IndiavsPakistan : संघर्ष सुरू होताच सैनिक रडू लागले, महिला पायलटला पाकने पकडलं, काय खरं?; PIB फॅक्टचेक द्वारे जाणून घ्या सत्य

पाकिस्तानशी संघर्ष सुरू झाल्यापासून, भारत आणि भारतीय सैन्याविरुद्ध सोशल मीडियावर बरीच दिशाभूल करणारी आणि खोटी माहिती शेअर केली जात आहे. विशेषतः पाकिस्तान समर्थकांकडून अशी माहिती सतत प्रसिद्ध केली जात आहे. पीआयबी फॅक्ट चेक टीमद्वारे अशा माहितीची सत्यता पडताळून सत्य बाहेर आणत आहे.

IndiavsPakistan : संघर्ष सुरू होताच सैनिक रडू लागले, महिला पायलटला पाकने पकडलं, काय खरं?;  PIB फॅक्टचेक द्वारे जाणून घ्या सत्य
सोशल मीडियावर भारताबद्दल खोटे दावे
Image Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: May 10, 2025 | 12:27 PM

भारत आणि पाकिस्तानमधील तणाववाढला सून पाकद्वारे भारतावर सातत्याने हल्ला करण्यात येत आहे. या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर भारतार्फे हे डाव हाणून पाडले जात आहे. मात्र हा तणाव फक्त सीमेपुरताच मर्यादित नसून सोशल मीडियावरूनही बरीच चुकीची माहिती असलेले, दिशाभूल करणारे व्हिडीओ शेअर केले जात आहेत. भारत-पाक संघर्ष सुरू होताच भारतीय सैनिक त्यांच्या चौक्यांवरून, पोस्टवरून पळून गेल्याचा चुकीचा दावा सोशल मीडियावरील व्हिडीओद्वारे करण्यात येत आहे. तसेच जयपूर विमानतळाजवळ स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचा दावाही केला जात आहे. मात्र हे दावे खरंच सत्य आहेत का ? या व्हायरल पोस्टपैकी अनेकांचे फॅक्ट चेक करत पीआयबी फॅक्ट चेक टीमने सत्य बाहेर आणले आहे.

भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष तीव्र होत असताना, भारतीय सैनिक रडत आहेत आणि त्यांच्या चौक्या सोडून पळून जात आहेत,असा दावा सोशल मीडिया एक्सवरील एका व्हिडिओ पोस्टमध्ये करण्यात आला आहे. मात्र हा व्हिडिओ 27 एप्रिल रोजी इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला होता आणि तो भारतीय सैन्याशी संबंधित नाही, असे पीआयबी फॅक्ट चेक टीमने स्पष्ट केलं.

 

संघर्ष सुरू होताच सैनिक रडू लागले ?

व्हायरल झालेल्या त्या व्हिडीओमधील संदर्भ आणि सत्य काय हे पीआयबीतर्फे सांगण्यात आलं. या व्हिडिओमध्ये एका खाजगी संरक्षण प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी भारतीय सैन्यात त्यांची निवड झाल्याचा आनंद साजरा करत आहेत. व्हिडिओमध्ये दिसणारा तरुण त्याच्या निवडीची बातमी समजताच आनंदाने भावुक झाला आणि रडू लागला असं फॅक्ट चेक टीमद्वारे स्पष्ट करण्यात आलं.

तर दुसऱ्या एका बनावट पोस्टमध्ये, अल जझीराने त्यांच्या पोस्टमध्ये दावा केला आहे की जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर विमानतळाजवळ सुमारे 10 स्फोट झाले आहेत. मात्र फॅक्ट चेक टीमने ही बातमी खोटी असल्याचे म्हटले आहे. प्रामाणिक माहितीसाठी फक्त अधिकृत स्रोतांवर विश्वास ठेवा. या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या दाव्यांवर विश्वास ठेवू नका, असे पीआयबीने त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले.

त्याचप्रमाणे जयपूर विमानतळावर झालेल्या बॉम्बस्फोटांबद्दलही दावे करण्यात आले. पीआयबी फॅक्ट चेक टीमनेही हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट केले.

ननकाना साहिब गुरुद्वारावर ड्रोन हल्ला !

भारतातील अनेक पोस्ट ऑफिस स्फोटांमध्ये उद्ध्वस्त झाल्याचा दावा करणाऱ्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टचेही सत्य फॅक्ट चेक टीमने उघड केले. व्हिडिओ खूप जुना आहे आणि ऑपरेशन सिंदूर नंतरच्या कोणत्याही कारवायांशी त्याचा संबंध नाही. हा व्हिडिओ मूळतः 15 नोव्हेंबर 2020 रोजी YouTube वर अपलोड करण्यात आला होता, असे टीमने नमूद केलं.

 

त्याचप्रमाणे, दिल्ली-मुंबई विमान मार्गावरील सेवा तात्पुरती बंद करण्यात आल्याचा दावाही केला जात आहे. मात्र हाँ दावाही अतिशय खोटा असल्याचे फॅक्ट चेक टीमने सांगितलं. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने दिल्ली आणि मुंबई उड्डाण माहिती क्षेत्रांमधील हवाई वाहतूक सेवा (ATS) मार्गांच्या 25 विभागांच्या तात्पुरत्या बंदीचा कालावधी कामकाजाच्या कारणास्तव वाढवला आहे.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये असाही दावा केला जात आहे की, भारताकडून नानकाना साहिब गुरुद्वारावर ड्रोन हल्ला करण्यात आला आहे. पण फॅक्ट चेक टीमने हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. हे जातीय द्वेष पसरवण्याच्या उद्देशाने केले जात आहे. कृपया अशा गोष्टींपासून सावध रहा. तसेच असे व्हिडिओ फॉरवर्ड करणे टाळा, असा सल्लाही टीमने दिला आहे.

 

भारतीय महिला पायलट पाकच्या ताब्यात ?

‘हिमालयात भारतीय हवाई दलाचे 3विमान कोसळले का?’ याविषयीचे सत्य फॅक्ट चेक टीमने उघड केले. हा दावा देखील खोटा असल्याचे टीमने म्हटले आहे. हिमालयीन प्रदेशातील वेगवेगळ्या भागात तीन लढाऊ विमाने कोसळल्याचा खोटा दावा अनेक पाकिस्तान समर्थक सोशल मीडिया अकाउंटवरून केला जात आहे. पण हा दाखवला जाणारा फोटो खूप जुना आहे, तो 206 सालचा फोटो असल्याचे सांगण्यात आलं.

 

तसेच भारतीय हवाई दलातील एकाही महिला पायलटला पाकिस्तानने ताब्यात घेतलेले नसल्याचे पीआयबी फॅक्ट चेक टीमने स्पष्ट केलं. भारतीय महिला हवाई दलाची पायलट, स्क्वॉड्रन लीडर शिवानी सिंग पाकिस्तानमध्ये पकडली गेली आहे असा दावा पाकिस्तान समर्थक सोशल मीडिया हँडल्सवरून दावा केला जात आहे. पण हा दावा खोटा आहे, असे सांगण्यात आलं आहे.