AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानचे ‘घाणेरडे’ सैन्य; भारतीय सैनिकांना हनीट्रॅपमध्ये अडकविण्यासाठी महाविद्यालयीन मुलींचा वापर, हिंदू देवी-देवतांचाही वापर

पाकिस्तानने लष्कराच्या जवानांना अडकवण्यासाठी हनीट्रॅपचे 7 मॉड्यूल तयार केले आहेत. ज्यामध्ये 25 हून अधिक मुली आहेत. त्यापैकी काही महाविद्यालयीन तरुणी आहेत. तर काही सेक्स वर्कर आहेत.

पाकिस्तानचे 'घाणेरडे' सैन्य; भारतीय सैनिकांना हनीट्रॅपमध्ये अडकविण्यासाठी महाविद्यालयीन मुलींचा वापर, हिंदू देवी-देवतांचाही वापर
हनीट्रॅपImage Credit source: tv9
| Updated on: Jun 14, 2022 | 6:13 PM
Share

नवी दिल्ली : पाकिस्तानचे भारताबाबत काय मत आहे. पाकिस्तान भारताबाबत कस वागतो हे अख्या जगाला माहित आहे. त्याबद्द्ल काही वेगळे सांगायची गरज नाही. मध्यंतरीही पाकिस्तानने हनीट्रॅपचा (Honeytrap) वापर करत अनेक भारतीय सैनिकांनासह (Indian Soldiers) भारतीय नागरिकांना लक्ष केलं होतं. तर आता पाकिस्तानी सैनाचा घानिरडा चेहरा उघड झाला आहे. तर पाकिस्तानी सैन्य भारताला लक्ष करण्यासाठी महाविद्यालयीन मुली आणि सेक्स वर्कर्संचा (Sex Workers) वापर करत असल्याचे समोर आले आहे. इतकेच काय तर पाकिस्तानी सैन्य भारतीय लष्कराला लक्ष्य करण्यासाठी पाकिस्तान हनीट्रॅपचे संपूर्ण नेटवर्क चालवत असल्याचे पुढे आले आहे. नुकतेच जोधपूरमध्ये लष्कराच्या जवानाला हनीट्रॅपमध्ये अडकवल्याची घटना समोर आली आहे. जोधपूरमध्ये बंदूकधारी म्हणून तैनात असलेल्या प्रदीपला पाकिस्तानी एजंट रियाने आपल्या रुपात अडकवले होते. पाकिस्तानी एजंटसोबत सौंदर्य आणि लग्नाच्या नादात अडकलेल्या प्रदीपने लष्कराची गुप्त माहिती तिला पुरवली होती. जी पाकिस्तानच्या सैन्याला मदत ठरली. तर प्रदीप सध्या तुरुंगात आहे.

ही घटना उघडकीस आल्यानंतर एक तपास करण्यात आला ज्यामध्ये असे दिसून आले की पाकिस्तानने लष्कराच्या जवानांना अडकवण्यासाठी हनीट्रॅपचे 7 मॉड्यूल तयार केले आहेत. ज्यामध्ये 25 हून अधिक मुली आहेत. त्यापैकी काही महाविद्यालयीन तरुणी आहेत. तर काही सेक्स वर्कर आहेत. लष्करात ज्या प्रकारे प्रशिक्षण दिले जाते, त्याच पद्धतीने पाकिस्तान या मुलींना हनीट्रॅपचे प्रशिक्षण देत आहे.

मैत्री :

पाकिस्तानी हनीट्रॅप आर्मीच्या एजंट असलेल्या या मुली सोशल मीडियावर फेक आयडी तयार करून आधी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात.

प्यार भरी बात:

विनंती मान्य केल्यानंतर ते प्रेमाने बोलतात. प्रत्येक सुख-दुःखात ती साथ देईल असा तिचा दावा असतो.

लग्नाची बाता :

मैत्रीनंतर ती लग्नाचे वचन देते.

सेक्स चॅट:

यानंतर सेक्स चॅट सुरू होते, यावेळी गुतलेल्या व्यक्तीला वाटते की मुलगी खरोखरच त्याच्यावर प्रेम करते.

न्यूड कॉलिंग :

टार्गेट फसवण्यासाठी न्यूड कॉल्सही केले जातात. या मुली प्रेमाच्या आणि वासनेच्या जाळ्यात इतक्या अडकतात की त्यांच्या सांगण्यावरून ती व्यक्ती देशाच्या सुरक्षेशी संबंधित गुप्त कागदपत्रे शेअर करण्यास तयार होते.

ब्लॅकमेलिंग:

पीआयओ लक्ष्य आणि मुलगी यांच्यातील सर्व चॅटिंग आणि व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करत असते. लक्ष्याने गुप्त कागदपत्र देण्यास नकार दिल्यास न्यूड व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेल केले जाते.

तसेच पैसांच्या वापर

काही प्रकरणांमध्ये, या हनीट्रॅप मुली गुप्त कागदपत्रांसाठी पैसे देखील देतात. ‘आर्मी ऑर्डर’ आणि ‘ऑर्बेट’ या गुप्त दस्तऐवजाच्या बदल्यात लष्कर 10 ते 12 हजार रुपये देऊ करते. भारतात सध्या असलेल्या स्लीपर सेलद्वारे पैसे पाठवले जातात. बिटकॉइनच्या मदतीने स्लीपर सेलमध्ये पैसे पाठवले जातात. जिथे ते एटीएम कॅश डिपॉझिट मशीन किंवा ऑनलाइन सैनिकांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करतात.

भारतीय क्रमांकावरून व्हॉट्सअॅप आयडी तयार करा

भारतीय दलांशी संबंधित अधिकारी आणि जवानांशी संपर्क साधण्यासाठी या मुली प्रथम स्थानिक लोकांशी मैत्री करतात. मोफत सेक्स चॅट आणि न्यूड व्हिडिओ कॉल ऑफर करून, त्यांना त्यांच्याकडून व्हॉट्सअॅप ओटीपी मिळवतात. जेणेकरून ते भारतीय नंबरवरून व्हॉट्सअॅप आयडी तयार करू शकतील. व्हॉट्सअॅपवर +92 नंबर पाहिल्यानंतर आणि +91 पाहिल्यानंतर ही मुलगी भारतीय असल्याचे कोणालाही संशय येऊ नये म्हणून हे असं केले जात.

हनीट्रॅप शिलेक्शनसाठी आधार एकच रूप

  1. कराची, लाहो, हैदराबाद अशा शहरामधून ISI आणि पाकिस्तानी मिलिट्री इंटेलिजंन्स हे लोकल सेक्स वर्कर्संना शोधतात आणि आपल्या सोबत घेतात.
  2. तर कधी कधी ते आपला मोर्चा बोलक्या कॉलेजच्या विद्यार्थींकडे ही वळवतात. त्यांना अनेक प्रलोभने देऊन आपल्या या नापाक कामात सामिल करून घेतात.
  3. तर हनीट्रॅप शिलेक्शनसाठी आधार एकच रूप. जी महिली अथवा मुलगी सुंदर तितके लगेच शिलेक्शन
  4. शिलेक्शननंतर या मुलींचे आणि महिलांचे ट्रेनिंग घेतले जाते. त्यांना यात भारतीय लष्कराची माहिती पुरवली जाते. जसे कि अधिकारी त्यांची रँक आणि मिनिटचे ठिकाण.
  5. या महिला आणि मुलींना पीआईओ म्हटलं जातं
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा.
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी.
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'.
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?.
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा.
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा....
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा.....
"'लाडकी बहीण' बंद व्हावी म्हणून कोर्टात जाणारा नानांचा माणूस..."
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं...
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं....
मस्ती करणारे दोन पायांवर घरी जाणार नाहीत, नितेश राणेंचे मोठे वक्तव्य
मस्ती करणारे दोन पायांवर घरी जाणार नाहीत, नितेश राणेंचे मोठे वक्तव्य.