US Tariff: मोठी बातमी! अमेरिका भारतावरील टॅरिफचा निर्णय मागे घेणार? केंद्रीय मंत्र्याने दिले संकेत

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के कर लादला आहे. आता केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी महत्वाची माहिती दिली आहे. भारतीय वस्तूंवर 50 टक्के शुल्क लावण्याच्या निर्णयाबाबत अमेरिकेसोबत बोलणं सुरु आहे असं गोयल यांनी म्हटलं आहे.

US Tariff: मोठी बातमी! अमेरिका भारतावरील टॅरिफचा निर्णय मागे घेणार? केंद्रीय मंत्र्याने दिले संकेत
Trump-and-Modi trade
| Updated on: Sep 05, 2025 | 10:51 PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के कर लादला आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. अशातच आता केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी महत्वाची माहिती दिली आहे. भारतीय वस्तूंवर 50 टक्के शुल्क लावण्याच्या निर्णयाबाबत अमेरिकेसोबत बोलणं सुरु आहे असं गोयल यांनी म्हटलं आहे. भारत आणि अमेरिका एका संतुलित आणि निष्पक्ष करारावर सह्या करतील त्यामुळे घाबरण्याची गरज नाही असं गोयल यांनी म्हटलं आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी एएनआयला एक मुलाखत दिली. यात त्यांनी म्हटले की, भारत आणि अमेरिकेतील चांगले संबंध कायम राहतील. मला वाटत नाही की घाबरण्याची गरज आहे. सध्या व्यापार कराराबाबत चर्चा सुरु आहे. अमेरिकेशी आमचे चांगले संबंध आहेत. मला विश्वास आहे की आम्ही काही समस्या सोडवू आणि संतुलित आणि निष्पक्ष करार होईल. गोयल यांच्या म्हणण्यानुसार करार झाला तर अमेरिका भारतावर लादलेले अतिरिक्त 50 टक्के शुल्क मागे घेऊ शकते, किंवा त्यात कपात करु शकते.

कधी होणार करार

सध्या दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरु आहे. कराराला किती वेळ लागेल याबाबत बोलताना गोयल म्हणाले की, ‘वाटाघाटींमध्ये वेळेची मर्यादा नाही. संयमाने चर्चा करावी लागेल. कारण हा करार दीर्घकालीन कालावधीसाठी असेल.’ दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर 50 टक्के शुल्क लादले आहे. सुरुवातीला 25 टक्के कर लादण्यात आला होता, मात्र नंतर भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याची शिक्षा म्हणून अतिरिक्त 25 टक्के म्हणजे एकूण 50 टक्के कर लादण्यात आला आहे.

जीएसटीबाबत गोयल काय म्हणाले?

अमेरिकेने भारतावर कर लादल्यानंतर जीएसटीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर बोलताना पियुष गोयल म्हणाले की, यावर काम अनेक महिन्यांपासून सुरू होते, मात्र या दोन्ही घटना योगायोगाने झाले एकाचवेळी आल्या. अशा सुधारणा एका रात्रीत होऊ शकत नाहीत. अर्थमंत्री, सचिव आणि मंत्र्यांचा एक गट त्यावर काम करत होते अशी माहिती गोयल यांनी दिली.