने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मृतांमध्ये त्याची मोठी बहीण, मेहुणा, एक भाचा आणि त्याची पत्नी यांचा समावेश आहे. दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई देण्याच्या आणि दहशतवादी गड पुन्हा उभारण्याच्या पाकिस्तानच्या या प्रयत्नाने भारतासह जगातील अनेक देश आश्चर्यचकित झाले आहेत आणि सुरक्षेबाबत चिंतितही आहेत.
पाकिस्तानला एवढे पैसे कुठून येणार?
आता प्रश्न असा आहे की, आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानकडे एवढे पैसे कुठून येणार? पाकिस्तान सरकार हे पैसे सामान्य नागरिकांच्या करातून गोळा करणार आहे. याशिवाय, 7 अब्ज डॉलरच्या एक्सटेंडेड फंड स्कीम (EFF) अंतर्गत पाकिस्तानला IMF कडून आतापर्यंत एकूण 2.1 अब्ज डॉलर मिळाले आहेत. यासोबतच क्लायमेट रेझिलिएन्स लोन प्रोग्रामअंतर्गत 1.4 बिलियन डॉलर (सुमारे 12 हजार कोटी रुपये) चे नवीन कर्जही देण्यात आले आहे. आता हे पाहणे बाकी आहे की, पाकिस्तान खरोखरच या पैशांचा उपयोग आपल्या देशातील जनता किंवा ढासळत चाललेली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी करणार की यातून दहशतवाद्यांना मदत केली जाणार. यावर संपूर्ण जगाच्या नजरा खिळल्या आहेत.
