अपने अम्मी-अब्बू की कुर्बानी दो…; पाकिस्तानी क्रिकेटपटूने ईदला दिली बैलाची कुर्बानी, नेटकरी संतापले
पाकिस्तानचा माजी फिरकीपटू सईद अजमलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो बैलांसोबत दिसत आहे.

बकरी ईद हा मुस्लिम बांधवांचा एक अतिशय महत्त्वाचा सण आहे, ज्याला ईद-उल-अझहा किंवा कुर्बानीची ईद असेही म्हणतात. हा सण जगभरात बंधुभावाने साजरा केला जातो. इस्लामिक कॅलेंडर हे चंद्राच्या गणनेवर आधारित आहे, त्यामुळे दरवर्षी याची तारीख बदलते. बकरी ईद किंवा ईद-उल-अझहाची तारीख चंद्र दिसल्यानंतरच ठरते. या खास प्रसंगी पाकिस्तानचा माजी फिरकीपटू सईद अजमल याने आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो खूप वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तो एका बैलासोबत दिसत आहे, ज्याला त्याने कुर्बानीसाठी आणले होते. याशिवाय अनेक पाकिस्तानी क्रिकेटपटू बाजारात बकरे खरेदी करताना सोशल मीडियावर दिसले.
सईद अजमल याने दिली बैलाची कुर्बानी
सईद अजमल याने या बकरी ईदला बैलाची कुर्बानी दिली आहे. त्याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला, ज्याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, अल्लाह सर्वांच्या कुर्बानीला कबूल करा.
वाचा: पती सिव्हिल सर्व्हिस अधिकार, टूरिझम कंपनी… 500 पाक हेरांचं स्वप्न पाहणारी ती ‘मॅडम N’ कोण?
View this post on Instagram
नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर सईद अजमलचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. एका यूजरने कमेंट करत ‘तुझ्या आई-वडिलांची कुर्बानी दे मग पाहू’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने स्वत:ला कुर्बान कर मुक्या प्राण्यांना नाही असे स्पष्ट म्हटले आहे.

Comments
सईद अजमल याचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शन
सईद अजमलने पाकिस्तानच्या सर्वोत्तम फिरकी गोलंदाजांपैकी एक मानला जाते. सईद अजमल याने वयाच्या 30 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले होते. त्याने श्रीलंके विरुद्ध कसोटी पदार्पणात पाच विकेट घेतले होते. टी20 विश्वचषक 2009 मध्ये तो दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला होता. सईद अजमलने पाकिस्तानकडून 35 कसोटी सामन्यांत 28.10 च्या सरासरीने 178 विकेट घेतल्या होत्या. त्याने 10 वेळा 5 विकेट आणि चार वेळा 10 विकेट घेतल्या आहेत.
वनडे क्रिकेटमध्ये शानदार प्रदर्शन
सईद अजमलने पाकिस्तानकडून 113 वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 22.72 च्या सरासरीने 184 विकेट घेतल्या आहेत. 64 टी20 सामन्यांत त्याच्या नावावर 85 विकेट आहेत. या माजी खेळाडूने एकूण 195 टी20 सामन्यांत 271 विकेट घेतल्या आहेत. सईद अजमलला पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळण्याचाही अनुभव आहे. या स्पर्धेत त्याने 10 सामन्यांत 9 विकेट घेतल्या आहेत.
सध्या सईद अजमल क्रिकेटपासून खूप दूर गेला आहे, पण त्याला पाकिस्तान संघातील खेळाडूंबाबत वक्तव्य करताना पाहिले गेले आहे. त्याची लोकप्रियता आजही खूप आहे आणि अनेक लोक या धडाकेबाज फिरकीपटूला आपला आदर्श मानतात. सईद अजमल जर आणखी काही वर्षे पाकिस्तान संघाकडून खेळला असता, तर तो अनेक विक्रम प्रस्थापित करू शकला असता.
