AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपाकडून ३० वर्षाच्या युवतीला अचानक ऑफर, विधानसभा लढवा, तरुणीच्या समर्थनार्थ लोकांचीही रांग

पायल कुकरानी या राजकारणात नवीन आहेत, तरी देखील त्यांना तिकीट का मिळालं, याचं उत्तर पायल यांनी दिलं आहे, पायल म्हणतात मला माहित नाही, मला आताच माहिती मिळाली आहे.

भाजपाकडून ३० वर्षाच्या युवतीला अचानक ऑफर, विधानसभा लढवा, तरुणीच्या समर्थनार्थ लोकांचीही रांग
| Updated on: Nov 14, 2022 | 9:13 PM
Share

अहमदाबाद : गुजरात राज्यात सध्या विधानसभेचे वारे वाहत आहेत. अशातच अहमदाबादमधील नरोदा पाटीया विधानसभेसाठी पायल कुकरानी या अवघ्या ३० वर्षाच्या युवतीला भाजपाने अचानक तिकीट दिलं, यानंतर तिच्या समर्थनार्थ घरासमोर लोकांची रांग लागली, लोक विचारु लागले, पायल कुठे आहेत. पायल हॉस्पिटलला होती आणि तिला अचानक बातमी आली की, तुला भाजपाने विधानसभा तिकिट दिलं आहे.कुकरानी या राजकारणात नवीन आहेत, तरी देखील त्यांना तिकीट का मिळालं, याचं उत्तर पायल यांनी दिलं आहे, पायल म्हणतात मला माहित नाही, मला आताच माहिती मिळाली आहे.

पायल यावर आणखी बोलताना म्हणते, मला माहित आहे, नरोदा पाटीया हा भाजपाचा गढ आहे, म्हणून या विधानसभेत भाजपा उमेदवाराचा विजय निश्चित असतो.विशेष म्हणजे मला याच विधानसभेतून भाजपाने तिकीट दिलं, हे माझ्यासाठी आश्चर्य़ाचा धक्का देण्यासारखं आहे.

२००२ मध्ये पायल कुकरानीचे वडील मनोज कुकरानी यांच्यावर नरोदा पाटीया जनसंहार केल्याचा आरोप आहे, त्यात त्यांना जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे.

मनोज कुकरानी देखील यावेळी उपस्थित होते, ते सध्या आरोग्याच्या कारणावरुन जेलमधून बाहेर आहेत. नरोदा पाटीयामध्ये २८ फेब्रुवारी २००२ रोजी ९७ अल्पसंख्यांकाची दंगलखोरांनी हत्या केली होती.

तुमचे वडील मनोज कुकरानी यांना नरोदा पाटीया हत्याकांडात जन्मठेपेची शिक्षा दिली आहे, तुम्ही या घटनेला आपल्या परिवारासोबत जोडलं जातं, ते कसं पाहता किंवा काय विचार करतात.

पायल कुकरानी यांनी यावर म्हटलं आहे, प्रत्येक व्यक्तीचा आणि प्रत्येक परिवाराचा एक भूतकाळ असतो. माझ्या परिवारासोबतही एक भूतकाळ जोडला गेला आहे. मला वाटतं मी तरुण आहे, डॉक्टर आहे, लोकांच्या सेवेत असते, यावेळी भाजपाने अधिक तरुण लोकांना तिकिट देण्याचं ठरवलं आहे, म्हणून मला ही संधी मिळाली आहे.

पायल कुकरानी यांच्यासोबत यावेळी सध्याचे आमदार बलराम थवानी हे देखील उपस्थित होते.बलराम थवानी यांनी सांगितलं की,नरोदा पाटीया प्रकरणात मनोज कुकरानी आणि त्यांच्यासारखे अनेक लोक निर्दोष आहेत.स्थानिक लोकांना सर्वकाही माहित आहे, मनोज यांच्यावर ९० दिवसांनी एफआयआर झाली आहे.

सुनेत्रा पवार यांच्या शासकीय वाहनप्रकरणी वाद; अनिकेत तटकरेंवर टीका
सुनेत्रा पवार यांच्या शासकीय वाहनप्रकरणी वाद; अनिकेत तटकरेंवर टीका.
विलीनीकरणानंतर पवार राजकारणापासून होणार होते दूर,नेमकं काय घडणार होतं?
विलीनीकरणानंतर पवार राजकारणापासून होणार होते दूर,नेमकं काय घडणार होतं?.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद; महिलेला कपडे फाडत मारहाण
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद; महिलेला कपडे फाडत मारहाण.
राज ठाकरे यांना आम्ही विकासासाठी सोबत घेणार, शिरसाटांचं विधान
राज ठाकरे यांना आम्ही विकासासाठी सोबत घेणार, शिरसाटांचं विधान.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची सुनील तटकरे यांनाही पूर्वकल्पना होती?
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची सुनील तटकरे यांनाही पूर्वकल्पना होती?.
संजय राऊत आणि दादा भुसे यांच्यातील फौजदारी खटला संपला
संजय राऊत आणि दादा भुसे यांच्यातील फौजदारी खटला संपला.
टिपू सुलतानच्या मुद्द्यावर ठाकरे गटाची भूमिका काय? संजय राऊतांनी एका..
टिपू सुलतानच्या मुद्द्यावर ठाकरे गटाची भूमिका काय? संजय राऊतांनी एका...
रोहित पवारांचे VSR कंपनीवर गंभीर आरोप; SR कंपनीला एका बड्या नेत्याचा..
रोहित पवारांचे VSR कंपनीवर गंभीर आरोप; SR कंपनीला एका बड्या नेत्याचा...
बदलापूरमध्ये अंडाशय तस्करीचा धक्कादायक प्रकार उघड; तीन महिलांना अटक
बदलापूरमध्ये अंडाशय तस्करीचा धक्कादायक प्रकार उघड; तीन महिलांना अटक.
चंद्रपूरचा बदला भिवंडीत, काँग्रेसच्या पाठिंब्याने नारायण चौधरी महापौर
चंद्रपूरचा बदला भिवंडीत, काँग्रेसच्या पाठिंब्याने नारायण चौधरी महापौर.